PMRDA : PMRDA च्या प्रारूप विकास आराखड्यावरील सुनावणीसाठी 7 सदस्यीय समिती गठीत 

Categories
Breaking News पुणे

PMRDA च्या प्रारूप विकास आराखड्यावरील सुनावणीसाठी 7 सदस्यीय समिती गठीत

: पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांची माहिती

 

पुणे : पीएमआरडीएच्या प्रारुप विकास आराखड्यावरील (PMRDA Draft Development Plan) हरकती व सूचनांवरील सुनावणीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Shivsena MLA Tanaji Sawant) आणि माजी नगरसेवक अजित आपटे (Ex Corporator Ajit Apte) यांच्यासह सायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजी पार्कचे डॉ. राजेंद्र जगदाळे (Dr. Rajendra Jagdale) यांची अशासकिय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (PMRDA)

तसेच तज्ञ सदस्य म्हणून निवृत्त प्रधान सचिव रमानाथ झा, जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव राजेंद्र रा. पवार, नगररचना विभागाचे निवृत्त संचालक सुधाकर नांगनुरे आणि भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या स्थापत्य व अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. राहुल कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पीएमआरडीए क्षेत्रातील सुमारे ७ हजार चौ.कि.मी.हून अधिक क्षेत्रफळाचा प्रारुप विकास आराखडा (PMRDA Draft Development Plan) तयार करण्यात आला आहे. यामध्ये मागीलवर्षी पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांचाही समावेश आहे. या आराखड्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. पीएमआरडीएच्या नियोजन समितीवर लोकप्रतिनिधींची नुकतीच नियुक्ती झाली आहे. परंतू आराखड्यावरील हरकती व सूचनांवर सुनावणी घेउन आराखडा अंतिम करण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सुनावणीसाठी समितीची स्थापना करण्यात आलेली नव्हती. आज या समितीमध्ये नियोजन समितीमधील तीन सदस्य तसेच चार तज्ञ सदस्यांची नियुक्ती करून समिती गठीत करण्यात आल्याचे पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे (PMRDA Commissioner Dr Suhas Diwase) यांनी कळविले आहे.

PMRDA : PMC : गणेशखिंड रस्त्याला पर्यायी रस्ता!  : PMRDA ने महापालिकेकडे मागितली परवानगी 

Categories
Breaking News PMC पुणे

गणेशखिंड रस्त्याला पर्यायी रस्ता!

: PMRDA ने महापालिकेकडे मागितली परवानगी

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन – ३ प्रकल्पाच्या मार्गिके मधील सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकामध्ये प्रस्तावित असलेल्या मेट्रो सह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी गणेश खिंड रस्त्यावरील अस्तित्वातील वाहतूक सुरळीत होणेसाठी पर्यायी रस्ता (पुणे विद्यापीठ – स्वामी विवेकानंद शाळा – वैकुंठ मेहता राष्ट्रीय प्रबंध संस्था.) तयार करण्यात येणार आहे. याबाबत PMRDA ने महापालिकेकडे परवानगी मागितली आहे.

: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्याय

हिंजवडी ते शिवाजी नगर मेट्रो लाईन-३ मार्गीकेचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौक येथे गणेश खिंड रस्त्याने होणारी वाहतूक कोंडी विचारात घेता व दीर्घकालीन नियोजन करणेसाठी अस्तित्वातील पूल पाडून त्या ऐवजी एकाच खांबावर (pier) दुमजली पुलाचे (वर मेट्रो व त्या खाली दुहेरी वाहतुकीचा उड्डाणपूल ) यांधकाम करणेचे काम प्रगतीत आहे. विद्यापीठ चोकामध्ये प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी रस्त्याच्या मध्यभागी बॅरीकेडस लावून करणे प्रस्तावित असून गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक पाहता अस्तित्वातील रस्त्याच्या उर्वरित रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व वाहतूक नियमित प्रमाणे सुरळीत राहण्यासाठी प्राधिकरणामार्फत traffic diversion plan तयार करण्यात आला आहे. या  आराखड्यास दि. २६/१०/२०२१ रोजी संपन्न झालेल्या पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (PUMTA) बैठकी मध्ये मान्यता देण्यात आली आहे. आराखड्यानुसार Millennium गेट विद्यापीठ परिसर, विद्यापीठ चौक स्वामी विवेकानंद शाळापासून – Vamnicom रस्ता या मार्गे वाहतूक वळविण्यासाठी सदर रस्त्याचा वापर करतेवेळी Vamnicom संस्थेमधील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांना विद्यापीठ चौक येथून Vamnicom संस्थेच्या आवारामध्ये जाण्यासाठी  पर्यायी रस्ता करणे प्रस्तावित आहे. तसेच, सदर रस्ता करण्यासाठी विद्यापीठ ते स्वामी विवेकानंद शाळेच्या कडेने असलेली ३५ मी लांबीची पत्राची सिमाभिंत काढण्यास परवानगी देण्यात यावी व  रस्ता करण्यास परवानगी मिळावी. अशी मागणी PMRDA ने महापालिकेकडे केली आहे.

Divisional Commissioner : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्काळ ‘या’ उपाययोजना करा  : विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे महापालिकेला आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्काळ ‘या’ उपाययोजना करा

: विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे महापालिकेला आदेश

पुणे : विद्यापीठ चौकातील प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या विकास आराखड्याप्रमाणे हे रुंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक जागा ताब्यात घेण्यावरून मात्र संभ्रम  कायम आहे.  दरम्यान याबाबत आता विभागीय आयुक्तांनी महापालिकेला आदेश दिले आहेत. त्यानुसार विद्यापीठ चौकामध्ये  प्रस्तावित असलेल्या मेट्रो सह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी विद्यापीठ चौक व गणेशखिंड रस्त्यावरील अस्तित्वातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पुणे महानगरपालिके मार्फत  उपाय योजनांची तत्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. असे आदेशात म्हटले आहे.

: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रुंदीकरण आवश्यक

सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौक येथे गणेशखिंड रस्त्याने होणारी वाहतूक कोंडी विचारात घेऊन व दीर्घकालीन नियोजन करणेसाठी अस्तित्वातील पूल पाडून त्याऐवजी एकाच खाबावर (Pier) दुमजली पूलाचे (वर मेट्रो व त्या खाली दुहेरी वाहतुकीचा उड्डाणपूल) बांधकाम करणेसाठी सवलतकारा सोबत करावयाच्या पूरक करारनामा मसुद्यास महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचीव अस्तित्वातील पूल तोडणेस पुणे महानगरपालिकेची मान्यता घेवून सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील अस्तित्वातील दोन उड्डाणपुलाचे पाडकाम माहे जुलै-ऑगस्ट २०२० या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्राधिकरणामार्फत Traffic Diversion Plan तयार करण्यात आला असून सदर आराखड्यास  विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२६/१०/२०२१ रोजी  झालोन्या पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

: या कराव्या लागणार उपाययोजना

१) विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चौक या साधारणतः २५० मी लांब रस्त्याचे डाव्या बाजूचे पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्या नुसार रुंदीकरणकरणेसाठी जमीन भूसंपादित / हस्तांतर करून घेणे, अस्तित्वातील सेवा वाहिन्यांचे  स्थलांतर करणे व आवश्यकत्या परवानग्या घेऊन सदर रस्त्याचे बांधकाम मेट्रो सवलतकार कंपनी यांच्यामार्फत करणेसाठी जागा उपलब्ध करून देणे.
२) सदर आराखड्यामधील पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी संबंधित संस्था किंवा विभाग यांच्याशी समन्वय साधणे व रस्ते खुले करणेची कार्यवाही करणे,
३) मंजूर करण्यात आलेल्या Traffic Diversion Plan प्रमाणे दोन वर्तुळाकार महामार्गावर वळण भागामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा (Chamfering)करणे व अतिक्रमणे काढून घेणे.
४) सेनापती बापट चोकातीलJ. W.Marriott Hotel समोरील दुभाजक काढून टाकण्यासाठी परवानगी देणे.
५) सेनापती बापट चौकामध्ये धोत्रे पथ वरून वाहने उजव्या बाजूस वळण्यासाठी J. W. Marriott Hotel समोरील Junction भागात रस्त्याचे फुटपाथ कमी रुंदीकरण करणे तसेच या भागातले आकाश चिन्हे फलक (Display / advertising board)हटवावेत.
६) संगन्ना  धोत्रे पथ व अभिमानश्री रस्ता या दोन रस्त्यावर No Parking Zoneकरावा.
७) अभिमानश्री रस्त्यावर विद्यापीठ चौक व पाषाण कडून येणारी वाहने अस्तित्वातील रस्त्याच्या दुभाजका मधून विलीन (Merging) होण्यासाठी अस्तित्वातील Divider cut ची लांबी वाढविणे.
८) रस्ता रुंदीकरणास व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे विद्युत खांब, CCTV खांब व दिशा दर्शक फलक काढून घ्यावेत.
या  उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठीची कार्यवाही तत्काळ पुणे महानगरपालिके मार्फत हाती घेण्यात यावी. असे आदेशात म्हटले आहे.

