Taljai Hills | प्रभाग रचनेत प्रकल्पच  पळविण्याचा  आरोप!

Categories
Breaking News PMC Political पुणे

‘ग्रे वॉटर ‘प्रक्रिया प्रकल्पामुळे तळजाई टेकडी सदैव राहणार हिरवीगार!

‘आयत्या पिठावर रेघोट्या’ साठी प्रभाग रचनेत प्रकल्पच  पळविण्याचा   प्रकार:  काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल

पुणे | गेली १५ वर्षे  पिण्याच्या पाण्याच्या  टँकरवर अवलंबून  असणाऱ्या तळजाई टेकडीवरील वनसंपदा आणि प्राणी- पक्ष्यांना  माझ्या संकल्पनेतून आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कै. वसंतराव बागुल उद्यानात साकारलेल्या  देशातील पहिल्या  ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पातुन आज पाणी मिळत  आहे,त्यामुळे तळजाई टेकडी आता हिरवीगार दिसत आहे आणि भविष्यातही  हा प्रकल्पच तळजाई टेकडीला हिरवीगार ठेवण्यासाठी आधारवड ठरणार आहे. मात्र ही बाब  लक्षात घेऊन काही स्वार्थी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी मात्र अंतिम प्रभाग रचनेतून हा प्रकल्प स्वतःच्या प्रभागात समाविष्ट करण्याचे कारस्थान केले आहे . असे असले तरी जनता सुज्ञ आहे. ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ मारणाऱ्यांना ते अजिबात  थारा देणार नाहीत ,अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांनी दिली आहे. तसेच श्रेयाच्या राजकारणासाठीच प्रभाग रचनेत  कै. वसंतराव बागुल उद्यानाचे दोन तुकडे करून हा प्रकल्प पळविण्याचा ‘उद्योग’ केला का ? असा सवालही केला आहे.

याबाबत काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल म्हणाले कि, माझ्या संकल्पनेतून आणि पुणे  महापालिकेच्यावतीने  सहकारनगर येथील कै. वसंतराव बागुल उद्यान येथे  हा   देशातील पहिला  ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्प साकारला आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाच लाख  लिटर पाणी दररोज  तळजाई टेकडीवर जलवाहिनीतून जात आहे.सांडपाण्याचा पुनर्वापर या चळवळीला दिशादर्शक ठरणाऱ्या   या  शुद्ध पाण्याच्या   प्रकल्पाचे सर्वच स्तरातून कौतुक झालेले  आहे. त्यामुळे प्रभाग रचनेत स्वतःकडे हा प्रकल्प यावा यासाठी काही व्यक्तींनी तो प्रभाग क्रमांक ५० मध्ये समाविष्ट करण्याचा उद्योग केला आहे. वास्तविक जाहीर झालेल्या  प्रभाग क्रमांक ३८ शिवदर्शन – पद्मावतीमध्ये यापूर्वीच  साकारलेल्या या प्रकल्पातून जलवाहिनीद्वारे अगोदरच पाणी तळजाईवर जात आहे. असे असताना या प्रकल्पाचा निवडणुकीसाठी फायदा करून घेण्याबरोबरच श्रेयाच्या राजकारणासाठी  कै. वसंतराव बागुल उद्यानाचे दोन तुकडे करून फक्त हा प्रकल्पच  प्रभाग क्रमांक ५० सहकारनगर -तळजाईमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. वास्तविक या पद्धतीने अशी प्रभाग रचना आजपर्यंत कधीही झालेली नाही. ज्यांनी हे कारस्थान केले. त्यांनी आजवर तळजाईच्या विकासात खोडा घालण्याचेच काम केलेले आहे. त्यांच्या प्रभागात तळजाई टेकडी असताना,त्यांनी गेली पंधरा वर्षे पिण्याच्या पाण्याच्या टँकरवरच निधी खर्च केला. त्यातून तळजाई टेकडी कधीही हिरवीगार दिसली नाही. मात्र ज्यावेळी या भागाचे लोकप्रतिनिधित्व माझ्याकडे आले. त्यावेळी तळजाई टेकडीचा पर्यावरणपूरक विकासाचा आराखडा तयार करण्यात आला.  तळजाई टेकडीवरील वनसंपदा आणि प्राणी- पक्ष्यांना  पाणी मिळावे. टेकडी सदैव हिरवीगार राहावी आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणाऱ्या भरमसाठ खर्चाला आळा बसावा, यानुसार सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या आदर्शवत   ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी केली. मात्र  आता ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ साठी प्रभाग रचनेत हा  ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्प पळविण्याचाच  प्रकार झाला असला तरी जनता या वृत्तीच्या लोकांना थारा देणार नाही असेही आबा बागुल म्हणाले.

