MWRRA : PMC : पाटबंधारे विभागा नंतर आता जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे देखील महापालिकेला ‘हे’ आदेश 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

खडकवासल्यातून पाणी उचलणे टप्या टप्याने कमी करा

: जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे महापालिकेला आदेश

पुणे : पुण्याच्या पाणी वापरावर सर्वांचेच लक्ष आहे. खडकवासला सोबतच महापालिका भामा आसखेड धरणातून देखील पाणी घेत आहे. त्यामुळे खडकवासल्यातून पाणी घेणे कमी करा, असे आदेश पाटबंधारे कडून वारंवार दिले जात आहेत. त्यानंतर आता जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने देखील महापालिकेला आदेश दिले आहेत कि खडकवासल्यातून पाणी घेणे टप्या टप्याने कमी करा; कारण भामा आसखेड धरणातून पाणी घेतले जात आहे. शिवाय पीएमसीने महसुली नसलेले पाणी कमी करण्यासाठी पावले उचलावीत. असे ही आदेश प्राधिकरणाने दिले आहेत.

: महापालिकेच्या पाणी वापरावर सर्वांचे लक्ष

सद्य स्थितीत शहराची गरज पाहता महापालिकेकडून खडकवासला, भामा आसखेड यामधून सुमारे 1590 MLD पाणी दररोज घेतले जाते. पालिकेचा मंजूर कोटा पाहता हे पाणी जास्त घेतले जाते, असा दावा पाटबंधारे विभाग नेहमी करत असतो. त्याबाबत पाटबंधारे कडून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत तक्रार देखील केली जाते. समिती अध्यक्षांनी देखील महापालिकेला पाणी वापर कमी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पाटबंधारे कडून पालिकेला वारंवार पत्रे देखील पाठवली जातात. त्यांनतर आता जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने (MWRRA) ने देखील  महापालिकेला आदेश दिले आहेत कि खडकवासल्यातून पाणी घेणे टप्या टप्याने कमी करा.

 : धोरण तयार न केल्याने महापालिकेला फटकारले

दरम्यान  31/12/2020 रोजी झालेल्या सुनावणीत PMC ला MWRRA ने एक धोरण तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार  बांधकामासाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याबाबत बिल्डर्स / डेव्हलपर्ससाठी मार्गदर्शक तत्त्वे, तयार करण्यास सांगण्यात आले होते.  मात्र, पीएमसीने या निर्देशाचे पालन केलेले नाही.  त्यामुळे पी.एम.सी
 ने धोरण तयार करून प्राधिकरणास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच  PMC ने विचार करून सांडपाणी प्रक्रिया प्लांटची रचना आणि स्थापना करावी, अंतिम मंजूर पाणीपुरवठ्याच्या 80% म्हणजेच 11.50 TMC. शिवाय पीएमसीने मुंढवा जॅकवेलला समितीच्या भेटीची व्यवस्था करावी. असे ही प्राधिकरणाकडून आदेश देण्यात आले आहेत.

: पाणी वापर कमी करणे मनपाला अडचणीचे

वारंवार येणाऱ्या तक्रारी पाहता महापालिका प्रशासनाने दिवाळी नंतर पाणी वापर कमी करण्याबाबत धोरण करण्याचे ठरवले होते. त्यानुसार नियोजन सुरु होते. मात्र प्रशासनाच्या लक्षात आले कि महापालिकेची यंत्रणा अशी आहे कि ज्यामध्ये पाणी फक्त वाढवता येऊ शकते. कमी करता येत नाही. पाणी कमी केले तर काही भागामध्ये पाणीच जात नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभाग हतबल झाला आहे.

Leave a Reply