Biodiversity Park | PMC Pune | BDP विकसित करण्यासाठी ठोस आराखडा तयार करण्याची मागणी | महापालिका आयुक्तांकडे खासदार वंदना चव्हाण यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

Biodiversity Park | PMC Pune | BDP विकसित करण्यासाठी ठोस आराखडा तयार करण्याची मागणी | महापालिका आयुक्तांकडे खासदार वंदना चव्हाण यांची मागणी 

Biodiversity Park | PMC Pune | शहराच्या विकास आराखड्यात (Pune Devlopment Plan) पुणे आणि आजूबाजूच्या टेकड्या बीडीपी (Biodiversity Park) म्हणून आरक्षित केल्या गेल्या आहेत, परंतु सदर जमीनी मध्ये टेकडी फोड,  अनधिकृत बांधकामे होत असल्याचे वारंवार निदर्शनास येते. तसेच सदर आरक्षणातील जमीन मालकांना किती मोबदला द्यावा यासंदर्भात शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही यासाठी आज खा. वंदना चव्हाण (MP Vandana Chavan) यांनी महापालिका आयुक्तांची (PMC Commissioner) भेट घेतली. (Pune Municipal Corporation) 

महापालिका आयुकताना सादर केलेल्या निवेदनात खालीलप्रमाणे मुद्दे मांडण्यात आले.

1) BDP विकसित करण्यासाठी ठोस आराखडा तयार करणे.

२) बीडीपी आरक्षणाखालील सर्व क्षेत्रांचे सरकारी आणि खाजगी मालकीचे असे वर्गीकरण करणे.

3) BDP क्षेत्रातील सरकारी मालकीच्या जमिनी हरित करण्यास आरखडा व अंमलबजावणी तातडीने करणे.

4) सदर परिसर हरित व विकसित करण्यासाठी कॉर्पोरेट व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेणे

5) राज्य शासनाच्या निर्देश्याप्रमाणे दर सहा महिन्यांनी हाय रिझोल्यूशन इमेज उपलब्ध करणे

6) बीडीपीसाठी आरक्षित जमिनीची बेकायदेशीर विक्री थांबवण्यासाठी 7/12 च्या उताऱ्यामध्ये बीडीपी आरक्षणाची नोंद करणे.

7) आरक्षित क्षेत्रामध्ये बेकायदेशीर टेकडी फोड आणि अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी – हेल्पलाईन व बीट ऑफिसर्सची कार्यक्षम यंत्रणा तयार करणे.

8) बीडीपी आरक्षण क्षेत्रातील खाजगी जमिनीच्या मालकांना भरपाई देण्यासाठी सूत्र शोधणे.

शहराची  झपाट्याने होत असलेली वाढ, सरकारचे भरघोस एफएसआयच्या वाटपाचा निर्णय (ज्याला आमचा विरोधही आहे). हवामान बदलाचे गंभीर परिणाम – ढगफुटीपूर येणेउष्णतेच्या लाटाहवेची खालावत जाणारी गुणवत्तारोगराई, भूगर्भातील पाणी कमी होणे इ. लक्षात घेता शहराच्या हिरव्या फुफ्फुसांचे संरक्षण करणे अत्यंत अत्यावश्यक आहे!!

तरी टेकडी सर्वर्धनाच्या विषयाला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रशासनाने तातडीने व लवकरात लवकर पाठपुरावा करावा असे सूचित करण्यात आले. माननीय महापालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी या विषयासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली.

सदर बैठकीसाठी खा. वंदना चव्हाण, श्री. यशवंत खैरे (माजी उद्यान अधीक्षक, पुणे मनपा), अनिता बेनेंजर (वास्तुविशारद), श्री. नितीन कदम (अध्यक्ष अर्बन सेल पुणे शहर), श्री. नितीन जाधव (समन्वयक, अर्बन सेल महाराष्ट्र प्रदेश) आदि उपस्थित होते.