PMP Bus | RakshaBandhan | रक्षाबंधन सणानिमित्त पीएमपीला ४ कोटीहून अधिक उत्पन्न 

Categories
Breaking News cultural social पुणे

PMP Bus | RakshaBandhan | रक्षाबंधन सणानिमित्त पीएमपीला ४ कोटीहून अधिक उत्पन्न

 

PMP Bus | RakshaBandhan | पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह पी.एम.आर.डी.ए. (PMRDA) हद्दीत बससेवा पुरविण्यात येते. रक्षाबंधन सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दरवर्षी प्रमाणे प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल कडून दि. ३० व ३१ ऑगस्ट २०२३ रोजी नियोजित १८३७ शेड्युल व्यतिरिक्त ९६ जादा बसेसचे नियोजन करून सदर बसेस गर्दीच्या मार्गांवर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पीएमपीएमएल च्या बससेवेला  ३० व ३१ ऑगस्ट २०२३ रोजी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. (PMP Bus | RakshaBandhan)

० व ३१ ऑगस्ट २०२३ रोजीची  प्राप्त उत्पन्न खालीलप्रमाणे

तारीख               बस संख्या         उत्पन्न
३० ऑगस्ट           १९३०           १,९५,२७,३८४
३१ ऑगस्ट           १९०१            २,१६,४४,८५३

रक्षाबंधन सणानिमित्त विशेषतः महिला प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घेतला. ३० ऑगस्ट ला १३ लाख ७३ हजार ८१९ प्रवाशांची नोंद झाली. तर ३१ ऑगस्ट ला १४ लाख ९६ हजार २८२ प्रवाशांची नोंद झाली. पीएमपीएमएल च्या बससेवेला असाच प्रतिसाद द्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.


News Title | PMP Bus | Raksha Bandhan | More than 4 crore income to PMP on the occasion of Rakshabandhan festival

Raksha Bandhan | PMPML | रक्षाबंधन निमित्त पीएमपीकडून ज्यादा बसेस चे नियोजन

Categories
Breaking News cultural social पुणे

Raksha Bandhan | PMPML | रक्षाबंधन निमित्त पीएमपीकडून ज्यादा बसेस चे नियोजन

Raksha Bandhan | PMPML | ​पुणे  पिंपरीचिंचवड शहरातील नागरिकांसाठी बुधवार३० ऑगस्ट ला रक्षाबंधन (Raksha Bandhan) सणानिमित्त परिवहन महामंडळामार्फत (PMPML Pune) मार्गावर धावणाऱ्या दैनंदिन बससंख्येपेक्षा जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.  (Raksha Bandhan | PMPML) 

दरवर्षी रक्षाबंधनचे दिवशी मोठ्या संख्येने प्रवासीवर्ग प्रवास करीत असतोयास्तवदरवर्षी प्रमाणे परिवहन महामंडळाने रक्षाबंधनचे दिवशी प्रवाशांची जास्तीत जास्त सोय होण्यासाठी दैनंदिन संचलनात असलेल्या नियोजि १८३७ बसेस व्यतिरिक्त जादा ९६ बसेसअशा कू १९३३ बसेसचा ताफा महामंडळाकडून मार्गावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहेसदरील जादा बसेस ह्या गर्दीच्या मुख्य बस स्थानकांवरून कात्रज, चिंचवड, निगडी, सासवड, हडपसर, वाघोली, जेजुरी, आळंदी, भोसरी, तळेगांव, राजगुरूनगर व देहूगांव इत्यादी ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. (PMPML Pune) 

याकरिता वाहकचालकपर्यवेक्षकीय सेवक यांच्या साप्ताहिक सुट्टया रद्द करण्यात आलेल्या आहेततसेच महत्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेतरक्षाबंधन बुधवार३० ऑगस्ट २०२ रोजीअसल्यामुळे यावर्षी ३०  ३१ ऑगस्ट २०२ या दिवशी जादा बसेसचे नियोजन केले आहेतसेच महामंडळाकडील अधिकारीलिपीक व इतर कर्मचारी यांची महत्वाच्या स्थानकांवर व थांब्यांवर प्रवाशांना मार्गदर्शन करणेकामी व वाहतूक नियंत्रण करणेकामी नेमणूक करण्यात आली आहे. (PMPML Bus) 

तरी पीएमपीएमएल कडून बुधवारदिनांक ३० ऑगस्ट २०२ रोजी रक्षाबंधन यासणाचे दिवशी उपलब्ध करण्यात आलेल्या जादा बसेसची नोंद घेवून जास्तीत जास्त प्रवासी नागरिकांनी सार्वजनिक प्रवासी वाहतूक बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीच्या वतीने करण्यात आले आहे. 

——

News Title | Raksha Bandhan | PMPML | More buses planned by PMP on the occasion of Rakshabandhan