Tag: PMPML Employees
Pramod Nana Bhangire | PMPML Pune | पीएमपीएमएलच्या 1900 बदली कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करणार ..!!
| शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या आंदोलनाला मोठे यश
Pramod Nana Bhangire | PMPML Pune | पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या (Pune PMPML Emplyoees) विविध मागण्यांसाठी व परिविक्षाधीन सेवकांना मूळ वेतनश्रेणीसह तत्काळ कायम करण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Shivsena Pramod Nana Bhangire) यांच्या नेतृत्वात आज स्वारगेट येथील पीएमपीएमएल (PMPML office Swarget Pune) च्या मुख्य कार्यालयाबाहेर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलनाची तीव्रता बघता महामंडळाने अखेर पात्र कर्मचाऱ्यांना 15 फेब्रुवारी पर्यंत कायम करण्यात येईल. असे लेखी पत्र शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांना दिले. (Pramod Nana Bhangire | PMPML Pune)
दरम्यान, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या तीव्र आंदोलनानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते (Dr Sanjay Kolte IAS) यांनी परिवहन महामंडळकडील सर्व बदली कर्मचारी यांना शेड्युल मान्य कायम जागेवर नियुक्त करण्याच्या अनुषंगाने महामंडळातील प्रचलित कार्यप्रणाली धोरण कार्यवाहीला अनुसरून 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या PMPML बदली कर्मचाऱ्यांचे हजेरी रेकॉर्ड मागून त्याबाबत पंधरा जानेवारीलाच परिपत्रक निर्गमित करण्यात आले. तसेच या हजेरी डिफॉल्ट किंवा रेकॉर्ड बाबतची छाननी व तपासणी करून 15 फेब्रुवारी पर्यंत बदली कर्मचाऱ्यांची माहिती मागून पात्र कर्मचाऱ्यांना कायम करण्यात येईल. असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने पुकारलेले तीव्र आंदोलन स्थगित करण्यात आले आता पुणे परिवहन महामंडळातील कामगारांच्या कायम तत्त्वावर रुजू होण्याबाबतचा प्रश्न कायमचा मिटला आहे.
यावेळी पीएमपीएमएल. चे कर्मचारी उमेश पांढरे, नरेंद्र आवारे,हरीश माने,नरेश चव्हाण,निवास माने,संतोष बोंडे, हरीश ओव्हाळ, शोयेब पठाण, रुपाली धावरे,सुरेखा भालेराव,सुनील नलावडे, दिलीप मोहिते, बारिश जाधव,विलास जाधव, अंकुश अडगळे,विकास वारे,अनिरुद्ध साळुंखे,असीम शेख,माधवी लांडगे,शीतल काळे, व पीएमपीएमएल चे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.
PMPML Employees | Pramod Nana Bhangire | पीएमपी प्रशासनाकडून दिशाभूल करणारा दिला बैठकीचा वृत्तांत | प्रमोद नाना भानगिरे यांचा आरोप
| कामगारांच्या प्रश्नावरून आंदोलन करण्याचा दिला इशारा
PMPML Employees | पीएमपीएमएल च्या रेकॉर्ड खराब असलेल्या 36 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई | गैरहजर राहिलेल्या एकूण १४२ कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र
| २ ड्रायव्हर व वर्कशॉप विभागाकडील एका कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कारवाई
—
News Title | PMPML Employees | Suspension action against 36 employees of PMPML with bad records Charge sheet against a total of 142 employees who were absent