SC, ST’s reservation : महापालिका निवडणुकीसाठी एससी, एसटी चे आरक्षण जाहीर

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका निवडणुकीसाठी एससी, एसटी चे आरक्षण जाहीर

पुणे : महापालिका प्रशासनाच्या वतीने महापालिका निवडणुकीसाठी 58 प्रभागातील एससी आणि एसटीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान आता महिला आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांचे प्रभाग बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आले. एकूण 173 जागांपैकी अनुसूचित जातींसाठी 23, तर अनुसूचित जमातींसाठी 2 जागा राखीव आहेत. त्यासाठीची लोकसंख्यानिहाय याद्या आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे 25 प्रभाग राखीव असणार आहेत.

पालिका निवडणुकीसाठी आयोगाने पुणे शहराची 2011ची 35 लाख 56 हजार 824 इतकी लोकसंख्या गृहीत धरली असून, त्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या 4 लाख 80 हजार 17 आहे. तर अनुसूचित जमाती लोकसंख्या 41 हजार 561 आहे. त्यानुसार लोकसंख्या गृहीत धरून हे आरक्षित प्रभाग निश्‍चित करण्यात आले आहेत.

 

दरम्यान, 25 पैकी 13 जागा या महिलांसाठी राखीव असणार असून त्यात 12 जागा अनुसूचित जाती महिला, तर 1 जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी असणार आहे. तर महिलांसाठीच्या आरक्षणाची सोडत स्वतंत्रपणे काढली जाणार आहे.

 

https://www.pmc.gov.in/sites/default/files/Annexure_5.pdf

 

Ward formation | PMC | पुणे महापालिकेने काल रात्री जाहीर केली प्रभाग रचना

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महापालिकेने काल रात्री जाहीर केली प्रभाग रचना

पुणे : पुणे महापालिकेने अंतिम प्रभाग रचना काल रात्री जाहीर केली आहे. प्रत्यक्षात आयोगाने 17 मेपर्यंत प्रभागरचना जाहीर करण्यास मुदत दिलेली असताना महापालिका प्रशासनाने केवळ प्रभागरचनेचा मुख्य नकाशा अणि राजपत्र जाहीर केले. तर प्रभागनिहाय नकाशे नंतर जाहीर केले जाणार आहेत. महापालिकेने अंतिम प्रभागरचनेचा कार्यक्रम चार दिवस आधीच उरकला आहे.

महापालिकेची मुदत 14 मार्च रोजी संपली असली तरी राज्यातील ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यांमुळे प्रभागरचना अंतिम झालेली नव्हती. तसेच राज्य शासनानेही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी 11 मार्च रोजी निवडणूक अधिकार आपल्याकडे घेण्याचा कायदा केल्याने प्रभागरचनेचे काम थांबले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेची अंतिम प्रभागरचना 17 मेपर्यंत जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार, आयोगाने अंतिम मान्यता दिल्यानंतर महापालिकेने तातडीने ही प्रभागरचना जाहीर केली आहे.

त्यानुसार, महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय पद्धतीने एकुण 58 प्रभाग निश्‍चित होतात. यात 57 प्रभाग हे तीन नगरसेवकांचे आणि 1 प्रभाग हा 2 दोन नगरसेवकांचा आहे. एकूण 173 नगरसेवक असणार आहेत. त्यामुळे आता प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण जाहीर केले जाणार आहे. मात्र, प्रभागरचना जाहीर झाल्याने इच्छूकांना तयारीला लागण्याचा आणि आपला प्रभाग निश्‍चित करता येणार आहे. तर लोकसंख्येनुसार प्रभाग क्रमांक 9 येरवडा हा सर्वाधिक 71,390 लोकसंख्येचा असणार आहे. तर सर्वात कमी लोकसंख्येचा प्रभाग क्रमांक 13 असणार असून त्याची लोकसंख्या 31 हजार 869 आहे.