Pune metro : पुण्यातील ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला सुरुवात

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

पुण्यातील ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला सुरुवात

‘पीपीपी’ तत्वावरचा देशातला पहिलाच प्रकल्प; तीन वर्षात होणार काम पूर्ण

प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दर आठवड्याला आढावा

मुंबई :- पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी महत्वाचा असणारा माण-हिंजवडी ते शिवाजीनगरच्या मेट्रो मार्गिका-३ च्या कामाला आज प्रत्यक्षात सुरुवात झाली. सार्वजनिक-खासगी सहभाग असलेला (पीपीपी) हा देशातला पहिलाच मेट्रो प्रकल्प असून येत्या तीन वर्षात या मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प यशस्वीपणे मार्गी लावण्यासाठी तसेच या संबंधीच्या विविध प्रकारच्या मान्यतांसह तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे या प्रकल्पाच्या संबंधित सर्व यंत्रणांचा प्रत्येक आठवड्याला मंत्रालयात विशेष आढावा घेतात.

‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून साकारण्यात येणाऱ्या ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’च्या मार्गिका तीनचे काम सुरु करण्यासाठी विविध प्रकारच्या मान्यता आणि तांत्रिक अडचणी होत्या. त्या सोडविण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनात प्रत्येक आठवड्याला या बाबतची विशेष आढावा बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीत या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यात आला. त्यामुळे या मेट्रोच्या मार्गिकेसाठी आवश्यक असणाऱ्या जागांचे संपादन ‘भू-संपादन व पुनर्वसन कायदा २०१३’चा अवलंब करण्यात आला आहे. मेट्रो कार डेपो, राईट ऑफ वे आणि स्टेशनसाठी लागणारी सुमारे ९८ टक्के जमीन प्राधिकरणाने संपादित केली आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व परवानग्या व लायसन्स प्राप्त करून घेण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याआधीच इतके भू-संपादन व विहित सर्व परवानग्या प्राप्त करणारा हा देशातला पहिला प्रकल्प आहे.

या मेट्रो मार्गिकेची लांबी २३.२ किलोमीटर असून या मार्गिकेत २३ स्टेशन्स प्रस्तावित आहेत. केंद्र सरकारच्या ‘मेट्रो रेल धोरण २०१७’ अन्वये सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर राबविण्यात येत असलेला हा भारतातला पहिलाच प्रकल्प आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्याबरोबरचं राज्य सरकारचे २० टक्क्यांपर्यंत अर्थसहाय्य लाभणार आहे. पुणे शहरातील पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीचे दीर्घकालीन निराकरण करण्यासाठी प्रस्तावित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे डिझाईन तयार करण्यात आले असून, त्याला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (पुम्टा) व पुणे महानगरपालिका यांची मान्यता घेण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन अभिकरण मे. ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स पुढे आल्या आहेत. त्यांनी ‘पुणे आय टी सिटी मेट्रो रेल लि.’ ही विशेष उद्देश संस्था स्थापन केली आहे. प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरु करणेसाठी ट्राफिक डायव्हर्जन प्लॅन तयार करण्यात आला असून, या याबाबत दि. २६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या पुम्टाच्या बैठकीत याबाबतची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. हा प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

PMRDA : PMC : गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी जागा कोण ताब्यात घेणार?  : PMRDA म्हणते महापालिका तर महापालिका म्हणते PMRDA ने ताबा घेऊन द्यावा! 

Categories
Breaking News PMC पुणे

गणेशखिंड रस्ता रुंदीकरणासाठी जागा कोण ताब्यात घेणार?

: PMRDA म्हणते महापालिका तर महापालिका म्हणते PMRDA ने ताबा घेऊन द्यावा!

पुणे : विद्यापीठ चौकातील प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या विकास आराखड्याप्रमाणे हे रुंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक जागा ताब्यात घेण्यावरून मात्र संभ्रम  कायम आहे. कारण PMRDA हे काम महापालिकेवर सोपवत आहे. तर महापालिका म्हणते कि, ही सर्व जागा सरकारी आहे. त्यामुळे जागा ताब्यात घेणे हे PMRDA साठी सुलभ काम आहे. PMRDA ने जागा ताब्यात घेऊन आमच्याकडे सोपवली तर आम्ही रस्त्याचे काम करू.

