Samajmandir, Gymnasium | PMC | समाजमंदिर, व्यायामशाळा विनियोग नियमावलीत बदल 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

समाजमंदिर, व्यायामशाळा विनियोग नियमावलीत बदल

: पहिले परिपत्रक अतिरिक्त आयुक्तांनी केले रद्द

व्यायामशाळा, अभ्यासिका, समाजमंदिर व तत्सम इमारत ज्या
वॉर्डात किंवा प्रभागात असेल अशा वॉर्डातील / प्रभागातील सामाजिक काम करणा-या नोंदणीकृत संस्थेंकडून अर्ज स्विकारून अशा संस्थांना व्यवस्थापन व देखभालीसाठी स्थायी समितीमार्फत मुख्य सभेच्या मान्यतेने देण्यात येतात. मात्र याबाबत अजून स्पष्टता येणे गरजेचे आहे. त्यामुळे याच्या नियमावलीत बदल करण्यात आला आहे. शिवाय याआधी काढलेले परिपत्रक देखील रद्द करण्यात आले आहे.
पुणे महानगरपालिका मिळकत वाटप नियमावली सन २००८ अन्वये ज्या मिळकतींचा वापर पूर्णतः अव्यावसायिक व समाजोपयोगी कारणांसाठी होणार असेल अशा प्रकारच्या ‘एकूण बांधिव क्षेत्र १५०० चौ. फुटापर्यंत’ असलेल्या मिळकतीचा विनियोग त्या क्षेत्रात (प्रभागातील / वॉर्डातील) काम करणाऱ्या सामाजिक संस्थांकडून जाहीर निविदेद्वारे (जाहीर प्रकटन) त्यापैकी सामाजिक योगदान पुर्वानुभव, कार्यक्षमता व जास्तीत जास्त मोबदला देणारी संस्था इ. निकषांवर सर्वात योग्य ठरणाऱ्या संस्थेस महानगरपालिका ठरावातील त्या अटी व शर्तीनुसार देणेचे अधिकार महापालिका आयुक्त यांना देण्यात आलेले आहेत.
त्या अनुषंगाने अशा प्रकारच्या मिळकतींचा विनियोग करण्याची प्रक्रिया संबंधित क्षेत्रिय कार्यालामार्फत करणेकरीता अनुसरावयाची कार्यपध्दती मिळकत वाटप नियमावली सन २००८ अन्वये नमूद करण्यात आली आहे.
तरी, याआधी काढलेले कार्यालयीन परीपत्रक यांमध्ये संन्निग्धता निर्माण होत असून खालीलप्रमाणे याबाबतीत सुस्पष्टता आणण्यात येत आहे.
१. संयुक्त प्रकल्प राबविणेकामी संदर्भ क्र. २ अन्वयेचे सर्व क्षेत्रिय अधिकारी यांना कळविण्यात आलेले पत्रक रद्द करण्यात येत आहे.
२. मिळकत वाटप नियमावली सन २००८ अन्वये भाग (१०) (२३) मधील (१) नुसार वरीलप्रमाणे नमूद १५०० चौ. फुटापर्यंत’ बांधकाम केलेल्या व्यायामशाळा, अभ्यासिका, समाजमंदिर व तत्सम इमारत ज्या वॉर्डात किंवा प्रभागात असेल अशा वॉर्डातील / प्रभागातील सामाजिक काम करणा-या नोंदणीकृत संस्थेंकडून अर्ज स्विकारून अशा संस्थांना व्यवस्थापन व देखभालीसाठी मा. स्थायी समितीमार्फत मुख्य सभेच्या मान्यतेने देता येतील. असे नमूद असून त्यापैकी १५०० चौ. फुटापर्यंत’ बांधकाम केलेल्या
मिळकती म्हणजेच इमारतीचे एकूण बांधिव क्षेत्रफळ १५००चौ. फुटापर्यंत ग्राह्य धरण्यात याव्यात.
३. एकाच इमारतीचे एकूण बांधिव क्षेत्रफळ १५०० चौ. फुटापेक्षा जास्त असेल वा त्याचे टप्प्या-टप्प्याने बांधकाम प्रस्तावित असेल तरी ते एकच युनिट/मिळकत धरून त्याचा विनियोग करण्यात यावा. (म्हणजेच एकाच इमारतीत १५०० चौ. फुटाचे स्वतंत्र युनिट/मिळकत वा स्वतंत्र मजला गृहित धरून क्षेत्रिय कार्यालयाच्या स्तरावर त्याचा विनियोग करण्यात येऊ नये.)

Leave a Reply