Ward Structure : PMC election: महापालिका प्रारूप प्रभाग रचनेचा सुधारित आराखडा निवडणूक आयोगाला सादर : इच्छुकांची प्रतीक्षा संपणार

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिका प्रारूप प्रभाग रचनेचा सुधारित आराखडा निवडणूक आयोगाला सादर

: इच्छुकांची प्रतीक्षा संपणार

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना कशी असेल याची प्रतीक्षा काही केल्या संपत नव्हती. मात्र आता ती संपली आहे. पुणेच्या प्रारूप प्रभाग रचनेचे 6 जानेवारी रोजी सादरीकरण करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला होता. पुन्हा एकदा यास मुदतवाढ देण्यात आली होती. १५ जानेवारी पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र  १५ जानेवारी ला देखील ही रचना सदर होऊ शकली नाही. गुरुवारी मात्र महापालिकेकडून हा आराखडा निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला. त्यानंतर आता पुढील आठवड्यात हा आराखडा प्रसिद्ध होईल आणि त्यावर हरकती सूचना घेतल्या जातील. त्यामुळे आता इच्छुकांची प्रतीक्षा संपली आहे. 

 

शासनाने दि. १५ डिसेंबर, २०२१ रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका (प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पध्दत) नियम, २०२१ अन्वये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार (त्रिसदस्यीय) आरक्षण कशा पध्दतीने निश्चित करावे हे विहित केले आहे

निर्णयास अनुसरुन जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाचे प्रमाण निश्चित करत नाही तोपर्यंत आगामी सार्वत्रिक / पोटनिवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण म्हणून अधिसूचित करुन निवडणुका घेण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता कोणत्याही जागा देय होणार नाहीत.

निवडणूक प्रक्रियेला येणार गती

दरम्यान पुण्याच्या प्रभागाच्या प्रारूप आराखड्याचे 6 जानेवारी रोजी सादरीकरण करण्याचा आदेशराज्य निवडणूक आयोगाने दिला होता.  मात्र पुन्हा  एकदा यास मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार १५ जानेवारीपर्यंत रचनेचे सादरीकरण करावे लागणार होते. मात्र मागील आठवड्यात आरखडा सादर झाला नव्हता. महापालिकेने जेंव्हा 6 डिसेम्बरला कच्चा आराखडा सादर केला तेव्हा आयोगाने 24 सूचना महापालिकेला केल्या होत्या. महापालिकेने आता सुधारित आराखडा आयोगाला सादर केला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला गती येण्याची चिन्हे आहेत. कारण निवडणूक आयोगाने नुकतीच एक नियमावली जाहीर केली होती. ज्यात कोरोना काळात कशा निवडणूक घ्याव्या याबाबत निर्देश दिले आहेत. आता पुढील आठवड्यात हा आराखडा प्रसिद्ध होईल. त्यावर हरकती सूचना घेतल्या जातील. त्यामुळे इच्छुक लोकांना आता तयारी करण्यास हरकत नाही, असे म्हटले जात आहे.