‘Medicine Mrs. Maharashtra’ : पुणे महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला सौंदर्य स्पर्धेत सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार

Categories
Breaking News cultural आरोग्य पुणे महाराष्ट्र
Spread the love

डॉ. प्रीती अहिरे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव

‘मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र’ सौंदर्य स्पर्धेत सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार प्रदान

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती अहिरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ‘मेडिक्वीन मेडिको मिसेस महाराष्ट्र’ या सौंदर्य स्पर्धेमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोरोनाकाळात कोविड केअर सेंटर, लसीकरण अधिकारी म्हणून त्यांनी त्यांच्या जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडल्या. त्यामुळे त्यांना “ब्यूटी विथ पर्पज” या शिर्षकानेसुद्धा गौरविण्यात आले.

विविध वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणजेच ‘मेडिक्वीन मेडिको मिसेस महाराष्ट्र’ या सौंदर्य स्पर्धा. या स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पुण्यात पार पडली. महाराष्ट्रातील विविध भागातून सुमारे 2०० महिला डॉक्टरांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यातून ५५ स्पर्धक शेवटच्या फेरीमध्ये पोहोचले. या स्पर्धकांमधून रॉयल गटातून ५ विजेते आणि क्लासिक गटातून ३ विजेते घोषित करण्यात आले.

ॲलोपॅथी, आयुर्वेद, डेंटल, होमिओपॅथी, फिजिओथेरपी क्षेत्रातील सर्व महिला डॉक्टरांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन मेडिक्वीन मेडिको पेजंटच्या कार्यकारी अध्यक्षा डॉ. प्रेरणा बेरी-कालेकर आणि सचिव डॉ. प्राजक्ता शहा यांच्याकडून दरवर्षी करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेचे तिसरे पर्व आहे. बालेवाडी येथील ऑर्किड हॉटेल येथे स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. रांका ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेला डाबर इंडिया लिमिटेड आणि शिवामृत मिल्क प्रॉडक्ट्स हे स्पर्धेचे सहप्रायोजक होते.

योगेश पवार यांनी कोरीओग्राफर म्हणून काम पाहिले. कशिश प्रॉडक्शन कंपनीने व्यवस्थापकीय काम पाहिले. या स्पर्धेसाठी प्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी, शितल रांका, डॉ. रेवती राणे,  डॉ. ऊज्वला बर्दापूरकर, डॉ. श्रद्धा जावंजल, डॉ. अमोल गिते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच अभिनेत्री पूजा सावंत, सुशांत शेलार, डॉ. ऊत्कर्ष शिंदे,  तेजपाल वाघ आदींची कार्यक्रमाला उपस्थिती होती. सुनेत्राताई पवार यांनी या स्पर्धेला पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply