Hearing Report : PMC Election : महापालिका प्रभाग रचना : हरकती सूचनांवरील अहवाल सादर करण्यास प्रशासनास मुदतवाढ 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका प्रभाग रचना : हरकती सूचनांवरील अहवाल सादर करण्यास प्रशासनास मुदतवाढ 

पुणे: पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) प्रारूप प्रभागरचनेवरील ( Ward Structure)  सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने (State election commission)  तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. याचा अहवाल २ मार्चऐवजी पाच मार्च रोजी आयोगाला सादर केला जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग आहे. याची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या. त्यावर सुनावणी घेण्यासाठी यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. २४ व २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतल्यानंतर आता त्याचा अहवाल बनविण्याचे काम सुरू आहे. यामध्ये पूर्व पुणे आणि पश्चिम पुण्यातील प्रभाग रचनेवर आक्षेप असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता आहे. शिवाय पण संपूर्ण शहराच्या हरकतींचा अद्याप विचार झालेला नाही. त्याचा अहवाल २ मार्चपर्यंत आयोगाला सादर करणे आवश्‍यक होते. पण हे काम अपूर्ण असल्याने आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार आयोगाकडून ५ मार्च पर्यंतची मुदत वाढवून दिली आहे

Hearing On Ward Structure : PMC Election 2022 : आज 1380 हरकतींवरील सुनावणी पार पडली!

Categories
Breaking News PMC पुणे

आज 1380 हरकतींवरील सुनावणी पार पडली!

पुणे :. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 (PMC election 2022)  प्रारुप प्रभाग रचना (Ward structure) हरकत व सुचना (Objection and Suggestion)  सुनावणी बालगंधर्व रंगमंदिर येथे आज पार पडली. आजच्या सुनावणीमध्ये प्रभाग क्र. १ ते २० व २७ ते ३१ तसेच ३३ व ३५ यांचा समावेश होता. वरील सर्व प्रभागातील १३८० इतक्या हरकती व सुचना आल्या असून त्यावर सुनावणी घेण्यात आली. मा. आजी माजी सभासद, राजकीय हरकतदार व नागरिक यांनी हरकती व सुचना दाखल केल्या होत्या. राहिलेल्या प्रभागावर उद्या सुनावणी होणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रारुप रचनेबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर गुरुवार दि. २४/२/२०२२ व शुक्रवार दि. २५/२/२०२२ रोजी जाहीर सुनावणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार २४/२/२०२२ रोजीची सुनावणी मा. चोकलिंगम, महासंचालक यशदा, (राज्य निवडणूक
आयोग प्राधिकृत अधिकारी), पुणे यांच्या अधिपत्याखाली पार पडली.  सुनावणी बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर, पुणे ५ येथे सकाळी १० वाजता सुरु झाली. आज दि. २४/२/२०२२ च्या सुनावणीमध्ये प्रभाग क्र. १ ते २० व २७ ते ३१ तसेच ३३ व ३५ यांचा समावेश होता. वरील सर्व प्रभागातील १३८० इतक्या हरकती व सुचना आल्या असून त्यावर सुनावणी घेण्यात आली. कोविड-१९ च्या अनुषंगाने सर्व शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सदर सुनावणी कार्यक्रम शांततेत पार पडला. मा. आजी माजी सभासद, राजकीय हरकतदार व नागरिक यांनी हरकती व सुचना दाखल केल्या होत्या.
सुनावणी प्रसंगी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रविंद्र बिनवडे, अप्पर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, सचिव राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र दिपक नलावडे, अप्पर सचिव राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र अतुल जाधव, उप आयुक्त राज्य निवडणूक
आयोग महाराष्ट्र अविनाश सणस, उप आयुक्त (निवडणूक) अजित देशमुख इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Hearing on Ward Structure : Timetable : प्रभाग रचना सुनावणी : महापालिका प्रशासनाकडून वेळापत्रक जाहीर 

Categories
Breaking News PMC पुणे

प्रभाग रचना सुनावणी : महापालिका प्रशासनाकडून वेळापत्रक जाहीर

पुणे : महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर आलेल्या हरकतींची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता ही सुनावणी दि. 24 आणि 25 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. पहिल्यांदा एकच दिवस सुनावणीसाठी देण्यात आला होता. बालगंधर्व रंगमंदिरात ही प्रक्रिया पार पडणार आहे. सुनावणीसाठी सर्व हरकतदारांना नोटीस देऊन ठिकाण आणि वेळ कळविण्यात आल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

प्रभाग रचनेवर सुमारे 3 हजार 596 हरकती आल्या आहेत. सुनावणींसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून “यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयोगाच्या सुचनेनुसार महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना 1 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली होती. तर 14 फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती घेण्याची मुदत होती. तर, यावर सुनावणी घेऊन त्याचा अहवाल महापालिकेस 2 मार्चला राज्य निवडणूक आयोगास सादर करायचा आहे. त्यानुसार ही सुनावणी होणार आहे. त्याबाबतचा सविस्तर कार्यक्रम महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे.

असे असेल वेळापत्रक

दिनांक    गट         प्रभाग              सुनावणीची वेळ

24 फेब्रु.  1.          1 ते 9.            स. 10 ते 11:30
              2.          10 ते 16.       स. 11:30 ते 1:00
              3.          17,18,19,20
                           30,31,33,35.  दु. 2:30 ते 4:00
               4.          27,28,29.       सायं. 4 ते 6
25 फेब्रु.    5.       21,22,23,25,26
                          41,42,43,44,45,46. 10 te 11:3०
                 6.     37,38,39,40.          11:30 ते 1
                 7.      47,48,49,50,57.       2:30 ते 3:30
                 8.      51,53,54,55,56.      3:30 te 4:30
                9.       सर्वसाधारण                 4:30 ते 6

Hearing : Objections : Ward Structure : प्रभाग रचना : हरकतींची संख्या जास्त असल्याने आता दोन दिवस सुनावणी

Categories
Breaking News PMC पुणे

प्रभाग रचना : हरकतींची संख्या जास्त असल्याने आता दोन दिवस सुनावणी

: बालगंधर्व रंगमंदिरात पूर्ण होणार प्रक्रिया 

पुणे- महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर आलेल्या हरकतींची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता ही सुनावणी दि. 24 आणि 25 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. पहिल्यांदा एकच दिवस सुनावणीसाठी देण्यात आला होता. बालगंधर्व रंगमंदिरात ही प्रक्रिया पार पडणार आहे. सुनावणीसाठी सर्व हरकतदारांना नोटीस देऊन ठिकाण आणि वेळ कळविण्यात आल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

प्रभाग रचनेवर सुमारे 3 हजार 596 हरकती आल्या आहेत. सुनावणींसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून “यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयोगाच्या सुचनेनुसार महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना 1 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली होती.

 

तर 14 फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती घेण्याची मुदत होती. तर, यावर सुनावणी घेऊन त्याचा अहवाल महापालिकेस 2 मार्चला राज्य निवडणूक आयोगास सादर करायचा आहे. त्यानुसार ही सुनावणी होणार आहे. त्याबाबतचा सविस्तर कार्यक्रम महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे.

हरकतींचे स्वरूप एकाच प्रकारचे असल्यास एकत्र गटाने सुनावणी घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार प्रभागनिहाय एक प्रकारच्या हरकतींचे गट तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, मनपा प्रशासनाने सुनावणीसाठी यापूर्वी एकच दिवस निश्‍चित केला होता. मात्र, हरकतींची संख्या जास्त असल्याने आता दोन दिवस ही सुनावणी होणार आहे.

