Vairag-Ukkadgaon road : Rajendra Raut : वैराग-उक्कडगांव रस्ता दुरुस्तीसाठी ५ कोटीचा निधी 

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

वैराग-उक्कडगांव रस्ता दुरुस्तीसाठी ५ कोटीचा निधी

: आमदार राजेंद्र राऊत यांची माहिती

बार्शी :  बार्शी तालुक्यातील वैराग-हिंगणी-मळेगांव-चिखर्डे-गोरमाळा-पांगरी-उक्कडगांव ते जिल्हा हद्द, हा ३० किमी. रस्ता दुरुस्ती करणेकामी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
राऊत म्हणाले, ५ कोटी रुपयांचा निधी हा, महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते व पूल परिक्षण व दुरुस्ती कार्यक्रम सन २०२१ – २०२२ अंतर्गत योजनेतर तरतूदी मधून रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमानुसार मंजूर करण्यात आला आहे.

: रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य

दरम्यान सद्य स्थितीत या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करणे त्रासदायक ठरते आहे. कारण रस्त्यावर जागोजागी खड्डे तयार झाले आहेत. लोकांना कसरत करूनच गाड्या चालवाव्या लागतात. नागरिकांची ओरड झाल्याने या अगोदर बऱ्याच वेळा रस्ता दुरुस्ती केली गेली, मात्र ती मलमपट्टी कुचकामी ठरली. नागरिकांचा त्रास काही कमी झाला नव्हता. कारण पाऊस पडून गेल्यावर पुन्हा खड्डे तयार होत गेले. आता ५ कोटी निधी मंजूर झाल्याने आता तरी रस्ता चांगल्या पद्धतीने दुरुस्त होईल. अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

Rajendra Raut : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत च्या विकासाबाबत दिले हे आश्वासन

Categories
Political महाराष्ट्र

ग्रामपंचायतीस विविध प्रकारच्या योजनांमधून निधी उपलब्ध करून देऊ

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांची ग्वाही

बार्शी : ग्रामपंचायतीस विविध प्रकारच्या योजनांमधून निधी उपलब्ध करून देऊन गावचा व तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. पंचायत समिति बार्शी, येथे तालुक्यातील सरपंच, पंचायत समिती सदस्य व अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार रूट यांनी ही ग्वाही दिली.

: अनेक सरपंचांनी आपले प्रश्न, समस्या सांगितल्या

या बैठकीत तालुक्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर विविध विकास कामे करताना येणाऱ्या अडी-अडचणी, प्रश्न जाणून घेऊन, त्यांवर मात करून गावचा विकास करण्यावर मी आमदार या नात्याने सर्वतोपरी मदत करीन असे अभिवचन दिले. ग्रामपंचायतीस विविध प्रकारच्या योजनांमधून निधी उपलब्ध करून देऊन गावचा व तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. या बैठकीत अनेक सरपंचांनी आपले प्रश्न, समस्या सांगितल्या. ते प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. गावातील पाण्याचा प्रश्न, रस्ते, गटारी, दिवाबत्ती, घरकुले, दलित वस्ती योजना, जिल्हा परिषद शाळांचा स्तर उंचावणे, पाझर तलाव, साठवण तलाव, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज आदी विषयांवर सरपंचां सोबत सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीस पंचायत समिती सभापती अनिल काका डिसले, गटविकास अधिकारी शेखर सावंत, उपसभापती  मंजुळा वाघमोडे, माजी उपसभापती अविनाश मांजरे ,प्रमोद वाघमोडे, ज्येष्ठ नेते ॲड. अनिल पाटील, इंद्रजीत चिकणे, उमेश बारंगुळे, सुमंत गोरे, बाजार समितीचे संचालक वासुदेव बापू गायकवाड व सरपंच बंधू-भगिनी उपस्थित होते.