या संकेत स्थळावर पाहू शकाल नकाशे

https://www.pmc.gov.in/en/pmc-final-prabhag-rachna-2022

PMC Election 2022 : पुणे महापालिकेची प्रभाग रचना रद्द  : निवडणूक लांबणार हे स्पष्ट

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे महापालिकेची प्रभाग रचना रद्द 

: राज्य सरकार कडून अध्यादेश जारी 

 

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी (PMC Election)  तीन सदस्यांची प्रभागरचना ( Ward Structure) तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना  राज्य सरकारने 11 मार्च ला काढलेल्या आदेशामुळे प्रभागरचना  रद्द झाली. नगरसेवक व इच्छुक उमेदवारांकडून प्रारूप प्रभागरचनेवरून निवडणुकीची तयारी सुरू केली असताना आता प्रभाग रद्द झाल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. नव्याने प्रभाग रचना करताना इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (OBC) आरक्षण टाकले जाणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (Local Body) ओबीसीचे आरक्षण कायम असावे अशी भूमिका राज्यातील सर्वच पक्षाने घेतली आहे. त्यामुळे नुकताच विधिमंडळात नवीन कायदा पारित झाला. त्यास राज्यपालांनी देखील मंजुरी दिली आहे. या कायद्यात निवडणूक घेण्याबाबत व प्रभागरचना करण्याचे अधिकार शासनाने स्वतःकडे घेतले आहेत त्यानुसार ही प्रभाग रचना रद्द झाली आहे.पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. निवडणूक आयोगाने या आदेशानुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश पुणे महापालिका प्रशासनाला दिले होते. तीन सदस्यांचा प्रवास करताना अनेक नाट्यमय घडामोडी पुणे शहरात घडल्या होत्या. स्वतःच्या सोयीचा प्रभात तयार करून घेण्यासाठी नगरसेवकांनी जोरदार फिल्डिंग लावली होती.

महापालिकेने सादर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत झाल्याने निवडणूक आयोगाने बैठका घेऊन या प्रदर्शनात 24 बदल करण्याचे आदेश दिले होते. हे बदल केल्यानंतर आयोगाने एक फेब्रुवारी रोजी प्रवासा जाहीर केली. यामध्ये चित्रविचित्र पद्धतीने प्रभाग तयार झाल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे तब्बल साडेतीन हजार पेक्षा जास्त हरकती व सूचना नोंदविल्या गेल्या. निवडणूक आयोगाने या हरकतींवर सुनावणी घेतली त्यानंतर यशदाचे महासंचालक व आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी चोक्कलिंगम यांच्या समितीने शिफारशींचा अहवाल तयार करून तो नुकताच आयोगाला सादर केलेला आहे. त्यामुळे प्रभाग रचना अंतिम टप्प्यात आलेले असताना राज्य शासनाच्या आदेशामुळे ही प्रभाग रचना रद्द झाली आहे. महाराष्ट्र शासनाने काढलेल्या राज्य पत्रामध्ये पुणे महापालिकेस राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती यांचीही प्रभाग रचना रद्द केलेले आहे.या आदेशामुळे भविष्यात पुन्हा एकदा तीन सदस्यांचा प्रभाग रचना करण्यासाठी निवडणूक आयोगाला तयारी करावी लागणार आहे. एकंदरीतच ही प्रभाग रचना रद्द झाल्याने महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pune Corporation election : पुणे मनपाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! : प्रभाग रचना मंगळवारी प्रसिद्ध होणार 

Categories
Uncategorized

पुणे मनपाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले!

: प्रभाग रचना मंगळवारी प्रसिद्ध होणार

:अखेर  इच्छुकांना दिलासा

 

पुणे : पिंपरी मनपा प्रमाणे पुणे महापालिका (pune municipal corporation) निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पुणे महानगरपालिकेचा आगामी निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत. 2 मार्च पर्यंत हा कार्यक्रम चालेल. यामुळे आता इच्छुकांना दिलासा मिळाला असून आता निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे.

: आयोगाने जाहीर केला कार्यक्रम

आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेसाठी प्राप्त हरकती 16 फेब्रुवारी रोजी आयोगाला सादर कराव्या लागणार आहेत. 26 फेब्रुवारी रोजी या हरकतीवर सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारसी 2 मार्च 2022 रोजी निवडणूक आयोगाला पाठवावे लागणार आहे. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा कार्यक्रम महापालिकेला पाठविला आहे. याची सर्व जबाबदारी ही महापालिका आयुक्तांची (municipal commissioner) असेल.