Corporators took objections for ward Structures : प्रभाग रचनेवर नगरसेवक नाराज; नोंदवल्या हरकती 

Categories
PMC Political पुणे

प्रभाग रचनेवर नगरसेवक नाराज; नोंदवल्या हरकती

 

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेली प्रभाग रचना(Ward Structure) समाधानकारक नसल्याने हरकती नोंदविण्यासाठी नगरसेवकच(Corporators) सरसावले आहेत. यामध्ये महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या हरकती व सूचना नोंदवून सोईनुसार प्रभाग व्हावा यासाठी प्रयत्‍न केला आहे.(Pune Corporation Election Updates)

पुणे महापालिकेसाठी तीन सदस्यांचा प्रभाग असणार आहे. प्रभाग रचना सोईची व्हावी यासाठी महापालिका आयुक्तांच्या घरी जाण्यापासून ते मुंबईत जाऊन मंत्र्यांच्या, अधिकाऱ्यांच्या भेटी नगरसेवकांनी, इच्छुकांनी घेतल्या होत्या. निवडणूक आयोगाने १ फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर त्यात मोठ्याप्रमाणात बदल झाले आहे. नगरसेवकांचा हक्काचा मतदार दुसऱ्या प्रभागात गेल्याने त्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.काँग्रेसने तर प्रभाग रचनेवर हरकती व सूचना घेण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन, प्रत्येक प्रभागांचे नियोजन केले आहे. भाजपने या प्रारूप रचनेच्या विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता, प्रत्यक्षात याचिका दाखल झालेली नसली तरी भाजपच्या नगरसेवकांनीही मोठ्याप्रमाणात हरकती घेतल्या आहेत. विशेष म्हणजे कोथरूडमधील प्रभाग भाजपसाठी सुरक्षीत असले तरीही हरकती घेतल्या आहेत. प्रभाग क्रमांक ३३ मध्ये बावधनचा भाग तोडून त्याऐवजी गांधी भवनचा भाग जोडावा, फर्ग्युसन महाविद्यालय-एरंडवणे या प्रभाग क्रमांक १६ मधील मातोश्री वृद्धाश्रमाच्या मागील गल्‍लांचा भाग वगळावा, प्रभाग क्रमांक ३१ मध्ये मोरे विहार सोसायटीची चुकीच्या पद्धतीने विभागणी झाली आहे त्यात बदल करावा, प्रभाग क्रमांक ३२ मधील भुसारी कॉलनीला सुतारदराचा भाग जोडला आहे, त्यामुळे हा भाग वगळून, सोसाट्याचा परिसर जास्त असावा अशा पद्धतीने स्थानिक विद्यमान नगरसेवकांनी हरकती घेतल्या आहेत.

याचपद्धतीने भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नगरसेवकांनी इच्छुकांनी पर्वती, वडगाव शेरी, हडपसर, खडकवासला मतदारघातील प्रभागात हरकती सूचना घेतल्या आहेत. तर काही जणांनी शेवटच्या दिवशी हरकती नोंदविण्याची तयारी सुरू केली आहे. अनुकूल असलेला भाग जोडावा, प्रतिकूल असलेला भाग काढून टाकावा, गल्ल्यांऐवजी मुख्यरस्त्यांवरून प्रभागाची सीमा निश्‍चीत करावी, एक सोसायटी दोन प्रभागात विभागू नये यासह इतर हरकती घेतल्या आहेत.७९२ हरकती सूचनाशनिवारी (ता. १२) महापालिकेकडे १६० हरकती-सूचना आलेल्या आहेत. १ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी या दरम्यान ७९२ हरकती व सूचना आलेल्या आहेत. रविवारी महापालिकेचे सर्व कार्यालय बंद राहणार असल्याने हरकती नोंदविता येणार नाहीत. सोमवारी (ता. १४) शेवटच्या दिवशी दुपारी तीन पर्यंत हरकती-सूचनांसाठी मुदत आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

Suggestion-Objections : Ward Structure : PMC Election : प्रभाग रचनेवरील हरकती वाढल्या 

