Narendra Dabholkar | रक्त देऊन इतरांचे प्राण वाचवणं ही अहिंसा | ८० जणांचे रक्तदान | महा. अंनिसच्या शिवाजीनगर शाखेचा उपक्रम

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Narendra Dabholkar | रक्त देऊन इतरांचे प्राण वाचवणं ही अहिंसा  | ८० जणांचे रक्तदान

| महा. अंनिसच्या शिवाजीनगर शाखेचा उपक्रम

Narendra Dabholkar | खून करणे ही हिंसा आहे, तर खून देऊन इतरांचे प्राण वाचवणे ही अहिंसा आहे, असा संदेश देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (Maharashtra Andhshraddha Nirmulan Samiti) संस्थापक डॉ नरेंद्र दाभोलकर (Dr Narendra Dabholkar) यांना 80 जणांनी रक्तदान करून अभिवादन केले.

 स्वातंत्र्यदिनी एस एम जोशी सभागृह येथे महा. अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेने रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यंदा या शिबीराचे हे तिसरे वर्ष होते. शिबिरासाठी 203 जणांची नोंदणी होऊन त्यातून 80 जणांनी रक्तदान केले, अशी माहिती या शिबीराचे समन्वयक विशाल विमल यांनी दिली. डॉक्टर दाभोलकर यांना रक्तबंबाळ करून त्यांचा प्राण घेणाऱ्या हिंसक प्रवृत्तीला, दाभोलकरांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान करून इतरांचे प्राण वाचवण्याची थेट कृती हे अहिंसात्मक, मानवतावादी उत्तर आहे, असेही विशाल विमल यांनी सांगितले.

शिबिरामध्ये विविध क्ष्रेत्रातील मान्यवर व नागरिक सहभागी झाले होते. संशोधक लेखक साहित्यिक अच्युत गोडबोले, राज्य आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, मानव कांबळे, साहित्यिक आसावरी निफाडकर, प्रकाशक शरद अष्टेकर, राज्य अधिकारी मनीषा गंपले, प्राध्यापक प्रकाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाला जागा आणि व्यवस्था एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनने उपलब्ध करून दिली. रमेश धर्मावत, प्रांजल पाठक यांचे सहकार्य लाभले. ससून रक्त पेढीने रक्तसंकलनास सहकार्य केले. शिवाजीनगर शाखेच्या कार्यकर्त्यानी अत्यन्त चिकाटी, निष्ठेने उपक्रम पार पाडला. संयोजनामध्ये माधुरी गायकवाड, स्वप्नील भोसले, आकाश छाया, रविराज थोरात, प्रतीक कालेकर, श्याम येणगे, विनोद लातूरकर, एकनाथ पाठक, सतीश जाधव, मयूर पटारे, कपिल क्षीरसागर, अविनाश इंगळे, अक्षय दावडीकर, प्रवीण खुंटे, लालचंद कुंवर, निशांत धाइंजे, रविकिरण काटकर, रवी आमले, प्रिया आमले, निखिल सुक्रे, मनोहर पाटील आदी कार्यकर्ते सक्रिय होते.

—–

दहा वर्षे खूनाची, कार्यरत विवेकी असंतोषची…!

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला यावर्षी 10 वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु, अजूनही त्यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे 19 ऑगस्ट रोजी सायं. ५-३० वाजता विठ्ठल रामजी शिंदे पूल येथे स्मृतिजागर, २० ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता विठ्ठल रामजी शिंदे पूल येथे स्मृतिजागर आणि तेथून एस एम जोशी सभागृहापर्यन्त मूकमोर्चा आणि त्यानंतर सकाळी 9-30 वाजता एस एम जोशी सभागृह येथे विवेक निर्धार मेळावा होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत राम पुनियानी, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, सामाजिक कार्यकर्त्या रझिया पटेल, महा. अंनिसचे अध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष माधव बावगे उपस्थित असणार आहेत.
——–

Dr Narendra Dabholkar | डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वातंत्र्यदिनी अंनिसचे रक्तदान शिबीर