: प्रभाग 13 हा दोन सदस्यीय असेल

आयोगाने महापालिकेचा आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार एकूण 58 प्रभाग असतील. त्यातील 57 प्रभाग 3 सदस्यीय तर 1 प्रभाग हा 2 सदस्यांचा असेल. प्रभाग 13 हा दोन सदस्यीय असेल. एकूण 173 नगरसेवक असतील. त्यापैकी 87 सदस्य महिला असतील. एकूण लोकसंख्या 35 लाख 56 हजार 824 एवढी गृहीत केली आहे.  3 सदस्यीय प्रभाग हे सरासरी 61679 एवढ्या लोकसंख्येचे असतील. तर जास्तीत जास्त लोकसंख्या ही 67847 तर कमीत कमी 55511 एवढी असेल.

: आयोगाने काय म्हटले आहे ?

पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता
महानगरपालिकेने बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभागांची लोकसंख्या, सदस्य संख्या दर्शविणारे सहपत्र-१ अंतिम करण्यात आले असून ते सोबत जोडले आहे. महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेस त्यानुसार मंजुरी देण्यात येत आहे.
२. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पिटीशन फॉर स्पेशल लिव्ह टू अपील (सी) क्र.१९७५६/२०२१ मध्ये दि.१९ जानेवारी, २०२२ रोजी झालेल्या आदेशानुसार राज्याने नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाबाबत असलेली आकडेवारी संबंधित
मागासवर्ग आयोगास द्यावी. मागासवर्ग आयोगाने सदर आकडेवारी तपासून त्यानुसार योग्य त्या शिफारशी राज्यास तसेच राज्य निवडणूक आयोगास कराव्यात, असे आदेशित केले आहे. मात्र, सदर शिफारशी प्राप्त होण्यास अथवा त्यानुसार योग्य तो निर्णय घेण्यास काही कालावधी लागण्याची शक्यता असल्याने, निवडणुकांचे कामकाज विहीत कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने निवडणूक प्रभागांच्या हद्दी निश्चित करण्याचा टप्पा तत्पूर्वी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी प्रथम निवडणूक प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्द करून त्यावरील हरकती व सूचना प्राप्त करून सुनावणीची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने दि.२८ डिसेंबर, २०२१ रोजी निर्गमित केलेल्या आदेशात योग्य ते बदल करण्यासाठी दि. २७ जानेवारी, २०२२ रोजी सुधारीत आदेश जारी केलेले आहेत.
३. वर नमूद केलेल्या सुधारीत आदेशानुसार महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारुप अधिसूचना प्रसिध्द करणे, हरकती व सूचना मागविणे, त्यावर सुनावणी देणे इत्यादीबाबत सोबतच्या सहपत्र-२ मध्ये दर्शविलेल्या टप्यानुसार कार्यवाही करावयाची आहे. सदर वेळापत्रकानुसार प्रत्येक टप्पा वेळेवर व योग्यरितीने पूर्ण करण्याची जबाबदारी महानगरपालिका आयुक्त यांची राहील. त्यानुसार त्यांनी योग्य ती सर्व उपाययोजना करावी.
४. राज्य निवडणूक आयोगाच्या दि. २८ डिसेंबर, २०२१ च्या आदेशात नमूद केल्यानुसार निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवरील माहिती महानगरपालिकेने वेळोवेळी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्येक टप्प्यावरील अहवाल राज्य निवडणूक आयोगास
सादर करावा.

Ward Structure : PMC election: महापालिका प्रारूप प्रभाग रचनेचा सुधारित आराखडा निवडणूक आयोगाला सादर : इच्छुकांची प्रतीक्षा संपणार

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिका प्रारूप प्रभाग रचनेचा सुधारित आराखडा निवडणूक आयोगाला सादर

: इच्छुकांची प्रतीक्षा संपणार

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना कशी असेल याची प्रतीक्षा काही केल्या संपत नव्हती. मात्र आता ती संपली आहे. पुणेच्या प्रारूप प्रभाग रचनेचे 6 जानेवारी रोजी सादरीकरण करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला होता. पुन्हा एकदा यास मुदतवाढ देण्यात आली होती. १५ जानेवारी पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र  १५ जानेवारी ला देखील ही रचना सदर होऊ शकली नाही. गुरुवारी मात्र महापालिकेकडून हा आराखडा निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला. त्यानंतर आता पुढील आठवड्यात हा आराखडा प्रसिद्ध होईल आणि त्यावर हरकती सूचना घेतल्या जातील. त्यामुळे आता इच्छुकांची प्रतीक्षा संपली आहे. 

