Order of transfers: अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत अतिरिक्त आयुक्तांचा महत्वाचा आदेश

Categories
Breaking News PMC पुणे

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत अतिरिक्त आयुक्तांचा महत्वाचा आदेश

पुणे : पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या करणेबाबत विनंती अर्ज, शिफारशी प्राप्त होत आहेत. मात्र सद्यस्थितीत कोव्हिड-१९ व पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने पुणे महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या करणेबाबत नियमीत बदली प्रक्रियेवेळी विचार करता येईल. त्यामुळे कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्याने किंवा खात्याने बदलीबाबत विनंती अर्ज  किंवा प्रस्ताव सादर करु नयेत. असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत.

: असे आहेत आदेश

पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील श्रेणी १ ते श्रेणी ३ मधील अधिकारी/कर्मचारी यांच्या नियतकालिक बदल्यांचे धोरण मा. महापालिका सभेने ठरावान्वये मंजूर केलेले आहे. पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील श्रेणी – ब ते श्रेणी – ड मधील अधिकारी/कर्मचारी यांचे सेवाविषयक बाबी व प्रकरणांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार  अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना  सुपूर्त केलेले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे सद्यस्थितीत कोव्हिड-१९ व पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे कामकाज मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने पुणे महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या करणेबाबत नियमीत बदली प्रक्रियेवेळी विचार करता येईल. त्यामुळे कोणत्याही अधिकारी / कर्मचाऱ्याने / खात्याने बदलीबाबत विनंती अर्ज, प्रस्ताव सादर करु नयेत. असे आदेशात म्हटले आहे.

PMC : Citizens : महापालिका भवन, क्षेत्रिय कार्यालयात येण्यास नागरिकांना प्रतिबंध!  

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका भवन,  क्षेत्रिय कार्यालयात येण्यास नागरिकांना प्रतिबंध!

: अत्यावश्यक काम आणि दोन डोस पूर्ण झालेल्या लोकांनाच दिला जाणार प्रवेश

पुणे : शहरात कोरोनाचा प्रसार वेगाने होताना दिसतो आहे. खास करून omicron बाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने आवश्यक उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आणि गर्दी होऊ नये म्हणून महापालिका भवन, क्षेत्रिय कार्यालयामध्ये नागरिकांना मज्जाव करण्यात आहे. अत्यावश्यक काम असेल आणि लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या लोकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी हे आदेश जारी केले आहेत.

: असे आहेत आदेश

कोराना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच कोरोना विषाणूचा नवा प्रकार ‘ ओमायक्रॉन ( Omicron ) ‘ आढळून आला असून व जागतिक आरोग्य संघटना (W.H.O. ) ने सदर विषाणू प्रसारास Variant of Concern म्हणून जाहीर केले आहे.  विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये यास्तव या विषाणू विरोधी प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याने पुणे महानगरपालिका स्तरावर खालील प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरिकांची एक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका मुख्य इमारतीत/विविध परिमंडळ/विविध क्षेत्रिय कार्यालयात येणा-या अभ्यांगत/नागरिकांना (निर्वाचित सदस्य, पदाधिकारी वगळून) अत्यावश्यक काम वगळता कार्यालयात येण्यास प्रतिबंधक करण्यात येत आहे. तथापि, बैठकीकरीता निमंत्रित केलेल्या नागरिकांना संबंधित विभाग/कार्यालय प्रमुख यांनी प्रवेश पत्र देण्याची व्यवस्था करावी.
केवळ कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा (डोस) पूर्ण झालेल्या अभ्यांगत/ नागरिकांनाच खात्री करून प्रवेश देण्यात यावा.
अभ्यांगत/नागरिक इ. यांनी प्रत्यक्ष कार्यालयात न येता आपले म्हणणे , तक्रार , सूचना या लेखी स्वरुपात ईमेलद्वारे  संबंधित विभागास पाठवावे.

