PMC Property Tax Lottery Results | पेट्रोल कार ऐवजी रुग्णवाहिका देण्याची कळमकर दाम्पत्याची मागणी | महापालिका आयुक्त म्हणतात कार मनपाला डोनेट करा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Property Tax Lottery Results | पेट्रोल कार ऐवजी रुग्णवाहिका देण्याची कळमकर दाम्पत्याची मागणी | महापालिका आयुक्त म्हणतात कार मनपाला डोनेट करा

PMC Property Tax Lottery Results | पुणे महापालिकेचा (Pune Municipal Corporation) मिळकत कर प्रामाणिकपणे भरणाऱ्यांना पुणे मनपा ने प्रथमतःच लॉटरी योजना (PMC Property Tax Lottery  Scheme) राबवली होती. या राबविलेल्या लकी ड्रॉ उपक्रमात माजी नगरसेविका ज्योती कळमकर (Jyoti Kalamkar) व त्यांचे पती गणेश कळमकर (Ganesh Kalamkar) यांना पेट्रोल कार (Petrol car) बक्षीस मिळाली आहे. मात्र कार ऐवजी सर्व सोयींनी युक्त रुग्णवाहिका (Ambulance) द्या. जेणेकरून प्रभागातील नागरिकांना त्याचा उपयोग होईल. अशी विधायक मागणी कळमकर दाम्पत्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे केली आहे. त्यावर महापालिका आयुक्तांनी कार महापालिकेला डोनेट करा, असा सल्ला कळमकर यांना दिला आहे. असे असले तरी कळमकर मात्र ऍम्ब्युलन्स घेण्यावरच ठाम आहेत. (PMC Property Tax Lottery Results)

पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) प्रॉपर्टी टॅक्स धारकांसाठी लॉटरी योजना (Property Tax Lottery Scheme)  सुरू केली होती.  मिळकत कराची थकबाकी वेळेवर भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेने अभिनव पाऊल उचलले होते.  महापालिकेने 15 मे ते 31 जुलै 2023 दरम्यान मिळकतकर भरणाऱ्या निवासी, अनिवासी आणि खुल्या भूखंडावरील करदात्यांना लागू असलेली लॉटरी योजना आणली होती. यामध्ये 45 पुणेकरांनी इ कार पासून ते बाईक, लॅपटॉप, फोन अशी आकर्षक बक्षिसे मिळवली आहेत. यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांचा समावेश आहे. त्यांनी व त्यांच्या पतीने पेट्रोल कार जिंकली आहे.  मात्र कळमकर यांनी कार न देता तेवढ्याच किमतीची ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आयुक्ताकडे केली आहे. तसे पत्र देखील कळमकर यांनी आयुक्तांना दिले आहे. (PMC Property Tax Lottery Results)

कळमकर यांच्या पत्रानुसार  पुणे मनपा मिळकत कर प्रामाणिकपणे भरणाऱ्यांना पुणे मनपा ने प्रथमतःच राबविलेल्या लकी ड्रॉ उपक्रमात मला चार चाकी पेट्रोल कार ही बक्षीस स्वरूपात मिळाली असून सदर पेट्रोल कार ऐवजी आम्हाला प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असलेली रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला असता आमच्या भागात या रुग्णवाहिकेची गरज आहे यामुळे खूप मोठा फायदा परिसरातील नागरिकांना होणार आहे. (Pune property tax)

त्यावर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी कळमकर यांना सल्ला दिला कि ती कार महापालिकेला डोनेट करा. आम्ही लोकांना सुविधा देऊ. मात्र असे करण्यास कळमकर यांनी नकार दिला आहे. गणेश कळमकर यांनी सांगितले कि, एखादा नगरसेवक जेवढा चांगल्या पद्धतीने त्या रुग्णवाहिकेचा वापर करू शकतो तेवढा महापालिका प्रशासन करू शकणार नाही. आम्हाला एम्बुलन्स दिली तर आमच्या प्रभागात चांगल्या पद्धतीने सुविधा देऊ.  त्यावर आमचे नियंत्रण चांगल्या पद्धतीने राहील.

–———
कळमकर दाम्पत्य यांनी आम्हांला पत्र देत प्रभागात रुग्णवाहिका देण्याची मागणी केली आहे. त्यावर आम्ही त्यांना ती कार महापालिकेला डोनेट करा, तशी सुविधा प्रभागात पालिके मार्फत आम्ही उपलब्ध करून देतो, अशी सूचना केली. आमची सूचना त्यांना मान्य आहे.
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त 
—-
कार पालिकेला डोनेट करा ही आयुक्तांची भूमिका आम्हाला मान्य नाही. आम्हाला आमच्या प्रभागातील नागरिकासाठी ऍम्ब्युलन्सच हवी आहे. आमची तीच मागणी आहे. पालिकेने आमची मागणी मान्य नाही केली तर आम्ही ती कार विकून त्यातून येणाऱ्या पैशातून ऍम्ब्युलन्स घेणार आहोत. काहीही झाले तरी प्रभागातील नागरिकांसाठी एम्बुलन्स घेण्याचा संकल्प आम्ही सिद्धीस नेणार.
ज्योती कळमकर, गणेश कळमकर. 
—–
News Title | PMC Property Tax Lottery Results | Kalamkar couple’s demand for ambulance instead of petrol car Municipal commissioner says donate car to municipality