Objections : Suggestions : ward Formation : प्रभाग रचना : आज एकाच दिवशी 2804 हरकती  : तर एकूण 3596 हरकती प्राप्त 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

प्रभाग रचना : आज एकाच दिवशी 2804 हरकती

: तर एकूण 3596 हरकती प्राप्त

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी(PMC Election) प्रभाग रचना(Ward Formation) जाहीर करण्यात आली आहे. त्यावर नागरिकांना हरकती आणि सूचना(Suggestions and objections) देण्यासाठी 14 फेब्रुवारी पर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता समाप्त झाली आहे. या कालावधीत महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे शहरातून सुमारे 3596 हरकती प्राप्त झाल्या आहेत. तर शेवटच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला 2804 हरकती प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये नागरिक आणि सर्वच पक्षाच्या राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी हरकती नोंदवल्या आहेत. दरम्यान निवडणूक कार्यालय खालोखाल वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सर्वात जास्त हरकती दाखल झाल्या आहेत. तर सर्वात कमी हरकती शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे दाखल झाल्या आहेत.  दरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी या रचनेबाबत आक्षेप घेतलेला आहे.

: 15 दिवसापैकी 3 दिवशी 0 हरकती

महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हरकती सूचना नोंदवण्यासाठी 14 फेब्रुवारी हा अंतिम कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेचे निवडणूक कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार या 15 दिवसात महापालिकेकडे एकूण 3596 हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यातील 1 फेब्रुवारी तसेच 6 आणि 13 फेब्रुवारीला एक ही हरकत दाखल झाली नाही. 15 फेब्रुवारीला मात्र 2804 हरकती प्राप्त झाल्या. एकूण 3596 पैकी सर्वात जास्त म्हणजे 1295 हरकती निवडणूक कार्यालयाकडे तर त्याखालोखाल 1034 हरकती वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. तर सर्वात कमी हरकती शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे दाखल झाल्या आहेत. शेवटच्या दिवशी देखील वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाकडे सर्वात जास्त म्हणजे 1020 हरकती प्राप्त झाल्या आहेत.
आता यावर 28 फेब्रुवारीला अंतिम सुनावणी होईल. त्यासाठी निवडणूक आयोगाने यशदा चे महासंचालक एस चोक्कलिंगम यांची यासाठी नियुक्ती केली आहे. 2 मार्च पर्यंत त्याचा अहवाल आयोगाकडे जाईल.

: क्षेत्रीय कार्यालयानुसार आलेल्या हरकती

क्षेत्रीय कार्यालय                       हरकती
औंध-बाणेर                              35
भवानी पेठ                                23
बिबवेवाडी                                68
धनकवडी-सहकारनगर               289
ढोले पाटील रोड                        113
हडपसर-मुंढवा                           88
कसबा-विश्रामबाग                     253
कोंढवा – येवलेवाडी.                   51
कोथरूड-बावधन                        77
नगर रोड-वडगावशेरी                   156
शिवाजीनगर-घोलरोड                  12
सिंहगड रोड                               25
वानवडी-रामटेकडी                      1034
वारजे-कर्वेनगर                           62
येरवडा-कळस-धानोरी                 15
निवडणूक कार्यालय                    1295
एकूण                                         3596

 

Leave a Reply