Categories
Breaking News PMC पुणे

प्रभाग रचनेवरील हरकती वाढल्या

: जास्तीत जास्त हरकती देण्यासाठी विरोधी पक्ष प्रयत्नशील

पुणे : महापालिकेच्या 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी(PMC election 2022) जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना(Objections-suggestions) नोंदविण्यासाठी शेवटचे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे हरकतींची संख्या वाढताना दिसते आहे. दरम्यान नागारिकांना येत्या सोमवारी ( दि.14) दुपारी 03:00 पर्यंत हरकती नोंदविता येणार असून रविवारी (दि.13) महापालिकेस सुट्टी असल्याने या दिवशी कामकाज बंद असणार आहे. दरम्यान, गुरूवार सायंकाळपर्यंत 10 दिवसांत प्रभाग रचनेवर सुमारे 429 हरकती घेण्यात आल्या आहेत. दरम्यान विरोधी पक्षाने जास्तीत जास्त हरकती नोंदवण्याबाबत नागरिकांना आवाहन(Appeal to citizens) केले आहे.

महापालिका निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार दि.1 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली आहे. त्यावर हरकती घेण्यासाठी दि. 14 फेब्रुवारीला दुपारी 03:00 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर, नागरिकांना या हरकती क्षेत्रीय कार्यालयाकडे नोंदविता येणार आहेत.

 

: सर्व  पक्षांकडून हरकती 


प्रभाग रचनेबाबत गेल्या 10 दिवसांत सुमारे 429 हरकती दाखल करण्यात आल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. त्यात, प्रामुख्याने प्रभागांची रचना करताना आयोगाकडून घालून देण्यात आलेल्या मार्गदर्शनानुसार झालेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहेत तर काही हरकती या प्रभागांच्या नावावर घेण्यात आल्या आहेत. तर जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून या हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. विरोधी पक्षाने जास्तीत जास्त हरकती नोंदवण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे.

S Chockalingam : प्रभाग रचनेवरील सुनावणीसाठी यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम यांची नियुक्ती 

Categories
Breaking News PMC पुणे

प्रभाग रचनेवरील सुनावणीसाठी यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम यांची नियुक्ती

: राज्य निवडणूक आयोगाने जारी केले आदेश

 

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी(PMC Election) प्रभाग रचना जाहीर झाली आहे. त्यावर हरकती(objections) सूचना देखील येऊ लागल्या आहेत. दरम्यान या हरकती 14 फेब्रुवारी पर्यंत नोंदवायच्या आहेत. यावरील सुनावणीसाठी यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम (S Chockalingam) यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State election commission) नुकतेच हे आदेश जारी केले आहेत.

 

14 फेब्रुवारी पर्यंत हरकती नोंदविता येणार असून या आदेशानुसार, 26 फेब्रुवारी रोजी ही सुनावणी होणार आहे. तसेच या सुनावनीवेळी महापालिका आयुक्‍त, जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी यांच्या समक्ष अथवा आयुक्त नसल्यास उपायुक्त दर्जाच्या समकक्ष अधिकाऱ्याच्या उपस्थित घ्यायची असून निवडणूक आयोगास त्याचा अहवाल 2 मार्च पर्यंत सादर करायचा आहे.

 

Suggestion : Objection : Ward Structure : प्रभाग रचनेवर आतापर्यंत 17 हरकती दाखल 

Categories
Breaking News PMC पुणे

प्रभाग रचनेवर आतापर्यंत 17 हरकती दाखल 

 

पुणे : महापालिकेच्या(pune municipal corporation) प्रारूप प्रभाग रचनेत(Ward Structure) मोठया प्रमाणात तोडफोड तसेच फेरबदल झाल्याचे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच त्याच वेळी प्रभाग रचनेवर पहिल्या दोन दिवसात अवघ्या 17 हरकती(suggestion/objection) दाखल झालेल्या आहेत.

