कैटचे 15 सप्टेंबरपासून देशभर ‘हल्ला बोल’ आंदोलन : ई-कॉमर्स क्षेत्रातील विदेशी कंपन्यांच्या मनमानी विरोधात आंदोलन

Categories
देश/विदेश पुणे
Spread the love

कैटचे 15 सप्टेंबरपासून देशभर ‘हल्ला बोल’ आंदोलन

: ई-कॉमर्स क्षेत्रातील विदेशी कंपन्यांच्या मनमानी विरोधात आंदोलन

पुणे:  कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) संघटनेच्या वतीने ऑनलाईन व्यापार करणाऱ्या विदेशी कंपन्यांच्या विरोधात येत्या 15 सप्टेंबरपासून एक महिनाभर देशभर ‘हल्ला बोल’ आंदोलन करण्यात येणार आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील विदेशी कंपन्यांच्या मनमानी कारभाराला विरोध दर्शविण्यासाठी देशभरातून व्यापारी हल्ला बोल आंदोलनात सहभागी होणार आहेत. यासंबंधी दिल्लीत झालेल्या बैठकीत 27 राज्यातील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

: केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत

कैट संघटनेचे अध्यक्ष बी सी भारतीय, सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली मध्ये झालेल्या बैठकीस महाराष्ट्रातून कीर्ती राणा, ज्योती अवस्थी, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व कैट संघटनेचे संयुक्त सचिव सचिन निवंगुणे आदी मान्यवर उपस्थित होते.
 ई-कॉमर्स क्षेत्रातील विदेशी कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे देशातील व्यापारी क्षेत्रातील वातावरण गढूळ होत आहे. देशातील सर्व व्यापाऱ्यांना कायद्याची चौकट आहे. मात्र, या ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांना मोकाट का सोडले आहे. त्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत. अशी भूमिका कैट ने घेतली आहे. तसेच, देशातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना यासंदर्भात पत्र पाठवण्यात येणार असल्याचेही कैट ने कळविले आहे.

: पुण्यातील महिला सुरक्षा अभियानाचे दिल्लीत कौतुक!

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ व कैटच्या वतीने पुणे शहरात महिला सुरक्षा अभियान राबविण्यात आले. व्यापारी बाजारपेठेत आलेल्या महिला भगिनींचे संरक्षण करण्याची जबाबदारी व्यापारी बांधवांनी घ्यावी या हेतुने हे महिला सुरक्षा अभियान राबविण्यात आले. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने हे अभियान राखी बांधून राबविण्यात आले. या अभियानाचे संयोजक पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष व कैटचे संयुक्त सचिव सचिन निवंगुणे यांचे या अभियानाच्या यशस्वी आयोजनाबद्दल दिल्लीत झालेल्या कैटच्या बैठकीत करण्यात आहे.

Leave a Reply