Categories
Breaking News cultural social पुणे

Dr Narendra Dabholkar | डॉ. दाभोलकरांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वातंत्र्यदिनी अंनिसचे रक्तदान शिबीर

| महा. अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेचा उपक्रम

Dr Narendra Dabholkar | अंधश्रद्धा निर्मूलनाच्या (Andhshraddha Nirmulan Samiti) कामाचे अध्वर्यू डॉ नरेंद्र दाभोलकर (Dr Narendra Dabholkar) यांच्या हत्येला २० ऑगस्ट २०२३ रोजी १० वर्षे होत आहेत. या काळात संघटनेने विविध आंदोलने, मोर्चे, निषेध सभा, उपक्रम घेऊन कारवाईची मागणी केली.  मात्र अद्यापही आरोपींवर कारवाई होऊ शकली नाही.  यंदाही डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी पुण्यातील पत्रकार भवनच्या मागील बाजूला असलेल्या एस एम जोशी सभागृह येथे रक्तदान शिबिर (Blood Donation Camp) आयोजित केले आहे.  ”तुम्ही रक्त घेऊन प्राण घेता – आम्ही रक्त देऊन प्राण वाचवतो” हाच संदेश या रक्तदान शिबिरातून डॉ. दाभोलकरांचा हत्या केलेल्या धर्मांध, सनातनी शक्तींना मिळेल. (Dr Narendra Dabholkar)
 रक्त आणि रक्तातील घटक हे मनुष्यासह सर्वच प्राण्यासाठी प्राणाइतकेच आवश्यक आहेत. पण प्राणाचे मूल्य माहीत नसणाऱ्या सनातनी धर्मांध शक्ती समाजात आहेत. याच शक्तींनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून करून, त्यांना रक्तबंबाळ करून, त्यांचे प्राण घेतले. मात्र सजग नागरिक, कार्यकर्ते 15 ऑगस्टला रक्तदान करून अहिंसेचा संदेश देतात. यंदाही नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदानातून मानवतावादाशी आणि स्वातंत्र्यलढ्याशी घट्ट नाते जोडावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शिवाजीनगर पुणे शाखेने केले आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी शिबीर समन्वयक विशाल विमल 7276559318 यांच्याशी संपर्क साधावा.
——
News Title | Dr Narendra Dabholkar Dr. Annis blood donation camp on Independence Day on the occasion of Dabholkar’s memorial day

Blood Donation Camp | एक हजारहून अधिक नागरिकांचे रक्तदान | आयोजक सनी निम्हण यांचे पालकमंत्र्यांकडून विशेष कौतुक

Categories
Political social पुणे

Blood Donation Camp | रक्तदान शिबीराच्या मध्यमातून नागरिकांचे प्राण वाचवावे | पालकमंत्री चंद्रकांत पाटील

| एक हजारहून अधिक नागरिकांचे रक्तदान | आयोजक सनी निम्हण यांचे पालकमंत्र्यांकडून विशेष कौतुक

Blood Donation Camp | छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःचे रक्त सांडले, आपण रक्तदान शिबिराच्या माध्यमातून लोकांचे प्राण वाचवले पाहिजेत. पुणे शहर व जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने माजी नगरसेवक सनी निम्हण (Ex corporation Sunny Nimhan) यांनी रक्तदान शिबीराचे (Blood Donation Camp) आयोजन केल्याने अनेकांचे प्राण वाचतील” अशी कौतुकाची थाप पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrkant Patil) यांनी निम्हण यांना दिली. (Blood Donation Camp)

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोमेश्वर देवस्थान, सोमेश्वर फाउंडेशन, विठ्ठल सेवा मंडळ यांच्या माध्यमातून सोमेश्वर मंदिर, सोमेश्वरवाडी, पाषाण (पेठ जिजापुर) या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी रविवार (ता.४) जून केले होते. शिबीराचे उदघाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, “शासनाच्या वतीने तिथीप्रमाणे रायगडावर दिमाखदार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला. वर्षभरात प्रत्येक जिल्ह्यात ‘जाणता राजा’ कार्यक्रम शासनाच्या वतीने घेतला जाईल, ज्यामधून प्रत्येक घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहचेल. प्रत्येक जिल्ह्यातील हजारो तरुणांना मोफत रायगडाचे दर्शन दिले जाणार आहे.शिबिरासाठी श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांचे विशेष सहकार्य लाभले. १०४१ रक्तदात्यांचे रक्तसंकलन अक्षय रक्त पेढी यांनी केले.

