Vishrantwadi-Dhanori road | Dr Siddharth Dhende | विश्रांतवाडी-धानोरी रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Vishrantwadi-Dhanori road | Dr Siddharth Dhende | विश्रांतवाडी-धानोरी रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

| काम सुरू करण्याला पुणे महापालिका आयुक्तांची परवानगी

|  माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

Vishrantwadi-Dhanori road | Dr Siddharth Dhende | विश्रांतवाडी चौकातून धानोरी कडे जाणार्‍या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग (Vishrantwadi-Dhanori road) अखेर मोकळा झाला आहे. या मार्गावरील बुद्ध विहाराचे इतर ठिकाणी स्थलांतर करून संबंधीत खासगी जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही पुर्ण झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू करण्याला पुणे महापालिका आयुक्तांनी (PMC Pune Commissioner) मंजूरी दिली आहे. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी या कामासाठी सकारात्मक तोडगा काढत पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. (Pune Municipal Corporation)

विश्रांतवाडी चौकातून धानोरी कडे जाणारा रस्ता अरुंद होता. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्याबाबत महापालिका स्तरावर विचारविनिमय सुरू होता. मात्र या मार्गावर खासगी जागेत असणार्‍या बुद्ध विहाराच्या स्थलांतराचा अडथळा निर्माण झाला होता. सामाजिक भावनांचा आदर करून तसेच महापालिका प्रशासनाच्या विकासात आडकाठी न येता माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी या वर सकारात्मक तोडगा काढला. बुद्ध विहाराचे स्थलांतर करताना पर्यायी जागेची उपलब्धता करावी, असे सुचविले. त्यानुसार बुद्ध विहाराला पर्यायी जागा देण्याचे ठरले आहे. विहार बांधकामाला परवानगी मिळाली आहे. विकसकाकडून लवकरच त्याचे बांधकाम करून देण्यात येणार आहे. (PMC Pune)

सध्या सर्व जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी रस्ता रुंदीकरणाच्या कामाला मंजूरी दिली आहे. लवकरच प्रत्यक्ष या कामाला सुरूवात होणार असून वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.

डॉ. धेंडे यांचा पाठपुरावा –

महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी यापुर्वीच बैठक आयोजित केली होती. या बैठकीस आमदार सुनिल टिंगरे, माजी आमदार जगदीश मुळीक, माजी नगरसेवक अशोक कांबळे, मंगेश गोळे, माजी नगरसेवक अनिल टिंगरे, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, मिळकतधारक आगरवाल, बुद्धविहाराचे अध्यक्ष राजीव बेंगाळे आदीसह आदीसह महापालिका अधिकारी उपस्थित होते. यामध्ये काही बाबींवर निर्णय घेण्यात आले. यामध्ये मिळकतधारक राधेशाम आगरवाल यांनी बुद्ध विहाराच्या जागेच्या मोबदल्यात सर्व्हे नंबर 46 मधील वॉटर वर्क्सकरिता आरक्षित जागेतील झोपड्या काढून 2 आर क्षेत्र बुद्धविहारासाठी द्यावे. त्याचे बांधकाम करावे. वॉटर वर्क्स आरक्षित क्षेत्राचा मोबदला आगरवाल यांना टीडीआर स्वरूपात द्यावा. 60 फूट डीपी रस्त्यामधील बुद्ध विहाराची जागा रिकामी झाल्यानंतर उर्वरीत क्षेत्राचा प्रलंबित टीडीआर देण्याची कार्यवाही करावी, आदी विषयावर एकमत झाले.

——–

रस्ता रुंदीकरण करताना सध्याच्या बुद्ध विहाराचे योग्य ठिकाणी स्थलांतर होणे अपेक्षित आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. पर्यायी जागेत बुद्ध विहार स्थलांतर करून त्याचे बांधकामही विकसकाने करून देण्यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच बौद्ध बांधवांच्या भावनांचाही आधार केला जाणार आहे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
—————