: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रुंदीकरण आवश्यक

सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौक येथे गणेशखिंड रस्त्याने होणारी वाहतूक कोंडी विचारात घेऊन व दीर्घकालीन नियोजन करणेसाठी अस्तित्वातील पूल पाडून त्याऐवजी एकाच खाबावर (Pier) दुमजली पूलाचे (वर मेट्रो व त्या खाली दुहेरी वाहतुकीचा उड्डाणपूल) बांधकाम करणेसाठी सवलतकारा सोबत करावयाच्या पूरक करारनामा मसुद्यास महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचीव अस्तित्वातील पूल तोडणेस पुणे महानगरपालिकेची मान्यता घेवून सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील अस्तित्वातील दोन उड्डाणपुलाचे पाडकाम माहे जुलै-ऑगस्ट २०२० या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्राधिकरणामार्फत Traffic Diversion Plan तयार करण्यात आला असून सदर आराखड्यास  विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२६/१०/२०२१ रोजी  झालोन्या पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

गणेश खिंड रस्त्याची विकास आराखड्यातील रस्ता रुंदी ४५ मी. असून सध्याचा अस्तित्वातील रस्ता ३६ मी. रुंदीचा आहे. विद्यापीठ चौकामध्ये प्रस्तावित असलेल्या मेट्रो सह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चौक दरम्यान रस्त्याच्या मध्यभागी ११.०० मी रुंदीने बॅरीकेडस लावणे व सेनापती बापट चौक ते शिवाजीनगर पर्यंत ९.०० मी रुंदीने बॅरीकेडस लावणे आवश्यक असल्यामुळे अस्तित्वातील ३६.०० मी रुंद (पादचारी मार्गासह) रस्त्यावर वाहतुकीसाठी जास्तीत जास्त २ ते २.५ लेन उपलब्ध राहतील. गणेशखिंड रस्त्यावरील Peak Hour मधील वाहतूक वर्दळ पाहता उपलब्ध रस्ता रुंदी वाहतुकीसाठी पुरेशी होवू शकणार नाहीत व या भागात वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्यावर पर्याय म्हणून पुणे विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चौक (सौटी मॉल) या अंदाजे २५०मी. लांबीच्या भागात रस्ता रुंदीकरणकरूनच एकात्मिक दुमजली पुलाचे काम करणे शक्य होणार नाही असे सकृत दर्शनी दिसते.

PMRDA काय म्हणते?

पुणे महानगरपालिके मार्फत गणेशखिंड रस्त्याचे विकास आराखड्याप्रमाणे रुंदीकरण करणेसाठी प्रथम टण्यामध्ये विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चोक या सुमारे २५० मी लांबीमध्ये रस्त्याच्या डाव्या बाजूच्या भागात केंद्र व राज्य शासकीय संस्था असल्याने प्राधान्याने आवश्यक जागेचे भूसंपादन करावे व सदर ठिकाणच्या सेवा वाहिन्या स्थलांतरीत कराव्यात व सदर कामे पूर्ण झालेनंतर प्राधिकरणामार्फत या रस्त्याचे रुंदीकरण करावे अशा सूचना विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांनी दि.२६/१०/२०२१ रोजीच्या बैठकीमध्ये दिल्या आहेत. या  भागात रस्त्याचे रुंदीकरण करूनच मेट्रो / पुलाचे काम करावे, अन्यथा वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होईल असे सर्वांचे मत झाले आहे. तरी, विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चोक या सुमारे २५० मी लांबीमधील रस्त्याचे  रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया पुणे महानगरपालिकेमार्फत पूर्ण करून या प्राधिकरणास जागा हस्तांतर करावी म्हणजे या भागात मेट्रो / पुलाचे काम सुरु करणेसाठी आवश्यकतेप्रमाणे रुंदीकरण काम पूर्ण करणे शक्य होईल.

महापालिका काय म्हणते?

यावर महापालिकेचे म्हणणे आहे कि, रुंदीकरणासाठी आवश्यक सर्व जागा ही सरकारी आहे. PMRDA ही आमच्यापेक्षा मोठी संस्था आहे. त्यामुळे जागा ताब्यात घेण्यास PMRDA ला काही अडचण येणार नाही. त्यामुळे आम्हाला जागा ताब्यात घेऊन दिली तर आम्ही रस्त्याचे काम करू.

