Ward Structure : Suggestion-objections : PMC election : प्रभाग रचनेचे नकाशे कुठे पाहणार? हरकती सूचना कुठे नोंदवणार? 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

प्रभाग रचनेचे नकाशे कुठे पाहणार? हरकती सूचना कुठे नोंदवणार?

पुणे :  राज्य निवडणूक आयोगाचे(State election commission) दि.०५/१०/२०२१ व दि.०३/११/२०२१ रोजीचे आदेशानुसार पुणे महानगरपालिकेने(pune municipal corporation) आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगास सादर केलेला आहे. सदर प्रारूप प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने 28 जानेवारी रोजी मंजुरी दिलेली आहे. प्रारुप प्रभाग रचनेस मंजुरी देताना प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविणेसाठी व आलेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्याचा कार्यक्रम देखील जाहीर केलेला आहे.

त्याअनुषंगाने दि.०१/०२/२०२२ रोजी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना (प्रभागाच्या चतुःसिमेचे वर्णन) शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे (एकत्रित व प्रभाग निहाय नकाशे) महानगरपालिका संकेतस्थळावर (WEBSITE) प्रसिद्ध करण्यात येत आहेत. पुणे महानगरपालिका प्रारूप प्रभाग रचनेचा एकत्रित नकाशा पुणे महानगरपालिका विस्तारित इमारतीच्या(new pmc building) तिसऱ्या मजल्यावर नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच क्षेत्रीय कार्यालय(ward offices) निहाय संबंधित प्रभागाचे स्वतंत्र नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

: 14 फेब्रुवारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येणार हरकती

त्याचप्रमाणे हरकती सूचना 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत दाखल करण्यात येणार आहेत. 14 फेब्रुवारी दुपारी 3 पर्यंत या हरकती आणि सूचना नागरिकांना दाखल करता येतील. या हरकती व सूचना महापालिका आयुक्त(Municipal commissioner) यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर करता येतील. त्याचप्रमाणे हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणी साठी उपस्थित राहण्याबाबत स्वतंत्रपणे कळवण्यात येईल. असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

One reply on “Ward Structure : Suggestion-objections : PMC election : प्रभाग रचनेचे नकाशे कुठे पाहणार? हरकती सूचना कुठे नोंदवणार? ”

प्रभाग क्रमांक ४६ मोहंमद वाडी उरुळी देवाची.
हा प्रभाग सर्वान साठी खूला ठेवावा .प्रभागात आरक्षण नको..🙏

Leave a Reply