PMPML Employees | Pramod Nana Bhangire | पीएमपी प्रशासनाकडून दिशाभूल करणारा दिला बैठकीचा वृत्तांत | प्रमोद नाना भानगिरे यांचा आरोप

Categories
Breaking News Political social पुणे
Spread the love

PMPML Employees | Pramod Nana Bhangire | पीएमपी प्रशासनाकडून दिशाभूल करणारा दिला बैठकीचा वृत्तांत | प्रमोद नाना भानगिरे यांचा आरोप

| कामगारांच्या प्रश्नावरून आंदोलन करण्याचा दिला इशारा

PMPML Employees | Pramod Nana Bhangire | पुणे | पीएमपीएमएल कामगारांच्या (PMP Pune Employees) प्रश्नावरून शहर शिवसेना (Pune Shivsena) आक्रमक झाली आहे. प्रशासन कामगारांच्या प्रश्नांबाबत गंभीर नसल्याचा आरोप शहर शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी केला आहे. तसेच 15 जानेवारीला याबाबत आंदोलन करण्याचा इशारा पीएमपीच्या सीएमडीना देण्यात आला आहे. याबाबत सीएमडी संजय कोलते (PMPML CMD Sanjay Kolte) या पत्र देण्यात आले आहे. (Pune PMPML News)
याबाबत भानगिरे यांनी सांगितले कि, पीएमपी कामगारांच्या विविध प्रश्नाबाबत 11 डिसेंबर ला सीएमडीच्या दालनात बैठक झाली होती. मात्र बैठकीमध्ये मान्य केलेल्या बाबींची पूर्तता आजतागायत झालेली नाही. बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार बैठक वृतांत न देता, प्रशासनाने दिशाभूल करणारा बैठकवृत्तांत दिलेला आहे. ही आपली कृती शासकीय नियमास अनुसरून नाही. असे भानगिरे यांनी म्हटले आहे. त्यासाठी सोमवार 15 जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता स्वारगेट pmpml ची मुख्य बिल्डिंग येथे शिवसेना स्टाइलणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे शहराची औद्योगिक शांतता भंग पावल्यास तसेच काही नुकसान झाल्यास अध्यक्ष व व्यस्थापकीय संचालक यांची जबाबदारी राहील. असा इशारा भानगिरे यांनी दिला आहे.