 

शासनाने दि. १५ डिसेंबर, २०२१ रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका (प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पध्दत) नियम, २०२१ अन्वये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार (त्रिसदस्यीय) आरक्षण कशा पध्दतीने निश्चित करावे हे विहित केले आहे

निर्णयास अनुसरुन जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाचे प्रमाण निश्चित करत नाही तोपर्यंत आगामी सार्वत्रिक / पोटनिवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण म्हणून अधिसूचित करुन निवडणुका घेण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता कोणत्याही जागा देय होणार नाहीत.

निवडणूक प्रक्रियेला येणार गती

दरम्यान पुण्याच्या प्रभागाच्या प्रारूप आराखड्याचे 6 जानेवारी रोजी सादरीकरण करण्याचा आदेशराज्य निवडणूक आयोगाने दिला होता.  मात्र पुन्हा  एकदा यास मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार १५ जानेवारीपर्यंत रचनेचे सादरीकरण करावे लागणार होते. मात्र मागील आठवड्यात आरखडा सादर झाला नव्हता. महापालिकेने जेंव्हा 6 डिसेम्बरला कच्चा आराखडा सादर केला तेव्हा आयोगाने 24 सूचना महापालिकेला केल्या होत्या. महापालिकेने आता सुधारित आराखडा आयोगाला सादर केला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला गती येण्याची चिन्हे आहेत. कारण निवडणूक आयोगाने नुकतीच एक नियमावली जाहीर केली होती. ज्यात कोरोना काळात कशा निवडणूक घ्याव्या याबाबत निर्देश दिले आहेत. आता पुढील आठवड्यात हा आराखडा प्रसिद्ध होईल. त्यावर हरकती सूचना घेतल्या जातील. त्यामुळे इच्छुक लोकांना आता तयारी करण्यास हरकत नाही, असे म्हटले जात आहे.

PMC : Ward Formation : आज ही सादर होऊ शकले नाही प्रारूप प्रभाग रचनेचे सादरीकरण  : पुढील आठवड्यात निवडणूक आयोग नवीन तारीख देणार 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

आज ही सादर होऊ शकले नाही प्रारूप प्रभाग रचनेचे सादरीकरण

: पुढील आठवड्यात निवडणूक आयोग नवीन तारीख देणार

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना कशी असेल याची प्रतीक्षा काही केल्या संपेना. पुण्याच्या प्रारूप प्रभाग रचनेचे 6 जानेवारी रोजी सादरीकरण करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला होता. पुन्हा एकदा यास मुदतवाढ देण्यात आली होती. १५ जानेवारी पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आज म्हणजेच १५ जानेवारी ला देखील ही रचना सदर होऊ शकली नाही. याबाबत महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले कि  पुढील आठवड्यात निवडणूक आयोगा कडून नवीन तारीख मिळेल. त्यानुसार ही रचना सादर केली जाईल.

 

शासनाने दि. १५ डिसेंबर, २०२१ रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका (प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पध्दत) नियम, २०२१ अन्वये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार (त्रिसदस्यीय) आरक्षण कशा पध्दतीने निश्चित करावे हे विहित केले आहे

निर्णयास अनुसरुन जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाचे प्रमाण निश्चित करत नाही तोपर्यंत आगामी सार्वत्रिक / पोटनिवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण म्हणून अधिसूचित करुन निवडणुका घेण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता कोणत्याही जागा देय होणार नाहीत.

दरम्यान पुण्याच्या प्रभागाच्या प्रारूप आराखड्याचे 6 जानेवारी रोजी सादरीकरण करण्याचा आदेशराज्य निवडणूक आयोगाने दिला होता.  मात्र पुन्हा  एकदा यास मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार १५ जानेवारीपर्यंत रचनेचे सादरीकरण करावे लागणार होते. मात्र आज ही ते होऊ शकले नाही.  याबाबत महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले कि  पुढील आठवड्यात निवडणूक आयोगा कडून नवीन तारीख मिळेल. त्यानुसार ही रचना सादर केली जाईल.

