Bhaiyyasaheb Jadhav : प्रभाग विकासाचे रोल मॉडेल स्थायी समिती अध्यक्षांच्याच प्रभागात का? लकी ड्रॉ काढून प्रभाग निवडा!  : राष्ट्रवादी नगरसेवक आणि प्रवक्ते भैयासाहेब जाधव यांची मागणी 

Categories
PMC Political पुणे
Spread the love

प्रभाग विकासाचे रोल मॉडेल स्थायी समिती अध्यक्षांच्याच प्रभागात का? लकी ड्रॉ काढून प्रभाग निवडा!

: राष्ट्रवादी नगरसेवक आणि प्रवक्ते भैयासाहेब जाधव यांची मागणी

पुणे : स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी शहरातील 42 प्रभागामध्ये विकासाचे मॉडेल राबवण्याचे अभियान आयोजित केले आहे. त्यासाठीची सुरुवात त्यांनी आपल्या प्रभागापासून केली आहे. हेच मॉडेल सर्व प्रभागात राबवण्याचे आश्वासन रासने यांनी दिले आहे. मात्र याला राष्ट्रवादी नगरसेवक आणि प्रवक्ते भैयासाहेब जाधव यांनी आक्षेप घेतला आहे. सत्ताधारी असल्यामुळे समिती अध्यक्ष यांचा प्रभाग रोल मॉडेल म्हणून निवडला आहे. मात्र तसे न करता लकी ड्रॉ काढून प्रभाग निवडा. त्याचा विकास करून सर्व प्रभागात हे मॉडेल राबवा. महापालिका आयुक्ताकडे जाधव यांनी ही मागणी केली आहे.

: सत्ताधाऱ्यांचाच का प्रभाग निवडला?

भैयासाहेब जाधव म्हणाले, शहरातल्या सर्व प्रभागाचा विकास करण्याची संकल्पना चांगली आहे. मात्र जो रोल मॉडेल निवडला गेला आहे, तो स्थायी समिती अध्यक्ष यांचाच का? विरोधी नगरसेवकाचा किंवा इतरांचा देखील प्रभाग निवडता आला असता. आयुक्त आणि प्रशासनाला सर्व प्रभाग हे सारखेच आहेत. तसेच सत्ताधाऱ्यांना देखील सर्व शहर समानच आहे. मग समिती अध्यक्ष यांनाच झुकते माप का? असा प्रश्न जाधव यांनी विचारला आहे.
जाधव पुढे म्हणाले रोल मॉडेल साठी सर्व प्रभागाचा लकी ड्रॉ काढा. त्यात ज्याचा नंबर लागेल तो प्रभाग रोल मॉडेल म्हणून निवडा आणि त्याचा विकास करा. मग ते मॉडेल शहरातील सर्व प्रभागासाठी वापरा. मात्र फक्त सत्ताधारी आहेत म्हणून त्यांचे प्रभाग रोल मॉडेल म्हणून निवडू नका. अशी मागणी जाधव यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

One reply on “Bhaiyyasaheb Jadhav : प्रभाग विकासाचे रोल मॉडेल स्थायी समिती अध्यक्षांच्याच प्रभागात का? लकी ड्रॉ काढून प्रभाग निवडा!  : राष्ट्रवादी नगरसेवक आणि प्रवक्ते भैयासाहेब जाधव यांची मागणी ”

Leave a Reply