Dr Mohan Agashe | सध्या माणसे दिसतात; पण ती माणसे नसतात | डॉ. मोहन आगाशे यांची खंत

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Dr Mohan Agashe  | सध्या माणसे दिसतात; पण ती माणसे नसतात  | डॉ. मोहन आगाशे यांची खंत

Dr Mohan Agashe |  आभासी जग गतीने वाढत असून माणूसकी लोप पावत चालली आहे. सध्या माणसे दिसतात पण ती माणसे नसतात, अशी खंत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Dr Mohan Agashe) यांनी व्यक्त केली.  लेखक, कवी गेल्यानंतर खरा जन्म त्यांचा होतो. त्यांचे साहित्य नंतर जीवंत होते. माणसाला विचार करण्याचे काम खर्‍या अर्थाने सात्यिक, कवी करतात असेही यावेळी त्यांनी सांगितले.
शब्दशिवार प्रकाशनतर्फे (Shabdshivar Publication) प्रकाशित व ज्येष्ठ भाष्यकवी रामदास फुटाणे (Ramdas Futane) लिखित ‘वर्षा, ईर्ष्या आणि गोहत्ती’ (Varsha, Irshalwadi ani Gohatti) या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते रविवारी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे (Dr Randhir Shinde), प्रकाश इंद्रजित घुले, प्रभाकर वाईकर  यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी उपहास, व्यंग आणि विडंबानातून वर्तमान राजकारण  आणि समाजकारणावर स्तंभलेखनातून भाष्य करणारे प्रवीण टोकेकर (Pravin Tikekar) (ब्रिटिश नंदी), श्रीकांत बोजेवार (Shrikant Bojewar) (तंबी दुराई) आणि भाष्यकवी  रामदास फुटाणे यांच्याशी  मुक्त संवाद करण्यात आला.  महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (Maharashtra Sahitya Parishad) कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी (Milind Joshi) यांनी त्यांचीशी संवाद साधला.
प्रसंगी प्रवणी टोकेकर आणि श्रीकांत बोजेवार यांचा यावेळी ‘संत नामदेव’ सन्मान पुरस्कार डॉ. आगाशे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम उपस्थित होते.
डॉ. आगाशे म्हणाले, लेखक कवी कमीत कमी शब्दात मांडणी करतो.  फुटाणे हे कमी शब्दात माणसाला, राजकारण्यांना जागे करतात. त्यांच्या शब्दाशब्दात ताकत भरलेली आहे. त्यांचे साहित्य हे विचार करायला भाग पाडतात. रामदास फुटाणे म्हणाले,  लहाणपणापासूनच साहित्य वाचणाची आवड होतीत्र. दत्तु बांधेकर यांचे साहित्य वाचले आणि माझे पाहिले साहित्य मी त्यांना अर्पण केले. सध्या राजकारणात संताजी-धनाजी सापडत नाही. सगळे घाशीराम कोतवाल सापडतात, अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.
मुक्त संवादात फुटाणे म्हणाले, अवती भोवती घडणारे ‘जत्रा’ वर लिहिण्यास सुरुवात केली. अनेक वृत्तपत्रातून लिहिण्याची संधी मिळाली. सुरुवातीला वात्रटिका लिहित गेलो.  सध्या शिंदे, पवार, ठाकारे यांचे मुलं काय म्हणाली, यावरच आपले लक्ष आहे. आपली मुले काय करतात यात जास्त कोणी रस घेत नाही. राजकारण हा त्यांचा व्यवसाय आहे.  अतिशयोक्ती वास्तवाचे अंतर कमी झाले आहे. सध्या फार कमी साहित्यिक झाले असून लेखनिक जास्त झाले आहेत. तुमच्या मृत्यूनंतर जास्त वाचले गेले, तर  तुम्ही खरे साहित्यिक आहे, असेही यावेळी ते म्हणाले. मराठी साहित्यात विविधता आली पाहिजे. आजही ग्रामीण भागात चांगले लिहिणारे लेखक आहेत. जगण्याची अनुभुती ज्वलंत असली पाहिजे. सध्या जगण्यात नाटकीपणा आला आहे. पोलिस विभागात काल्पनिक नावे देऊन लिहिण्यासारखे भरपूर काही साहित्य आहे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार यांच्याबद्दल भरपूर लिहिले. मात्र यांच्याकडून कोणताही विरोध मला झाला नाही असेही यावेळी त्यांनी सांगितले.
  प्रविण टोकेकर म्हणाले, वर्तमानातील भाष्य करणारे लिखान हवे. मी लिहित असताना कोणत्याही राजकारण्यांनी विरोध दर्शविला नाही. असे विविध उदाहरणे देत त्यांनी सांगितले. राजकारण्यांवर व्यंगात्मक लिखाण केल्यावर त्यांना राग येत नाही. आणि ते दाखवतदेखील नाही. मात्र कायकर्त्यांना राग अनावर होतो. ते फोन करुन शाब्दिक सत्कारदेखील करतात, असा अनुभव यावेळी त्यांनी सांगितला. राजकारण्यांची खिलाडू वृत्तीने ते घेतात. मात्र साहित्यकावर लिहिल्यावर त्यांना राग अनावर होऊन लगेच व्यक्त होतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अपमान करणे म्हणजे विनोद करणे ही पद्धत सध्या सुरु आहे.
बोजेवार म्हणाले, सध्या विनोद समजून घेण्याची पातळी खालवली आहे. आपण व्यक्त होण्याची गरज आहे.  वाचकांना प्रतिसाद चांगला मिळतो. आम्हाल डेडलाइनची सवय लागली आहे. लिहिण्यासाठी भरपूर विषय आहे. विषयाला तुटवडा नाही. लेखकासाठी वाचन हा रियाज आहे. या रियाजामुळेच आज लिखान सुरु आहे. रामदास  फुटाणे यांनी  काटेरी चेंडू ही कविता सादर करुन कार्यक्रमाचा समारोप केला. रणधीर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक इंद्रजीत घुले यांनी केले. मान्यवरांचा सत्कार संजय ढेरे व गौरव फुटाणे यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.