Helmet compulsory : पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती! : ४ वर्षांवरील सर्वांना हेल्मेट सक्तीचे

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती!

: ४ वर्षांवरील सर्वांना हेल्मेट सक्तीचे

पुणे: पुण्यात पुन्हा हेल्मेट सक्ती होणार आहे. शासकीय कर्मचारी, शाळा, कॉलेज, महानगरपालिका, महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या सर्वांना हेल्मेट बंधनकारक असणार आहे. ४ वर्षांवरील सर्वांना हेल्मेट सक्तीचे असणार आहे. हे आदेश १ तारखेपासून लागू होणार आहेत. अपघातात सर्वांत जास्त अपघात दुचीकी चालवणाऱ्या यांचे होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबतच्या आदेशामध्ये म्हटलंय की, वाहन अपघातामध्ये दगावणाऱ्या व्यक्तींमध्ये सुमारे ८० टक्के व्यक्ती या वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. कार चालकांच्या तुलनेने दुचाकी वाहन चालकाला अपघातात मृत्यू येण्याचा धोका सातपट जास्त आहे. जितके चाकी गार चालक ने अपमानात दगावतात, त्यापैकी सुमारे ६२ टक्के व्यक्तीना डोक्याला हेल्मेट नसल्यामुळे मृत्यू होतात. त्यामुळे हेल्मेट असल्यास अपघात झाल्यास जीव वाचण्याची शक्यता 80 टक्क्यांनी वाढते.

त्यामुळेच, जनतेस मार्गदर्शक ठरावे या दृष्टीने तसेच सह प्रवाशाच्या सुरक्षिता सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना किंवा ये जा करताना हेल्मेट आवश्यक असणार आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. या नियमाचे उल्लंघन केल्यास गंभीर नोंद घेण्यात येईल असे ऑर्डर मध्ये नमूद केले आहे.

Ukraine-Russia Conflict : युक्रेन मध्ये अडकले असल्यास या नियंत्रण कक्षाशी  संपर्क करा

Categories
social देश/विदेश पुणे महाराष्ट्र

युक्रेन मध्ये अडकले असल्यास या नियंत्रण कक्षाशी  संपर्क करा

: जिल्हा प्रशासनाचे आवाहन

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune District) कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन (Ukraine) देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील (Pune collector office) जिल्हा नियंत्रण कक्षाला (control Room) संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख (collector Dr Rajesh Deshmukh) यांनी केले आहे.

सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

 नवी दिल्ली येथील मदत कक्ष 

केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली, टोल फ्री क्र. 1800118797  23014105 / 23017905 situationroom@mea.gov.in

पुणे जिल्ह्यातील नागरिक किंवा विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक 

जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे दूरध्वनी 020-26123371ई मेल controlroompune@gmail.com

voter Registration : मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Categories
पुणे महाराष्ट्र

मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुणे : भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला असल्याने 5 डिसेंबर 2021 पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे.

भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्या आधारावर 5 जानेवारी 2022 रोजी विधानसभा मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमास मुदतवाढ मिळाल्याने आता पुन्हा 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना 5 डिसेंबर 2021 पर्यंत मतदार यादीत नावे नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे.

ऑनलाईन पद्धतीनेदेखील www.nvsp.in या संकेतस्थळावर नाव नोंदविणे, नावाची पडताळणी करणे किंवा नावांतील, पत्त्यांतील तपशिलांत दुरुस्त्याही करता येतील. मतदार यादी संदर्भातील दावे व हरकती 5 डिसेंबर 2021 पर्यंत स्विकारण्यात येतील आणि 20 डिसेंबरपर्यंत त्या निकालात काढण्यात येतील. यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी 2022 रोजी करण्यात येईल.

मतदारांनी विधानसभा मतदरसंघांच्या 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांतील आपल्या नावांचीही खात्री करुन घ्यावी. नाव नसल्यास ते त्वरीत नोंदवून घ्यावे; तसेच विहित पद्धतीने मृत व्यक्तींची किंवा दुबार नावेदेखील वगळावित. असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.