AAP Pune | आम आदमी पक्षाचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Categories
Breaking News Political social पुणे

AAP Pune | आम आदमी पक्षाचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

 

AAP Pune | गुजरात आणि गोवा यासारख्या राज्यात काही प्रमाणात विधानसभेच्या निवडणुका जिंकतानाच, अनेक राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party pune) नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच काही ग्रामपंचायती देखील आम आदमी पक्षाच्या ताब्यात आल्या आहेत. आणि भविष्यात यात आणखी जोमाने वाढ होईल असे सध्या चित्र आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय संघटन सचिव संदीप पाठक आणि महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया यांच्याकडून नियमितपणे मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्रातही लवकरच आम आदमी पक्षाचा झाडू इतर पक्षांची राजकारणाच्या मैदानातून सफाई करताना दिसेल. असे आम आदमी पक्षाच्या ११ वा वर्धापन दिन प्रसंगी बोलताना आम आदमी पक्षाचे पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे (Sudarshan Jagdale) यांनी सांगितले. (AAP Pune)

अकरा वर्षाच्या अल्पशा कालखंडात दिल्ली आणि पंजाब सारख्या दोन राज्यात एक हाती सत्ता मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाने आज आपला वर्धापन दिन आणि संविधान दिन अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात आपटे रोड येथील सेंट्रल पार्क च्या हॉलमध्ये साजरा केला. यावेळी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार, राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत आणि महाराष्ट्र सचिव प्राजक्ता देशमुख या उपस्थित होत्या. तसेच संपूर्ण पुणे शहरातील सर्व राजकीय पक्षातील आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. इंडिया अगेंस्ट करप्शन सारख्या चळवळी च्या प्रेरणेतून निर्माण झालेला हा पक्ष हा संपूर्ण देशभरात वेगाने आपली घोडदौड करत आहे. अकरा वर्षाच्या अल्पशा काळात पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यापर्यंतची मजल मारली आहे. ही मजल मारताना पक्षाने दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यात संपूर्ण बहुमताने सत्ता मिळवली आणि पक्षाची विचारसरणी जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला. दिल्ली सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सरकारी शाळांचा दर्जा सुधारणे, दिल्लीतील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने महिलांसाठी मोफत बस सेवा, मोफत वीज, मोफत पाणी, मोहल्ला क्लिनिक, अनेक सरकारी दाखले तसेच कागदपत्रे यांची घरपोच सुविधा देणे यासारख्या जनहिताच्या अनेक योजना या अकरा वर्षाच्या कालावधीत पक्षाने राबवल्या ज्या अत्यंत लोकप्रिय झाल्या असून नागरिकांना या सर्व भ्रष्टाचार विरहित योजनांचा खऱ्या अर्थाने फायदा झालेला आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार येण्यापूर्वी २०१४-१५ चे बजेट हे ३५,००० करोडचे होते जे आज वाढून २०२२-२३ मध्ये ७९,००० करोडचे झाले आहे यावरून दिल्ली सरकारच्या गुड गव्हर्नन्स चा प्रत्यय येतो.

भविष्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांचा विचार करता दिल्ली सरकारने राज्यात अनेक ठिकाणी चार्जिंग पॉइंट्स बनवण्यास सुरुवात केली आहे, दिल्ली मधील अनेक तलावांचे सुशोभीकरण करत दिल्ली सरकारने एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे. उदयन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दिल्ली सरकारतर्फे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी ची सुरुवात देखील करण्यात आली आहे. दिल्ली आणि पंजाब या दोन्ही राज्यात सरकारी क्षेत्रातील अनेक नोकऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिला जात आहेत. शिक्षक भरती सारखा विषय उत्कृष्टपणे हाताळून दोन्ही राज्यांना अधिकाधिक सुशिक्षित बनवण्याचा आटोकाट प्रयत्न आम आदमी पक्षाच्या सरकारतर्फे केला जात आहे. जुनी पेन्शन योजना देखील दिल्ली सरकारने पुन्ह:च्या लागू करताना सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

 

अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात स्वतः लक्ष घातले असल्याने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आम आदमी पक्षातर्फे उमेदवार दिले जाणार आहेत याची सुरुवात लवकरच येऊ घातलेल्या निवडणुकांपासून सुरू होईल. तसेच आम आदमी पक्ष हा लवकरच पुणे महानगरपालिकेत देखील आपले खाते उघडेल अशी आशा यावेळी बोलताना पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.शाहीन पठाण, ॲड.अमोल काळे आणि किरण कद्रे यांनी केले.