INDIA Front Pune | महाविकास आघाडी मेळाव्याला आबा बागुलांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा | पक्ष संघटनेत विश्वासात घेतलं नसल्याने नाराज असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा! 

Categories
Breaking News Political पुणे
Spread the love

INDIA Front Pune | महाविकास आघाडी मेळाव्याला आबा बागुलांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा | पक्ष संघटनेत विश्वासात घेतलं नसल्याने नाराज असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा!

INDIA Front Pune | पुणे लोकसभा निवडणुकीच्या (Pune Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट (India Aghadi Pune melava) चा पुण्यात मेळावा होत आहे. भाजपला मात देण्यासाठी इंडिया आघाडी मजबूत करण्या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मात्र या मेळाव्याला उपस्थित लोकांपेक्षा अनुपस्थित राहिलेल्या नेत्यांनीच जास्त जास्त चर्चा झाली. कारण काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सहा वेळा नगरसेवक राहिलेले आबा बागूल (Aba Bagul pune Congress) यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरवली. पक्ष संघटनेत विश्वासात घेतले जात नसल्याने बागूल मेळाव्याला आले नाहीत. अशी चर्चा कार्यकर्त्यामध्ये रंगली होती. शिवाय काँग्रेसमध्ये सातत्यानं डावललं जात असल्याने आपली योग्य पारख करणाऱ्या पक्षाकडे बागुल मोर्चा वळवतील,  अशी शक्यता देखील कार्यकर्ते वर्तवत होते.
लोकसभा निवडणूक जवळ येऊ घातली आहे. आचारसंहिता कधीही जाहीर होऊ शकते. त्या दृष्टीने सत्ताधारी आणि विरोधक जोरदार तयारीला लागले आहेत. भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षाला हाणून पाडण्यासाठी काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट देखील कामाला लागला आहे. खासकरून पुण्यावर या लोकांचे लक्ष आहे. त्याचाच भाग म्हणून आणि आपली एकी दाखवण्यासाठी महाविकास आघडी आणि इंडिया फ्रंट चा आज काँग्रेस भवन मध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र या मेळाव्यातील माजी उपमहापौर आबा बागूल यांची अनुपस्थिती काँग्रेस कार्यकर्त्यांना चांगलीच खटकली.
आबा बागूल हे सलग सहा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. म्हणजे 30 वर्षांचा त्यांचा कालखंड. जनसंपर्क दांडगा. शिवाय ओबीसी चेहरा. अशा सगळ्या जमेच्या बाजू असताना देखील शहर काँग्रेस मध्ये नेहमी त्यांना डावललं गेलं. अशी खंत कार्यकर्ते व्यक्त करत होते. पक्षासाठी एवढं झटणारा आणि जनसंपर्क असलेल्या माणसाला काँग्रेस ने पुढे करायला हवं होतं. अशा नेत्याच्या अनुभवाचा उपयोग करून घ्यायला हवं. मात्र तेच होताना दिसत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना एकदाही संधी दिली गेली नाही. उलट जे लोक नेहमी निवडणुकीत अपात्र ठरले त्यांना लोकसभा आणि विधानसभा लढवण्यासाठी पुढं केलं जातं. त्यात ही लोकं हरली तर पुन्हा त्यांनाच पदाधिकारी म्हणून पार्टीत महत्वाची पदं दिली जातात. अशाने काँग्रेस कधी मोठी होणार पुढे जाणार? अशीही व्यथा कार्यकर्ते बोलून दाखवत होते.
बागुल यांनी पार्टीने त्यांच्या 30 वर्षाच्या कालावधीत अवघी 8-9 वर्षे महत्वाची पदे दिली. ती देखील सगळ्यांना देऊन झाल्यानंतर. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्तेत काँग्रेस कडे उपमहापौर पद होते. बागूल यांना हे पद शेवटी दिलं गेलं. काँग्रेसनं ज्यांना उपमहापौर केलं त्या सर्वांनी पक्ष बदलला. बागूल यांनी मात्र आपला एकनिष्ठतेचा धर्म पाळला. असे असूनही त्यांना पक्ष संघटनेत विश्वासात घेतलं जात नसल्याची चिंता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
आजचा मेळावा हा इंडिया आघाडी, पुणे च्या दृष्टीने खूप महत्वाचा होता. तसेच काँग्रेस च्या दृष्टीने देखील. काँग्रेस भवन मधला हा मेळावा कार्यकर्त्यांना बळ देणार आहे. अशा वेळी काही महत्वाच्या नेत्यांची नाराजी दिसणे, हे ग्रहण लागल्यासारखे आहे. काँग्रेस मधून महत्वाचे नेते निघून जात आहेत. राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, ज्योतिरादित्य सिंधिया नुकतेच अशोक चव्हाण, अशा लोकांना भाजपनं हेरलं आणि आपल्या पक्षात घेतलं. शिवाय त्यांना चांगली पदे देखील दिली. तरीही काँग्रेस मध्ये अंतर्गत बदल होताना दिसून येत नाही. बागुल यांच्यासारखा नेता देखील आपल्या कारकिर्दीला साजेसा पक्ष शोधू शकतो. काँग्रेसने अशी लोकं टिकवून ठेवायला हवीत. तरच पक्ष पुढे जाईल आणि सत्तेची गणितं सोपी होतील.