CCTV : PMC : Investigation : सीसीटीव्ही च्या कामांची होणार तपासणी!   : 4 अधिकाऱ्यांची समिती गठीत 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

सीसीटीव्ही च्या कामांची होणार तपासणी!

: 4 अधिकाऱ्यांची समिती गठीत

पुणे : पुणे शहरात विविध ठिकाणी विद्युत विभागाकडून(PMC Electric Dept) सन २०१९-२० व सन २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये C.C.T.V. कॅमेरे बसविण्याची कामे करण्यात आलेली आहेत. मात्र कामांबाबत आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यामुळे या कामांची तपासणी(Investigation) करणेसाठी  कार्यकारी अभियंता (मल:निसारण) प्रमोद उंडे यांचे नियंत्रणाखाली 4  अधिकारी यांची समिती गठीत(commitee Formation) करण्यात आली आहे.

: 25 लाखांवरील कामांची तपासणी

महापालिकेच्या अर्थसंकल्पात(PMC Budget) सिसिटीव्ही बसवण्याच्या कामास निधी उपलब्ध करून देण्यात येतो. मात्र नगरसेवकांचे गल्लीबोळात सीसीटीव्ही बसवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या कामांची तपासणी करण्याचे प्रशासनाने ठरवले आहे. त्यानुसार या कामासाठी 4 अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. प्रमोद उंडे यांचे नियंत्रणाखाली ही समिती असेल. यामध्ये उप अभियंता (पापु) शशिकांत ब्राम्हणकर, कनिष्ठ अभियंता (पापु) शिवानंद अंकोलीकर व कनिष्ठ अभियंता (पापु) अंकुश गावडे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

: समितीने करावयाची कामे

गठीत समितीने सन २०१९-२० व सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात C.C.T.V. कॅमेरा बसविण्याबाबत करण्यात आलेल्या २५ लाखांवरील कामांची माहिती एकत्रीत करून सदर कामांपैकी कोणत्या कामांची स्थळ पाहणी करून तपासणी करावयाची हे अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून  निश्चित करून घ्यावे.  समितीने तपासणी करताना कामांची पूर्वगणनपत्रकाप्रमाणे तांत्रिक स्पेसीफीकेशननुसार कामे पूर्ण झालेली आहेत काय ? तसेच नगाचे दर बाजारभावाशी, पोलीस विभागाकडील दराशी सुसंगत आहेत अगर कसे ? कामे पूर्ण झाल्यानंतर सदरचे C.C.T.V. कॅमेरे पुढील संचलनासाठी पोलीस विभागाकडे हस्तांतरित केले आहेत अगर कसे ? बसविण्यात आलेले C.C.T.V. कॅमेरे सुस्थितीत आहेत अगर कसे ? या बाबींचीही पडताळणी करून गोपनीय अहवाल दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२ पूर्वी (Before 4 february) सादर करावयाचा आहे.

: विद्युत विभागाचे अधिकारी का नाही?

दरम्यान cctv च्या कामाची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या समितीत 3 अधिकारी हे पाणी पुरवठा विभागाचे आहेत. वास्तविक पाहता cctv च्या कामाची चांगली तांत्रिक माहिती विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना असते. मात्र त्यांना डावलून पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना हे काम देण्यात आले आहे. त्यामुळे विद्युत विभागावर विश्वास नाही, असा अर्थ यातून काढला जात आहे.

Leave a Reply