Bandatatya karadkar : बंडातात्या कराडकर यांच्या विरुद्ध पुणे न्यायालयात पहिला खटला दाखल

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

बंडातात्या कराडकर यांचे विरुद्ध पुणे न्यायालयात पहिला खटला दाखल

पुणे : पुणे महापालिकेच्या मा. नगरसेविका ऍड. रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंडातात्या कराडकर यांनी ०३.०२.२०२२ रोजी राजकीय महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचे विरुद्ध पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी  यांचे न्यायालयात खटला दाखल केलेला आहे. सदर प्रकरणात न्यायालयाने सदर प्रकाराची दखल घेऊन आरोपींवर कडक शासन करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.

प्रस्तुत प्रकरणात फिर्यादी तर्फे ऍड विजयसिंह ठोंबरे, ऍड हितेश सोनार, ॲड दिग्विजयसिंह ठोंबरे व विष्णू होगे काम पाहत आहे.

Rupali Patil : NCP : रुपाली पाटील यांचा अधिकृतपणे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश  : अजित पवार, जयंत पाटील यांची उपस्थिती 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

रुपाली पाटील यांचा अधिकृतपणे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश

: अजित पवार, जयंत पाटील यांची उपस्थिती

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडल्यानंतर रुपाली पाटील  (Rupali Patil Thombre) यांनी गुरुवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. पुण्यातील मनसेच्या धडाडीच्या महिला कार्यकर्त्या म्हणून रुपाली पाटील यांची ओळख होती. त्या मनसेच्या पुणे शहराच्या महिला सेनेच्या उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक राहिल्या आहेत.

पुणे महापालिकेच्या  (PMC) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पण मनसेच्या पुण्यातील नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून आपण मनसे सोडत असल्याचं रुपाली पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. पण आपण कोणत्या पक्षात प्रवेश करु हे त्यांनी उघड केलं नव्हतं. पण आज त्यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Rupali Patil : पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय!  : रुपाली पाटील यांचे सूचक ट्विट 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय!

: रुपाली पाटील यांचे सूचक ट्विट

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पुण्यातील महिला आघाडीच्या डॅशिंग नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare ) या अखेर महाविकास आघाडीत स्थिरावणार असल्याचं आता निश्चित झालं आहे. खुद्द रुपाली पाटील यांनीच ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे. रुपाली पाटील यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्या पुढील वाटचालीबाबत अनेक शक्यता आणि चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर सर्व चर्चांना रुपाली पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. रुपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

रुपाली पाटील यांनी याबाबतच एक सूचक ट्विट केलं आहे. “आज शरद पवार साहेबांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत; हो म्हणूनच ठरलंय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार…”, असं ट्विट रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलं आहे. ट्विटमध्ये पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलला देखील टॅग केलं आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असतानाच पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

रूपाली पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. तसेच मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्या कार्यरत होत्या. मंगळवारी त्यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला होता.

 

Rupali Patil : Vasant More : शिवसेना की राष्ट्रवादी? कुठे जाणार रुपाली पाटील?  : मनसेला खिंडार वगैरे काही पडलेले नाही : वसंत मोरे 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शिवसेना की राष्ट्रवादी? कुठे जाणार रुपाली पाटील?

: मनसेला खिंडार वगैरे काही पडलेले नाही : वसंत मोरे

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष रुपाली पाटील-ठोंबरे  (Rupali Patil) यांनी आपला सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या राजीनाम्याचं वैयक्तिक कारण असल्याचं स्पष्ट केलं. तसेच, स्वत:मध्ये बदल व्हावा, यासाठीच आपण मनसेला रामराम केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे  यांना पाहून राजकारणात आले. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही. ती माझी वृत्ती नसल्याचे पाटील यांनी सांगितले. राजीनामा देण्याआधी माझ्या मनातील खदखद राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवली आहे. पक्षातील रिकामटेकड्या नेत्यांकडून आपल्याला त्रास होत असल्याचे मला हा निर्णय घ्यावा लागला, अशी कबुली देखील रुपाली पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रुपाली पाटील यांच्या या विधानावर मनसेचे पुणे शहर अध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. रुपाली पाटील यांच्या जाण्यानं मनसेला खिंडार वगैरे  पडलेलं नाही. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटलांनी राजकीय आत्महत्या केली आहे. रुपाली पाटील- ठोंबरे यांचा राजीनामा द्यायचाच होता. हा सगळा त्यांचा प्री-प्लॅन आहे. तसेच रुपाली पाटील यांनी रिकामटेकडे कोण हे त्यांनी एकदा जाहीर करावं असं, आव्हानही वसंत मोरे यांनी दिले आहे.

रुपाली ठोंबरे यांनी मंगळवारी सायंकाळी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला. मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे पत्रात लिहिलं आहे. तसेच आपले आशीर्वाद आणि “श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल’ अशी भावना व्यक्त करत ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे.

दरम्यान, राजीनामा देण्याआधी रुपाली या युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची सह्याद्री अतिथिगृहात भेट घेऊन चर्चा केल्याने त्या शिवसेनेत जाणार, याची चर्चा रंगली आहे. सरदेसाई यांच्या आधी रुपाली पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटल्या आणि राष्ट्रवादीतील प्रवेशाचा मुहूर्तही ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रुपाली या आपल्या मनगटावर घड्याळ की शिवबंधन याकडे लक्ष लागले आहे.