PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेने गेल्या 7 दिवसांत नागरिकांकडून साडे सहा लाखांचा दंड केला वसूल | कारण घ्या जाणून

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेने गेल्या 7 दिवसांत नागरिकांकडून साडे सहा लाखांचा दंड केला वसूल | कारण घ्या जाणून

PMC Solid Waste Management Department | पुणे | पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने सार्वजनिक जागी थुंकणे, कचरा जाळणे, अस्वच्छता करणे, अशा कारणांसाठी दंडात्मक कारवाई केली जाते. विभागाने ही कारवाई गंभीरपणे सुरु केली आहे. गेल्या 7 दिवसांत सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून 6 लाख 43 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandip Kadam) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)
पुणे महापालिकेने सार्वजनिक जागी स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता उपविधी तयार केली आहे. त्या नियमानुसार अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांस दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये सार्वजनिक जागी थुंकणे, लघवी करणे, कचरा जाळणे, कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण न करणे, नदीत राडारोडा टाकणे, अशा गोष्टींचा समावेश आहे. यासाठी 180 रुपयापासून ते 5 हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. यानुसार महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही कारवाई 2 ऑक्टोबर पासून सुरु केली आहे. (PMC Pune)
सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याबाबद्दल 17 लोकांकडून 17 हजार दंड वसूल करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्या 13 जणांकडून 2600 रुपये वसूल केले. कचरा जाळणाऱ्या 36 लोकांकडून 18000 वसूल करण्यात आले. कचऱ्याचे वर्गीकरण न केल्याबद्दल 89 लोकांकडून 33340 रुपये वसूल करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या 1289 लोकांकडून 4 लाख 34 हजार 670 रुपये वसूल करण्यात आले. बल्क वेस्ट जनरेटर कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद बाबत एकाकडून 5 हजार वसूल केले. बांधकाम राडारोडा टाकणाऱ्या 4 लोकांकडून 16 हजार वसूलण्यात आले. 23 लोकांवर प्लास्टिक कारवाई करत 1 लाख 15 हजार वसूल करण्यात आले. अशा एकूण 1479 लोकांवर दंड ठोठावत महापालिकेने 6 लाख 43 हजार रुपये वसूल केले. (Pune Municipal Corporation)
—-
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणे ही नागरिकांची देखील जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, अस्वच्छता करणे, कचरा जाळणे, अशा गोष्टी करू नयेत. असे आमचे आवाहन आहे. अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.
संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पुणे मनपा.
——