PMRDA | ‘पीएमआरडीए’च्या घरकुल योजनेसाठी अर्जाची मुदत वाढवली | १८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची संधी

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र
Spread the love

‘पीएमआरडीए’च्या घरकुल योजनेसाठी अर्जाची मुदत वाढवली

| १८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची संधी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) क्षेत्रात प्रस्तावित करण्यात आलेल्या घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता १८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटक, अनुसूचित जमातीकरिता २९ सदनिका, विमुक्त जातीकरिता दोन सदनिका अशा ३१ सदनिका आहेत. अल्प उत्पन्न गट प्रवर्गातील ७९३ सदनिका उपलब्ध आहेत. पेठ क्र. ३०-३२ येथे आर्थिक दुर्बल घटकाकरिता (वन-आरके) प्रवर्गातील ३६६ सदनिका आणि अल्प उत्पन्न गटातील (वन-बीएचके) प्रवर्गातील ४१४ सदनिका आहेत.

या प्रकल्पातील घरे डिसेंबर २०२२ पूर्वी ताबा देण्याचे नियोजित आहे. या गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याची मुदत ३ ऑक्टोबरला संपली होती. मात्र, नागरिकांच्या विनंतीवरून ही मुदत १८ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.ऑनलाइन अर्ज भरण्याकिरता http://www.pmrda.gov.in आणि http://lottery.pmrda.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. वाढीव मुदतीच्या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२२-६२५३१७२७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे अतिरिक्त आयुक्त बन्सी गवळी यांनी केले आहे.