यावेळी सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष पोपटराव जाधव, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे राहुल कोकाटे, खंडू अरगडे, तानाजी काकडे, शंकर घोलप, सुनील खुळे, भरत जोरे , भारतीय जनता पक्ष कोथरुड विधानसभा माजी अध्यक्ष प्रकाश बालवडकर, उमेश वाघ, प्रमोद कांबळे, स्विकृत माजी नगरसेवक सचिन पाषाणकर, गोवर्धन बांदल, सरपंच नांदेगाव सुनील जाधव,
शिवसेना समन्वय कोथरूड विधानसभा संजय निम्हण, अध्यक्ष सोमेश्वरवाडी ग्रामस्थ शाम काकडे, दक्षिण अभिनेता देव गील ,
औंध गाव देवस्थान विश्वस्त मंडळ योगेश जुनवणे, महेंद्र जुनवणे, हेरंब कलापुरे आदी उपस्थित होते.


News Title | Blood donation by more than one thousand citizens. Organizer Sunny Nimhan has special commendation from the Guardian Minister.

Maharaktadan camp | महापालिकेच्या महारक्तदान शिबिरात 470 रक्तदात्यांचे रक्तदान 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे महाराष्ट्र

महापालिकेच्या महारक्तदान शिबिरात 470 रक्तदात्यांचे रक्तदान

पुणे |. राज्यशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार तसेच डॉ. तानाजी सावंत, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या संकल्पनेतून पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात  ९ फेब्रुवारी रोजी ‘महारक्तदान शिबिर’ मोहिमे अंतर्गत एकूण १३ आरोग्य संस्थामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये ३५८ पुरुष व ११२ स्त्रिया असे एकूण ४७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. (pmc pune)
 पुणे महानगरपालिका भवन येथे रक्तदान शिबिराचे उदघाटन प्रशासक तथा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी
अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) डॉ. कुणाल खेमनार, आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव, मा. खातेप्रमुख व अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये एकूण ६६ अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. (pune municipal corporation)
पुणे महानगरपालिका अधिनस्त १५ आरोग्य संस्थामध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उदघाटन स्थानिक लोकप्रतिनिधी व समाजातील प्रतिष्ठीत नागरिक यांचे उपस्थितीत करण्यात आले. सदर शिबिरामध्ये एकूण २,०५३ रुग्णांची तपासणी करण्यात आली (पुरुष :- ९०० व स्त्रिया १,१५३) व त्या पैकी १,१८० (पुरुष :- ५५७ व स्त्रिया ६२३) रुग्णांवर उपचार करण्यात आले व एकूण १७ (पुरुष :- ०५ व स्त्रिया १२) रुग्णांना पुढील उपचारार्थ संदर्भित करण्यात आले.
“जागरूक पालक सुदृढ बालक” या अभियानाचे उदघाटन सिग्नेट पब्लिक स्कूल हांडेवाडी रोड येथे  उल्हास तुपे यांचे शुभहस्ते व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांचे उपस्थितीत झाले. त्यावेळी  योगेश ससाणे (माजी सभासद पुणे मनपा) व  अविनाश काळे (माजी सभासद पुणे मनपा) उपस्थित होते. सदर अभियानांतर्गत पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण ७,३३३ विद्यार्थी यांची तपासणी करण्यात आली व त्या पैकी १०५ विद्यार्थी यांच्यावर उपचार करण्यात आले व एकूण ४२६ विद्यार्थी यांना पुढील उपचारार्थ संदर्भित करण्यात आले.

Blood Donation Camp | दाभोलकरांच्या बलिदान दिनानिमित्त ६२ जणांचे रक्तदान | महा. अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेचा उपक्रम

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

दाभोलकरांच्या बलिदान दिनानिमित्त ६२ जणांचे रक्तदान

| महा. अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेचा उपक्रम

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व शहीद डॉ. दाभोलकर स्मृतिदिनानिमित्त

पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानदिनानिमित्त पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 62 जणांनी रक्तदान केले.

ससून रुग्णालयाच्या रक्तपेढीने रक्तसंकलन केले. एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनने विशेष सहकार्य केले. या शिबिराला राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, काँग्रेसचे प्रवक्ते गोपालदादा तिवारी, शाहीर सचिन माळी, शीतल साठे, महाराष्ट्र अंनिसचे प्रधानसचिव संजय बनसोडे, विक्रीकर अधिकारी मनीषा गंपले, शिक्षणअधिकारी कमलादेवी आवटे, प्रहार संघटनेचे धमेन्द्र सातव आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. राज्य पदाधिकारी विशाल विमल यांनी भूमिका व्यक्त केली. रविराज थोरात, वनिता फाळके, लालचंद कुंवर, विनोद खरटमोल, घनश्याम येणगे आदी यावेळी उपस्थित होते.