: रचनेतील बदल भाजपला सोयीचे असल्याने होतोय उशीर

महापालिका प्रशासनाने ६ डिसेंबर रोजी कच्चा आरखडा आयोगाला सादर केला होता.  अहवाल सादर करण्याच्या शेवटच्या दिवसात मोठे बदल करण्यात आले होते.  सर्वच पक्षातील मातब्बर नगरसेवकांसाठी प्रभाग रचना अनुकूल झाल्याचीही चर्चा होती. शहरातील सर्व ५८ प्रभागांचे सादरीकरण केले होते. यामध्ये प्रभागांची सीमा, लोकसंख्या यासह इतर तांत्रिक माहिती देण्यात आली होती. हे सादरीकरण झाल्यानंतर प्रारूप रचनेत काही ठिकाणी बदल करणे आवश्‍यक आहे असे निरीक्षण आयोगाने नोंदविले होते. त्यानुसार २४ बदल करण्यास सांगितले होते. मात्र हे बदल केले तर महाविकास आघाडीला अडचणीचे होईल, त्यामुळे हे बदल करण्यास उशीर केला जात आहे. कारण हे बदल भाजपला उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे रचना सादर करण्यास उशीर होत आहे. अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

: उपायुक्त अजित देशमुख एका राजकीय नेत्याच्या फार्म हाउस वर : उज्वल केसकर

दरम्यान महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि भाजप नेते उज्वल केसकर यांनी आरोप केला आहे कि महापालिकेचे उपायुक्त अजित देशमुख हे एका राजकीय नेत्याच्या फार्म हाउस वर प्रभाग रचनेचे नकाशे घेऊन बसले आहेत.

दरम्यान प्रभाग रचनेबाबत देशमुख यांना पत्रकारांनी विचारले असता, देशमुख यांनी सांगितले कि सोमवारी कार्यालयीन वेळेत प्रभाग रचने बाबत माहिती दिली जाईल.

Ward Formation : PMC Election : प्रभागाच्या कच्च्या आराखड्याचे १५ जानेवारी पर्यंत करावे लागणार सादरीकरण

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

प्रभागाच्या कच्च्या आराखड्याचे १५ जानेवारी पर्यंत करावे लागणार सादरीकरण

राज्य निवडणूक आयोगाचे आदेश 

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना कशी असेल याची प्रतीक्षा काही केल्या संपेना. पुण्याच्या प्रभागाच्या कच्च्या आराखड्याचे 6 जानेवारी रोजी सादरीकरण करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिला होता. पुन्हा एकदा यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १५ जानेवारीपर्यंत प्रभागाच्या कच्च्या आराखड्याचे  सादरीकरण करावे लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले आहेत.

 

शासनाने दि. १५ डिसेंबर, २०२१ रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका (प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पध्दत) नियम, २०२१ अन्वये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार (त्रिसदस्यीय) आरक्षण कशा पध्दतीने निश्चित करावे हे विहित केले आहे

निर्णयास अनुसरुन जोपर्यंत राज्य शासन त्रिस्तरीय चाचणी करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाचे प्रमाण निश्चित करत नाही तोपर्यंत आगामी सार्वत्रिक / पोटनिवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा सर्वसाधारण म्हणून अधिसूचित करुन निवडणुका घेण्याचे आदेशित केले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता कोणत्याही जागा देय होणार नाहीत.

दरम्यान पुण्याच्या प्रभागाच्या कच्च्या आराखड्याचे 6 जानेवारी रोजी सादरीकरण करण्याचा आदेशराज्य निवडणूक आयोगाने दिला होता. पुन्हा एकदा यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता १५ जानेवारीपर्यंत प्रभागाच्या कच्च्या आराखड्याचे  सादरीकरण करावे लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले आहेत.

सूत्रांकडून अशी माहिती मिळत आहे कि, आयोगाचे बरेच कर्मचारी कोविड पॉजीटीव आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ही मुदतवाढ मिळू शकते. त्यामुळे प्रभाग रचना अजून लांबणीवर पडणार आहे.