Spread the love

कुणा कुणाला लागले राज ठाकरेंचे फटकारे? वाचा सविस्तर  

संजय राऊत शिवसेनेचे आहेत की, राष्ट्रवादीचे हेच कळत नाही असे म्हणत आपल्याला ईडीची पुन्हा नोटीस आली तर, सामोरं जाईन, असे त्यांनी यावेळी सांगितले. देशामध्ये अनेक वर्षांपासून जाती आहेत. मात्र, 1999 ला ज्यावेळी राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातींबद्दल द्वेष निर्माण करायला लावल्याचे राज यांनी सांगितले. संभाजी ब्रिग्रेडसारख्या संघटना यांनीच तयार केल्या असे म्हणत राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच राज्यात जातीयवाद वाढल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. शरद पवार कधीही शिवजी महाराजांचं नाव घेत नाहीत ते भाषण करताना नेहमी तेव्हा शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळे धर्माकडे बघताना ते नास्तिकतेनं बघतात. ते धर्म, देव वगैरे काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात.

देशातील आणि राज्यातील मशिदींवरील सर्व भोंगे 3 मे पर्यंत उतरवा, आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही, असे सांगत त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जर मशिदींवरचे भोंगे उतरवले नाही तर, हनुमान चालीसा लावणारचं असेदेखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की, कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाहीये. आम्हाला त्याची इच्छादेखील नाही. त्यामुळे १२ एप्रिल ते ३ मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी राज्य सरकारने चर्चा करावी आणि त्यांना सगळे भोंगे खाली उतरवण्यास सांगावे.
सभेतील भाषणादरम्यान, राज ठाकरेंनी त्यांच्या स्वतःच्या विधानांचे तीन व्हिडिओ खास अजित पवारांसाठी लावले यामध्ये त्यांनी मशिंदींवरील भोग्यांबाबत भूमिका मांडली होती. यावेळी राज ठाकरे यांनी 28 जुलै 2018, 1 ऑगस्ट 2018, 23 जानेवारी 2020 मधील राज ठाकरें यांनी भोंग्याबाबत त्यांची भूमिका मांडली होती. भाषणादरम्यान, राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, त्यांच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळे भुजबळांना जेलमध्ये जावे लागले. दोन अडीच वर्षे जेलमध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिला नेते भुजबळ होते. मनसे हा विझलेला पक्ष असल्याचे जयंत पाटील म्हणतात. मात्र, मला त्यांना सांगायचे आहे की, जंतराव मनसे हा विझलेला पक्ष नाही, हा समोरच्याला विझवत जाणारा पक्ष आहे.
यावेळी राज ठाकरे यांनी जयंत पाटलांचा उल्लेख ‘जंत’ पाटील असा केला.भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी आपण देशात समान नागरी कायदा आणण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा कायदा आणा असे आवाहन नरेंद्र मोदींना केले आहे. लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे असे ते म्हणाले.राज ठाकरे म्हणाले की, अजित पवारांच्या घरी रेड पडली, पण सुप्रिया सुळेंच्या घरी नाही. अजित पवारांच्या सख्ख्या बहिणींच्या घरी रेड होते. एकाच घरात राहून रेड टाळणं सुप्रिया सुळेंना कंस जमलं? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.पंतप्रधान मोदींवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा, असे म्हणणारा पहिला माणूस मी होतो. त्यानंतर बाकीचे बोलले असे राज यांनी सांगितले.
ईडीच्या नोटीसीनंतर ट्रॅक बदलाला असे अनेकांनी म्हटले, मात्र, मला ट्रॅक बदलावा लागत नाही. कास्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर मोदींचे अभिनंदन करणारे ट्वीट माझे होते असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.माझ्या सभेपूर्वी पोलिसांचा आपल्याला फोन आला त्यावेळी त्यांनी माझा ताफा काही छोट्या संघटना अडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर उत्तर देताना माझा ताफा अडवणार हे पोलिसांना कळलं मात्र, पवारांच्या घरी एसटी कर्मचारी जाणार हे पोलिसांना कळलं नाही का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थीत केला. गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर अनेकांनी तारे तोडल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे.राज ठाकरे हेच हिंदुंचे खरे नेते होऊ शकतात असे मत मनसेचे नेते आणि प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरेंसाठी हिंदूत्त्व हेच सत्व असल्याचे ते म्हणाले. संजज राऊत मातोश्रीची नोकरी करतात अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्रीपदासाठी वडिलांचा शब्द पाळला नाही, अशी टीका महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे.
वसंत सेना ते पवार सेना असा शिवसेनेचा प्रवास असल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, शिवसेना हळूहळू संपत चालली असून, शिवसेना म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसू ‘ढ’ सेना असल्याचे ते म्हणाले. शिवसेना प्रमुखांचा विचार शिवसेनेकडून संपवला जात असल्याचेही ते म्हणाले.कोरोना काळात सर्वसामान्यांसाठी मनसेची दार उघडी होती. कामे असतात तेव्हाच मनसेची आठवण येते, मात्र निवडणुकांवेळी मनसेची आठवण का होत नाही? असा सवाल यावेळी वसंत मोरेंनी उपस्थित केला.राज्यात उद्बवलेला कोरोनाचा काळ आठवला तरी अंगावर काटा येतो असे म्हणत याकाळात सरकारनं जी कामे करायला हवी होती ती कामे करण्यास हे सरकार अपयशी ठरणल्याचा हल्लाबोल वसंत मोरे यांनी केला आहे. या जी काम करण्यात सरकार अपयशी ठरले ती सर्व कामे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.ठाण्यातील उत्तरसभेतील राज ठाकरे यांच्या भाषणापूर्वी पुण्यातील मनसेेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी भाषणाला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी कोरोनाकाळात पुण्यात उद्भवलेल्या परिस्थिवर भाष्य करत पुण्यात रस्त्यावर सामान्यांसाठी केवळ आणि केवळ मनसचे कार्यकर्ते काम करत होते. तर बाकीच्या पक्षांचे नेत मंडळी घरात बसली होती. पुण्यात एक अॅम्बेसिडर फुटली आणि त्याचा आवाज सगळ्या महाराष्ट्राने ऐकला असे वसंत मोरे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply