Night encroachment action : महापालिकेची रात्रीची अतिक्रमण कारवाई सुरु 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

महापालिकेची रात्रीची अतिक्रमण कारवाई सुरु

पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील अवैध फेरीवाल्यावर जोरदार कारवाई सुरु आहे. दरम्यान आता  वैध म्हणजेच नोंदणीकृत व्यावसायिक जे नियमांचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई सुरु केली आहे. ही कारवाई रात्री करण्यात येत आहे. रात्री १० नंतर फुटपाथ वर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली आहे. आगामी काळात देखील ही कारवाई सुरु राहणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी नियमाचे पालन करावे, असे आवाहन अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी केले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक रस्ता/पदपथांवर व्यवसाय करणाऱ्या अधिकृत परवानाधारक फेरीवाला व्यवसायिकांनी आपले व्यवसायाची वेळ संपल्यानंतर दैनंदिन व्यवसायाचे साधन, माल, साहित्य इ. हटवून सदरची जागा रिकामी करणे अपेक्षित आहे. तथापि अधिकृत
फेरीवाला व्यवसायिक सदरची जागा रिकामी करत नसल्याचे व महानगरपालिकेने घालून दिलेल्या अटी/शर्तीचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे रात्री १० नंतर ज्या फेरीवाला
व्यवसायिकांनी आपले व्यवसायाचे साधन, माल, साहित्य इ. हटवून न नेल्यामुळे सोमवार, रोजी स्वारगेट ते नाईक बि-बियाणे लगत, के.ई.एम. हॉस्पिटल जवळ, रास्ता पेठ काका हलवाई समोर, छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्र समोर, सणस ग्राउंड भिंती लगत, मंडई पोलीस चौकी समोर इत्यादी ठिकाणी पुढीलप्रमाणे हातगाडी-८, पथारी-५ व इतर-११
कारवाई करण्यात आली.

यापुढेही ज्या फेरीवाला व्यवसायिकांकडून महानगरपालिकेने घालून दिलेल्या अटी/शर्तीचे उल्लंघन होईल, तसेच जे फेरीवाला व्यवसायिक रात्री १० वाजल्यानंतर व्यवसायाची वेळ संपल्यानंतर दैनंदिन व्यवसायाचे साधन, माल, साहित्य इ. हटवून सदरची जागा रिकामी करणार नाहीत अशा व्यवसायिकांवर दैनंदिन प्रभावीपणे कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी नियमाचे पालन करावे, असे आवाहन अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी केले आहे.

Leave a Reply