PMC: Transfers orders: अधिकार नसताना अतिरिक्त आयुक्तांच्या परस्पर खातेप्रमुख सेवकांच्या करताहेत बदल्या

Categories
Breaking News PMC पुणे

अधिकार नसताना अतिरिक्त आयुक्तांच्या परस्पर खातेप्रमुख सेवकांच्या करताहेत बदल्या

:खाते प्रमुखांवर  प्रशासकीय कारवाईचा अतिरिक्त आयुक्तांचा इशारा

पुणे : पुणे महानगरपालिका प्रशासनाचे बदली करणेस सक्षम अधिकारी म्हणून अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना अधिकार देण्यात आले आहेत. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी  अधिकारी/कर्मचारी यांचे बदलीचे आदेश पारित केल्यानंतर काही खातेप्रमुख बदलीने नियुक्त सेवकांच्या खातेस्तरावर इतर विभागात परस्पर पुन्हा बदल्यांचे आदेश प्रसृत करतात. ही बाब चुकीची असल्याने आगामी काळात खाते प्रमुखांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल. असा इशारा महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिला आहे.

: बदल्यांचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांना

पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील श्रेणी १ ते श्रेणी ३ मधील अधिकारी/कर्मचारी यांच्या नियतकालिक बदल्यांचे धोरण महापालिका सभेने  मंजूर केलेले आहे. पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील श्रेणी – ब ते श्रेणी – ड मधील अधिकारी/कर्मचारी यांचे सेवाविषयक बाबी व प्रकरणांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना सुपूर्त केलेले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासनाचे बदली करणेस सक्षम अधिकारी म्हणून अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी अधिकारी/कर्मचारी यांचे बदलीचे आदेश पारित केल्यानंतर काही खातेप्रमुख बदलीने नियुक्त सेवकांच्या खातेस्तरावर इतर विभागात/खात्यात परस्पर पुन्हा बदल्यांचे आदेश प्रसृत

करतात.  सुपूर्त केलेले बदलीचे अधिकार बाबत अवलोकन  केल्यास खातेप्रमुख अधिकार नसताना बदली आदेश पारित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. वरिष्ठानी दिलेल्या आदेशात परस्पर फेरबदल करणे तसेच वरिष्ठांचे आदेशाची अंमलबजावणी न करणे ही बाब गंभीर व  आदेशाचे उल्लंघन करणारी असून, प्रशासकीयदृष्ट्या योग्य ठरत नाही.
तरी, सर्व संबंधित खातेप्रमुख यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या बदली आदेशानुसार अधिकारी/ कर्मचारी यांना बदलीचे खात्यात रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करावे. तसेच बदल्यांचे आज्ञापत्रामध्ये / आदेशामध्ये खातेप्रमुख यांनी परस्पर फेरबदल करू नयेत. अशाप्रकारे फेरबदल केल्याचे / बदली आज्ञापत्राची / आदेशाची अंमलबजावणी न केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित खातेप्रमुख यांना जबाबदार धरून त्यांचेविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. असा इशारा महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिला आहे.

PMC : Meeting Minutes : बैठकांचे इतिवृत्त तात्काळ तयार करावे लागणार  : महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचे निर्देश 

Categories
Breaking News PMC पुणे

बैठकांचे इतिवृत्त तात्काळ तयार करावे लागणार

: महापालिका अतिरिक्त आयुक्त यांचे निर्देश

पुणे : महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या कडून वेगवेगळ्या विभागासोबत बैठका घेण्यात येतात. मात्र त्याचे इतिवृत्त वेळेवर दिले जात नाही. त्याला बराच कालावधी लागतो. यापुढे मात्र हे इतिवृत्त तात्काळ तयार करावे लागणार आहे. तसे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

: असे आहेत आदेश

महापालिका आयुक्त व  अति. महापालिका आयुक्त यांचे कार्यालयात मनपाच्या संबंधित विभागाच्या विविध विषयांबाबत बैठका आयोजित करण्यात येतात. सदर बैठकीस मंबंधित विभागाचे खातेप्रमुख व इतर विभागाकडील अधिकारी/कर्मचारी उपस्थितीत असतात. तरी संबंधित कार्यालयाकडील विविध विषयांबाबत बैठका आयोजित करताना संबंधित विभागाकडील लघुलेखकाने बैठकीचे इतिवृत्त घेणेस उपस्थित राहून बैठकीस उपस्थितीत असणारे अधिकारी/कर्मचारी यांची स्वाक्षरी घेणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे. तसेच संबंधित विभागाकडुन बैठकीचे इतिवृत्त बैठकीनंतर त्वरित तयार करण्यात येऊन बैठकीच्या अध्यक्षांच्या मंजूरीस्तव सादर करण्याची दक्षता घ्यावी. असे आदेशात म्हटले आहे.