जाती, धर्मातील माणसांमध्ये भेदभाव मोठया प्रमाणात आजही पाळला जातो. रक्त हा सर्वांसाठी आवश्यक घटक असून त्याला कोणत्या जाती-धर्माचा रंग नाही. रक्त हा एकत्व सांगनारा घटक असून समाजात आपण सारे एक आहोत, अशी भावना निर्माण करण्यासाठी रक्तदान शिबिरे सर्व स्तरांमध्ये होण्याची याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रदीप आवटे यांनी केले.

Sunny Nimhan | blood donation camp | मा. नगरसेवक सनी निम्हण आयोजीत रक्तदान शिबिरात विक्रमी ८०९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Categories
Political social पुणे

मा. नगरसेवक सनी निम्हण आयोजीत रक्तदान शिबिरात विक्रमी ८०९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून माजी नगरसेवक सनी उर्फ चंद्रशेखर विनायक निम्हण यांच्या संकल्पनेतून सोमेश्वर देवस्थान सोमेश्वरवाडी पाषाण, विठ्ठल सेवा मंडळ सोमेश्वरवाडी(एक गाव एक गणपती) यांच्या वतीने श्री शिवशंभु चारिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने आज रविवार दि. ५/६/२०२२ रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास विक्रमी ८०९ रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.

प्रकरणाची माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण म्हणाले की, आम्ही केलेल्या आवाहनाला परिसरातील युवकांनी नागरिकांनी आणि महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदान केले हे फार आनंददायी आहे. परिसरात खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर होत असताना आपण आव्हान करत रक्तदान शिबिर आयोजित केल्यानंतर मोठ्या प्रमाणात सर्वांनी येऊन रक्तदान केले त्याबद्दल मी रक्तदात्यांचा आभारी आहे. येणाऱ्या पुढील काळात देखील वेगवेगळ्या समाजोपयोगी कार्यक्रम आपण राबविणार आहोत त्यास देखील आपण असाच उदंड प्रतिसाद देत रहाल असा विश्वास आहे.

यावेळी सोमेश्वर देवस्थान विश्वस्त पोपटराव जाधव, कै. बालोबा सुतार दिंडी अध्यक्ष खंडू अरगडे, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, औंध गाव विश्वस्त मंडळ अध्यक्ष योगेश जुनवणे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, राहुल कोकाटे, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, संजय निम्हण, संजय बालवडकर, गोविंद रणपिसे, मोरेश्वर बालवडकर, बालम सुतार, योगेश सुतार, रुपेश जुनवणे, मुन्ना शिंदे, सुप्रीम चोंधे, आरपीआय चे रमेश ठोसर आणि परिसरातील सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले.

या रक्तदान शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण, बाळा बामगुडे, सोमेश्वर देवस्थान सोमेश्वरवाडी पाषाण, विठ्ठल सेवा मंडळ सोमेश्वरवाडी(एक गाव एक गणपती) यांनी केले होते.

Blood donation camp : सांगवी परिसर महेश मंडळाच्या २५ व्या रक्तदान शिबिरात २३२ रक्तदात्यांचे रक्तदान 

Categories
social आरोग्य पुणे

सांगवी परिसर महेश मंडळाच्या २५ व्या रक्तदान शिबिरात २३२ रक्तदात्यांचे रक्तदान

दरवर्षीप्रमाणे सांगवी परिसर महेश मंडळतर्फे कै.तुकाबाई जगन्नाथ लोहिया व यांच्या स्मरणार्थ २५व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्ताचा तुटवडा भागवण्यासाठी पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहातील बहुउद्देशीय हॉलमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया यांनी दिली.

यावेळी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या महापौर माई ढोरे, हर्षल ढोरे, सुजाता पलांडे , शारदाताई सोनवणे, सतीश लोहिया, गजानंद बिहाणी आदी उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात २३२ रक्तदात्यानी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. रक्तसंकलनसाठी पुना हॉस्पिटल व इंडियन सेरॉलॉजिकल रक्तपेढ़ीने सहकार्य केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश अटल ,मुकुंद तापडिया , गणेश चरखा ,तुषार चांडक , पंकज पंपालिया यांनी सहकार्य केले.