Sanjay pandey : Navneet Rana : मुंबई पोलीस आयुक्तांनी नवनीत राणांच्या आरोपातील हवाच काढली 

Categories
Breaking News Political महाराष्ट्र
Spread the love
मुंबई पोलीस आयुक्तांनी नवनीत राणांच्या आरोपातील हवाच काढली 

मुंबई : आपण मागासवर्गीय असल्यानं आपल्याला खार पोलिसांनी हीन दर्जाची वागणूक दिली. आपल्याला पिण्यासाठी पाणीही नाकारलं गेलं असा गंभीर आरोप करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांच्या आरोपांचं पितळं उघडं पडलं आहे. पोलीस स्टेशनमध्ये राणा दाम्पत्याला नक्की कशी वागणूक दिली गेली याचा व्हिडिओ मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्विट केला आहे. यामध्ये राणा दाम्पत्य पोलिसांच्या चहापानाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ ट्विट करताना “यापेक्षा आम्हाला अधिक काही सांगायची गरज नाही”, असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे. (Navneet Rana allegations were exposed Commissioner of Mumbai Police tweet viral)

नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर २३ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यातच रात्र काढावी लागली. यावेळी त्यांना आपल्याला पिण्यासाठी पाणी दिलं नाही ना वॉशरुमला जाऊ दिलं. तसेच आपण मागासवर्गीय असल्यानं पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्याला पाणी देण्यास नकार दिला, असा गंभीर आरोप राणा यांनी खार पोलिसांवर केला होता.नवनीत राणा यांनी काल हा आरोप केला होता त्यानंतर एक दिवसानं आज मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खार पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही फुटेजची एक क्लीप ट्विट केली आहे. या ट्विटमध्ये खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे दोघेही पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी दिलेला चहा पिताना दिसत आहेत. हा व्हिडिओच सर्व काही सांगत असल्याचं सूचकपणे संजय पांडे यांनी म्हटलं आहे.नवनीत राणांनी केली होती लोकसभा अध्यक्षांकडे तक्रारदरम्यान, नवनीत राणा यांनी या प्रकरणी लोकप्रतिनिधी असल्यानं हक्कभंगाचा मुद्दा उपस्थित करत थेट लोकसभा अध्यक्षांना ई-मेल करत तक्रार केली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेत लोकसभेच्या हक्कभंग समितीनं नवनीत राणांच्या कथीत बेकायदा अटकेवर महाराष्ट्र सरकारला २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश काल दिले होते.

Leave a Reply