PMRDA : PMC : TOD झोन मध्ये दिलेल्या परवानग्यातून जमा झालेल्या रकमेपैकी 50% हिस्सा तात्काळ जमा करा  : PMRDA चे महापालिकेला आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे

TOD झोन मध्ये दिलेल्या परवानग्यातून जमा झालेल्या रकमेपैकी 50% हिस्सा तात्काळ जमा करा

: PMRDA चे महापालिकेला आदेश

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ प्रकल्प PPP तत्वावर हाती घेतला आहे. या मेट्रो प्रकल्पाची अंदाजे १३कि.मी. लांबीची मार्गिका हि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतून जात आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेमार्फत हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३ या प्रकल्पाच्या T.O.D Zone मध्ये येत असलेल्या जागांवरील बांधकाम परवानगी व अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करताना आकारण्यात येणा-या अधिमुल्याच्या रकमेपैकी प्राधिकरणाच्या हिश्याची ५०% रकम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास अदा करण्यात यावी. अशी मागणी प्राधिकरणाने महापालिकेकडे केली आहे. याअगोदर देखील मागणी करण्यात आली होती. त्यांनतर आयुक्त सुहास दिवसे यांनी महापालिकेला अजून एक  पत्र लिहीत ही रक्कम तात्काळ जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

स्थानकासभोवतालचे ५०० मी. परिघाचे क्षेत्र TOD झोन

प्राधिकरणाच्या पत्रानुसार  महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१ कक) अन्वये विकास योजना नकाशावर पुणे मेट्रो मार्गिका क्र.३ च्या आखणीसह स्थानके व स्थानकासभोवतालचे ५०० मी. परिघाचे क्षेत्र ट्रान्झौट ओरिएटेड डेव्हलपमेन्ट (T.O.D) झोन म्हणून दर्शविणेत आला आहे. या क्षेत्रात टी.ओ.डी बाबतच्या तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत. तसेच पुणे मेट्रो लाईन-३ (हिंजवडी – माण – शिवाजीनगर) विकास नियंत्रण नियमावलीमध्ये टी.ओ.डी अनुषंगाने अनुज्ञेय करण्यात आलेल्या अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकाकरिता अधिमुल्याचा दर निश्चित करणेबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.  T.OD Zone मध्ये येत असलेल्या जागांवरील बांधकाम परवानगी देताना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूरीसाठी आकारणात येणा-या अधिमुल्याच्या दर  निश्चित केला आहे. तो रहिवासी क्षेत्रासाठी 60% तर वाणिज्य वापर साठी 75% निश्चित केला आहे.

मार्च-२०२२ अखेर जमा होणारी संभाव्य रकमेची माहिती द्या

पत्रात पुढे म्हटले आहे कि,  वसूल झालेल्या अधिमुल्याच्या रकमेपैकी ५०% रक्कम संबंधित नागरी वाहतूक परिवहन प्रकल्पाशी संबंधित क्षेत्रातील नियोजन प्राधिकरणाकडे तर उर्वरित ५०% रकम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात यावे असे आदेश दिलेले आहेत. तसेच नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई मार्फत सदर प्रकल्पाच्या मेट्रो स्थानकाच्या परिसरातील T.O.D Zone चे नकाशे अधिप्रमाणित करून दिले आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो लाईन-३ या PPP प्रकल्पासाठी भूसंपादन, पुनर्वसन, सेवावाहिन्याचे स्थलांतर तसेच विविध परवानग्याची आर्थिक जबाबदारी शासन/PMRDA वर असल्याने त्यासाठी येणारा खर्च उपरोक्त T.O.D. अधिमुल्याच्या रकमेपैकी प्राधिकरणास प्राप्त होणा-या निधीतून करणे अभिप्रेत आहे. प्राधिकरणाने आजतागायत या प्रकल्पावर अंदाजे रु.३०० कोटी इतका खर्च स्वनिधीतून केला आहे. नजीकच्या कालावधीत आणखी रु.९०० ते १००० कोटी इतका निधी खर्चाचा अंदाज आहे. तरी, सदर मेट्रो प्रकल्पाच्या T.O.D Zone मध्ये येत असल्याल्या जागांवरील बांधकाम परवानगी व अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करताना आकारण्यात येणा-या अधिमुल्याच्या रकमेबाबत महानगरपालिका स्तरावर स्वतंत्र लेखा/हिशोब ठेवून त्यापैकी प्राधिकरणाच्या हिश्याची रक्कम वेळोवेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास अदा करण्यात यावी.  तसेच, या पोटी पुणे महानगरपालिकेकडे मार्च-२०२२ अखेर संभाव्य जमा होणारी संभाव्य अधिमुल्याची रक्कम बाबत या प्राधिकरणास अवगत करण्यात यावे. जेणेकरून या मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक निधीचा ताळमेळ घालणे शक्य होईल. तसेच, T.O.D Zone मधील आजतागायत दिलेल्या परवानग्या पोटी पुणे महानगरपालिकेकडे जमा झालेल्या अधिमुल्य रकमेपैकी या प्राधिकरणाचा ५०% निधी हिस्सा तातडीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे जमा करावा. असे आदेश देण्यात आले आहेत.