Taljai Hills | प्रभाग रचनेत प्रकल्पच  पळविण्याचा  आरोप!

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

‘ग्रे वॉटर ‘प्रक्रिया प्रकल्पामुळे तळजाई टेकडी सदैव राहणार हिरवीगार!

‘आयत्या पिठावर रेघोट्या’ साठी प्रभाग रचनेत प्रकल्पच  पळविण्याचा   प्रकार:  काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल

पुणे | गेली १५ वर्षे  पिण्याच्या पाण्याच्या  टँकरवर अवलंबून  असणाऱ्या तळजाई टेकडीवरील वनसंपदा आणि प्राणी- पक्ष्यांना  माझ्या संकल्पनेतून आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कै. वसंतराव बागुल उद्यानात साकारलेल्या  देशातील पहिल्या  ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पातुन आज पाणी मिळत  आहे,त्यामुळे तळजाई टेकडी आता हिरवीगार दिसत आहे आणि भविष्यातही  हा प्रकल्पच तळजाई टेकडीला हिरवीगार ठेवण्यासाठी आधारवड ठरणार आहे. मात्र ही बाब  लक्षात घेऊन काही स्वार्थी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी मात्र अंतिम प्रभाग रचनेतून हा प्रकल्प स्वतःच्या प्रभागात समाविष्ट करण्याचे कारस्थान केले आहे . असे असले तरी जनता सुज्ञ आहे. ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ मारणाऱ्यांना ते अजिबात  थारा देणार नाहीत ,अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल यांनी दिली आहे. तसेच श्रेयाच्या राजकारणासाठीच प्रभाग रचनेत  कै. वसंतराव बागुल उद्यानाचे दोन तुकडे करून हा प्रकल्प पळविण्याचा ‘उद्योग’ केला का ? असा सवालही केला आहे.

याबाबत काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल म्हणाले कि, माझ्या संकल्पनेतून आणि पुणे  महापालिकेच्यावतीने  सहकारनगर येथील कै. वसंतराव बागुल उद्यान येथे  हा   देशातील पहिला  ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्प साकारला आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाच लाख  लिटर पाणी दररोज  तळजाई टेकडीवर जलवाहिनीतून जात आहे.सांडपाण्याचा पुनर्वापर या चळवळीला दिशादर्शक ठरणाऱ्या   या  शुद्ध पाण्याच्या   प्रकल्पाचे सर्वच स्तरातून कौतुक झालेले  आहे. त्यामुळे प्रभाग रचनेत स्वतःकडे हा प्रकल्प यावा यासाठी काही व्यक्तींनी तो प्रभाग क्रमांक ५० मध्ये समाविष्ट करण्याचा उद्योग केला आहे. वास्तविक जाहीर झालेल्या  प्रभाग क्रमांक ३८ शिवदर्शन – पद्मावतीमध्ये यापूर्वीच  साकारलेल्या या प्रकल्पातून जलवाहिनीद्वारे अगोदरच पाणी तळजाईवर जात आहे. असे असताना या प्रकल्पाचा निवडणुकीसाठी फायदा करून घेण्याबरोबरच श्रेयाच्या राजकारणासाठी  कै. वसंतराव बागुल उद्यानाचे दोन तुकडे करून फक्त हा प्रकल्पच  प्रभाग क्रमांक ५० सहकारनगर -तळजाईमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. वास्तविक या पद्धतीने अशी प्रभाग रचना आजपर्यंत कधीही झालेली नाही. ज्यांनी हे कारस्थान केले. त्यांनी आजवर तळजाईच्या विकासात खोडा घालण्याचेच काम केलेले आहे. त्यांच्या प्रभागात तळजाई टेकडी असताना,त्यांनी गेली पंधरा वर्षे पिण्याच्या पाण्याच्या टँकरवरच निधी खर्च केला. त्यातून तळजाई टेकडी कधीही हिरवीगार दिसली नाही. मात्र ज्यावेळी या भागाचे लोकप्रतिनिधित्व माझ्याकडे आले. त्यावेळी तळजाई टेकडीचा पर्यावरणपूरक विकासाचा आराखडा तयार करण्यात आला.  तळजाई टेकडीवरील वनसंपदा आणि प्राणी- पक्ष्यांना  पाणी मिळावे. टेकडी सदैव हिरवीगार राहावी आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणाऱ्या भरमसाठ खर्चाला आळा बसावा, यानुसार सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या आदर्शवत   ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी केली. मात्र  आता ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ साठी प्रभाग रचनेत हा  ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्प पळविण्याचाच  प्रकार झाला असला तरी जनता या वृत्तीच्या लोकांना थारा देणार नाही असेही आबा बागुल म्हणाले.

Leave a Reply