14 फेब्रुवारी पर्यंत हरकती नोंदविता येणार असून या आदेशानुसार, 24 जानेवारी रोजी ही सुनावणी होणार आहे. प्रभाग रचनेवर पहिल्या दोन दिवसात अवघ्या 17 हरकती दाखल झालेल्या आहेत. त्यात, 6 हरकती पहिल्या दिवशी तर 11 हरकती गुरूवारी दाखल करण्यात आल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

: ऑनलाईन हरकती नोंदवण्याची सुविधा नाही

महापालिकेचे प्रभाग रचनेचे नकाशे महापालिका वेबसाईट(PMC website) वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांचा समज झाला की हरकती देखील ऑनलाईन(Online) पद्धतीने मांडता येतील. मात्र महापालिका निवडणूक विभागाकडून तशी कुठलीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना सावरकर भवन किंवा आपल्या जवळच्या क्षेत्रीय कार्यालयात(Ward office) जाऊनच हरकती नोंदवाव्या लागणार आहेत.

PMC Website : ward Structure : महापालिकेच्या या संकेतस्थळावर(Website) वर पहा प्रभाग रचना आणि नकाशे

Categories
PMC पुणे

महापालिकेच्या या संकेतस्थळावर(Website) वर पहा प्रभाग रचना आणि नकाशे

 

पुणे :  महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने ती पहिल्यांदा ऑफलाईन उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार मनपाच्या तिसऱ्या मजल्यावर लोकांनी त्याचे नकाशे पाहिले. मात्र त्यातून स्पष्टता येत नव्हती. आता महापालिकेने रचना आणि नकाशे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी या website चा वापर नागरिक करू शकतील.

https://www.pmc.gov.in/en/pmc-prabhag-rachna-2022

Ward Structure : PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर!  : बाणेर-सुस प्रभागावरून जोरदार चर्चा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

पुणे महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर!

: बाणेर-सुस प्रभागावरून जोरदार चर्चा

 

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी (PMC Election 2022) प्रस्तावित प्रभागरचना जाहीर झाली आहे. 58 प्रभाग(58wards)  त्यात जाहीर आहेत. त्याचे नकाशे महापालिका भवन मध्ये लावण्यात आले आहेत. दरम्यान वेबसाईट वर ही रचना जाहीर झालेली नाही. अजून तासभरात रचना महापालिकेच्या वेबसाईट वर दिसेल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.   57 प्रभागांतून तीन नगरसेवक तर एका प्रभागातून दोन असे एकूण 173 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. बाणेर-सूस हा प्रभाग दोन नगरसेवकांचा राहणार आहे. या प्रभागावरून मात्र जोरदार चर्चा सुरु झाली आहे. धानोरी-विश्रांतवाडी हा प्रभाग क्रमांक एक ठरला आहे. त्यातील तीनपैकी दोन प्रभाग अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातींसाठी (ST) राखीव आहेत.

2011 च्या लोकसंख्येनुसार ही प्रभारगरचना करण्यात आली आहे. त्यानुसार येरवडा हा सर्वाधिक मोठा (71390) आणि धानोरी-विश्रांतवाडी हा सर्वात छोटा (55488 लोकसंख्या) प्रभाग ठरला आहे. बाणेर-सूस येथील प्रभागरचना चर्चेची ठरली आहे. येथे राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या सोयीसाठी बाणेर-सूस या दोन गावांचा स्वतंत्र प्रभाग करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. येथील मूळच्या प्रभागातील परिसरांना इतर प्रभागात टाकण्यात आले आहे. माजी आमदार जगदिश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांच्या जुन्या मतदारसंघाचा भाग नागपूर चाळ परिसराला जोडल्याची चर्चा आहे.

