Hawkers : Dheeraj Ghate : फेरीवाल्यांना दिलासा : जुन्या नियमाप्रमाणेच भाडे आकारणार  : स्थायी समितीची मान्यता 

Categories
Breaking News PMC Political पुणे

फेरीवाल्यांना दिलासा : जुन्या नियमाप्रमाणेच भाडे आकारणार

: स्थायी समितीची मान्यता

पुणे : शहरातील फेरीवाल्याना स्थायी समितीने चांगलाच दिलासा दिला आहे. नवीन दरवाढीमुळे फेरीवाल्यांचे कंबरडे मोडले होते. यातून फेरीवाल्यांची सुटका होणार आहे. सर्व फेरीवाल्यांचे भाडे आता जुन्या नियमाप्रमाणेच आकारले जाणार आहे. म्हणजे या लोकांना आता दिवसाला 100 रुपये न दयावे लागता वर्षाला 240 रुपये द्यावे लागणार आहेत. भाजपचे नगरसेवक आणि माजी सभागृह नेता धीरज घाटे यांनी या बाबतच्या प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला होता. समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. अशी माहिती समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

: धीरज घाटे यांचा प्रस्ताव

महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शहरात फेरीवाला धोरण लागू करण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेने फेरीवाल्यांच्या परवाना शुल्कात देखील वाढ केली आहे. पूर्वी फेरीवाल्यांकडून वर्षाला सरसकट 240 रुपये आकारले जात होते. मात्र नवीन नियमानुसार हे भाडे दिवसाला 100 रुपयांपर्यंत गेले आहे. त्यातच कोरोनाचा कहर गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांचे शुल्क जुन्या नियमानुसार करावे, असा प्रस्ताव धीरज घाटे यांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. त्यांच्या प्रस्तावानुसार पुणे मनपाचे नव्याने दरभाडे आकारण्यात आले आहे. फेरीवाल्यांच्या दैनंदिन उत्पन्नापेक्षा हे भाडे अधिक आहे. त्यामुळे स्थिर हातगाड्या व बैठे परवाना धारकांना जुन्या नियमाप्रमाणे भाडे आकारण्यात यावे. या प्रस्तावाला मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार आता या लोकांना आता दिवसाला 100 रुपये न दयावे लागता वर्षाला 240 रुपये द्यावे लागणार आहेत. फेरीवाल्याना हा दिलासा मानला जात आहे.
—–
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. यामुळे पथारी वाल्यांची आर्थिक स्थिती खूप नाजूक झाली आहे. त्यातच महापालिकेचे भाडे देखील त्यांच्या दररोजच्या उत्पन्नापेक्षा जास्तच आहे. त्यामुळे हे भाडे कमी करण्याबाबत प्रस्ताव दिला होता. या अगोदर देखील जून 2019 मध्ये प्रशासनाला प्रस्ताव दिला होता. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मुख्य सभेत देखील आम्ही हा प्रस्ताव मंजूर करून घेऊ आणि त्याची अंमलबजावणी करू.

         धीरज घाटे, नगरसेवक

Abhay Yojana : Standing Committee : अभय योजनेला 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ : स्थायी समितीची मान्यता

Categories
Breaking News PMC पुणे

अभय योजनेला 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

स्थायी समितीची मंजुरी

पुणे : महापालिकेच्या अभय योजनेला आणखी महिना भराची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ 28 फेब्रुवारी पर्यंत असेल. स्थायी समिती सदस्या, नगरसेविका अर्चना तूषार पाटील यांनी यासंबंधीचा प्रस्ताव दिला होता. त्याला उपसूचना देण्यात आली. मंगळवारच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप या योजनेचा फायदा घेतला नाही, त्यांनाही आता हा लाभ मिळू शकणार आहे. दरम्यान स्थायी समितीने सरसकट सर्वानाच या योजनेचा लाभ मिळावा असे म्हटले आहे, मात्र यावर आयुक्त काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

: 26 जानेवारी पर्यंत होता कालावधी

पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी पुणे महानगर पालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत अभय योजना लागू करण्यात आली आहे. त्याची मुदत 26 जानेवारीला संपणार आहे. या अभय योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा या उद्देशाने या योजनेची मुदत अजून 15 दिवसांनी वाढविण्यात यावी अशी मागणी नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी केली होती.  हा प्रस्ताव स्थायी समितीत देण्यात आला होता. याला उपसूचना देत मुदतवाढ 28 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आली. या मागणीला स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह सर्व स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिका आयुक्त यांनी अभय योजना ही निवासी मिळकती पुरती मर्यादित ठेवली होती. समिती सदस्यांनी मात्र सरसकट सर्वांनाच याच लाभ मिळावा अशी मागणी केली. यामध्ये कमर्शिअल चा ही समावेश आहे. मात्र आयुक्त यावर काय निर्णय घेणार. हे महत्वाचे आहे.

या योजनेला मुदत वाढ मिळाल्या मुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. सध्या कोरोना मुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अभय योजने मुळे नागरिकांना दिलासा मिळेल असे नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी सांगितले.

PMC : Shivaji Road : भाजप आमदाराचा प्रस्ताव दोन महिने पुढे ढकलला 

Categories
Breaking News PMC Political पुणे

भाजप आमदाराचा प्रस्ताव दोन महिने पुढे ढकलला

: स्थायी समितीत दिला होता प्रस्ताव

पुणे : शहरातील शिवाजी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी 1 कोटी चे वर्गीकरण करावे, असा प्रस्ताव भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समिती समोर ठेवला होता. मात्र समितीने हा प्रस्ताव दोन महिने पुढे ढकलला आहे. आता यावर पुढील आर्थिक वर्षातच निर्णय होणार आहे. सत्ता हातात असूनही प्रस्ताव पुढे ढकलला जातो, याबाबत राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

: 1 कोटीचे वर्गीकरण देण्याचा प्रस्ताव

कसबा विधानसभा मतदार संघातील आणि प्रभाग 15 क मधील शिवाजी रस्त्याचे डांबरीकरण करावे, या कामासाठी 1 कोटीचे वर्गीकरण करावे, असा प्रस्ताव भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. वर्गीकरणाच्या माध्यमातून ही रक्कम उपलब्ध करून देण्याची मागणी टिळक यांनी केली होती. अंदाजपत्रकात सारस बाग ते अप्पा बळवंत चौक उड्डाणपुल बांधण्यासाठी 1 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. ही तरतूद या रस्त्यासाठी द्यावी, असे प्रस्तावात म्हटले होते. शिवाय मुख्य सभा मान्यता देईल, या भरवश्यावर आयुक्तानी या ठरावाची कार्यवाही करावी. असे ही यात नमूद केले होते. मात्र समितीने हा प्रस्ताव दोन महिने पुढे ढकलला आहे. आता यावर पुढील आर्थिक वर्षातच निर्णय होणार आहे. सत्ता हातात असूनही प्रस्ताव पुढे ढकलला जातो, याबाबत राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.