Blood Donation Camp | एक हजारहून अधिक नागरिकांचे रक्तदान | आयोजक सनी निम्हण यांचे पालकमंत्र्यांकडून विशेष कौतुक

Categories
Political social पुणे
Spread the love

Blood Donation Camp | रक्तदान शिबीराच्या मध्यमातून नागरिकांचे प्राण वाचवावे | पालकमंत्री चंद्रकांत पाटील

| एक हजारहून अधिक नागरिकांचे रक्तदान | आयोजक सनी निम्हण यांचे पालकमंत्र्यांकडून विशेष कौतुक

Blood Donation Camp | छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःचे रक्त सांडले, आपण रक्तदान शिबिराच्या माध्यमातून लोकांचे प्राण वाचवले पाहिजेत. पुणे शहर व जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने माजी नगरसेवक सनी निम्हण (Ex corporation Sunny Nimhan) यांनी रक्तदान शिबीराचे (Blood Donation Camp) आयोजन केल्याने अनेकांचे प्राण वाचतील” अशी कौतुकाची थाप पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrkant Patil) यांनी निम्हण यांना दिली. (Blood Donation Camp)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोमेश्वर देवस्थान, सोमेश्वर फाउंडेशन, विठ्ठल सेवा मंडळ यांच्या माध्यमातून सोमेश्वर मंदिर, सोमेश्वरवाडी, पाषाण (पेठ जिजापुर) या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी रविवार (ता.४) जून केले होते. शिबीराचे उदघाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, “शासनाच्या वतीने तिथीप्रमाणे रायगडावर दिमाखदार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला. वर्षभरात प्रत्येक जिल्ह्यात ‘जाणता राजा’ कार्यक्रम शासनाच्या वतीने घेतला जाईल, ज्यामधून प्रत्येक घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहचेल. प्रत्येक जिल्ह्यातील हजारो तरुणांना मोफत रायगडाचे दर्शन दिले जाणार आहे.शिबिरासाठी श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांचे विशेष सहकार्य लाभले. १०४१ रक्तदात्यांचे रक्तसंकलन अक्षय रक्त पेढी यांनी केले.

यावेळी सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष पोपटराव जाधव, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे राहुल कोकाटे, खंडू अरगडे, तानाजी काकडे, शंकर घोलप, सुनील खुळे, भरत जोरे , भारतीय जनता पक्ष कोथरुड विधानसभा माजी अध्यक्ष प्रकाश बालवडकर, उमेश वाघ, प्रमोद कांबळे, स्विकृत माजी नगरसेवक सचिन पाषाणकर, गोवर्धन बांदल, सरपंच नांदेगाव सुनील जाधव,
शिवसेना समन्वय कोथरूड विधानसभा संजय निम्हण, अध्यक्ष सोमेश्वरवाडी ग्रामस्थ शाम काकडे, दक्षिण अभिनेता देव गील ,
औंध गाव देवस्थान विश्वस्त मंडळ योगेश जुनवणे, महेंद्र जुनवणे, हेरंब कलापुरे आदी उपस्थित होते.


News Title | Blood donation by more than one thousand citizens. Organizer Sunny Nimhan has special commendation from the Guardian Minister.