ही आहेत प्रभागांची नावे,आरक्षण व मतदार संख्या

1. धानोरी – विश्रांतवाडी=STand SC

मतदार=55488

2. टिंगरेनगर – संजय पार्क

मतदार= 56969

3. लोहगाव – विमान नगर=SC

मतदार=61836

4. वाघोली – इऑन आयटी पार्क=SC

मतदार =58912

5. खराडी – चंदननगर

मतदार=67367

6. वडगावशेरी

मतदार=60110

7. कल्याणीनगर – नागपूर चाळ=SC

मतदार=67739

8. कळस – फुलेनगर=SC

मतदार=62273

9. येरवडा=SC

मतदार =71390

10. शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी=SC

मतदार =62481

11. बोपोडी – पुणे विद्यापीठ=SC

मतदार=57861

12. औंध – बालेवाडी=SC

मतदार=62050

13. बाणेर – सुस म्हाळुंगे

मतदार =37589(2चाप्रभाग)

14. पाषाण – बावधन बुद्रुक=ST

मतदार=58515

15. पंचवटी – गोखलेनगर

मतदार=67821

16. फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणे

मतदार =67103

17. शनिवार पेठ – राजेंद्रनगर

मतदार=67951

18. शनिवार वाडा – कसबा पेठ

मतदार =67701

19. रास्तापेठ – के.ई.एम. हॉस्पिटल=SC

मतदार=58994

20. पुणे स्टेशन – ताडीवाला रोड=SC

मतदार=67129

21. मुंढवा – घोरपडी=SC

मतदार=67574

22. मांजरी – शेवाळवाडी=SC

मतदार=61878

23. साडेसतरानळी – आकाशवाणी

मतदार=55659

24. मगरपट्टा – साधना विद्यालय

मतदार= 56446

25. हडपसर गावठाण – सातववाडी

मतदार=55782

26. भीमनगर – रामटेकडी=SC

मतदार=67721

27. कासेवाडी – हरकानगर=SC

मतदार=68501

28. महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट

मतदार= 57483

29. खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई

मतदार= 67592

30. जयभवानी नगर – केळेवाडी

मतदार=60237

31. कोथरूड गावठाण – शिवतीर्थ नगर

मतदार=61115

32. भुसारी कॉलनी – सुतारदरा

मतदार=67127

33. बावधन खुर्द – महात्मा सोसायटी

मतदार=66216

34. वारजे – कोंढवे धावडे

मतदार=64919

35. रामनगर – उत्तमनगर शिवणे

मतदार=67422

36. कर्वेनगर

मतदार=67260

37. जनता वसाहत – दत्तवाडी

=SCमतदार=67332

38. शिवदर्शन – पद्मावतीSC

मतदार=66561

39. मार्केटयार्ड – महर्षी नगर=SC

मतदार=59580

40. गंगाधाम – सॅलीसबरी पार्क=SC

मतदार=59882

41. कोंढवा खुर्द – मिठानगर

मतदार=55825

42. सय्यदनगर – लुल्लानगर

मतदार=54026

43. वानवडी – कौसरबाग

मतदार=59414

44. काळेपडळ – ससाणेनगर

मतदार=55287

45. फुरसुंगी

मतदार=55957

46. मोहम्मदवाडी – उरुळी देवाची=SC

मतदार=55047

47. कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी

मतदार=55662

48. अप्पर सुपर इंदिरानगर=SC

मतदार=56884

49. बालाजीनगर – के के मार्केट

मतदार=58027

50. सहकारनगर – तळजाई=SC

मतदार=62398

51. वडगाव – पाचगाव पर्वती

मतदार=67289

52. नांदेडसिटी – सनसिटी

मतदार=66626

53. खडकवासला -नऱ्हे

मतदार=63525

54. धायरी – आंबेगाव

मतदार=58447

55. धनकवडी – आंबेगाव पठार

मतदार=57719

56. चैतन्यनगर – भारती विद्यापीठ

मतदार=56327

57. सुखसागर नगर – राजीव गांधी नगर

मतदार=55971

58. कात्रज – गोकुळनगर

मतदार=57847