Chhatrapati Sambhaji Maharaj National Award | मनीषा पाटील यांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र
Spread the love

Chhatrapati Sambhaji Maharaj National Award | मनीषा पाटील यांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार

Chhatrapati Sambhaji Maharaj National Award | मनीषा पाटील (Manisha Patil) यांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अमित गडांकुश  (वस्ताद) यांनी दिली.  नुकत्याच झालेल्या छावा प्रतिष्ठान नवी मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार याचे आयोजन वाशी नवी मुंबई येथे मराठी साहित्य मंदिर हॉल या ठिकाणी करण्यात आला होता. या कार्यक्रमात 23 जिल्ह्यातील ज्यांनी ज्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. (Chhatrapati Sambhaji Maharaj National Award)
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे संदीपजी नाईक आमदार, वैभवजी नाईक युवा नेते, सुभेदार कुणाल मालुसरे , नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज, मुरलीकांत पेटकर पद्मश्री पुरस्कार, यश मिश्रा आय जी आय पी एस, विजय व्ही राऊत ए पी आय, किम याँग हो ग्रँड मास्टर साऊथ कोरिया, संभाजी माने प्रसिद्ध अभिनेते, बलराज माने प्रसिद्ध अभिनेते यांच्या प्रमुख उपस्थितीत मनीषा पाटील यांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अमित गडांकुश  (वस्ताद) यांनी दिली आमदार संदीपजी नाईक यांनी मनीषा पाटील यांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.
मनीषा पाटील यांचे क्रीडा क्षेत्रातील कार्य म्हणजे सॅम्बो रशियन गेम कजाकिस्तान 2023 स्पर्धेसाठी सीनियर गटामध्ये मनीषा पाटील यांची निवड झाली होती. तसेच त्यांच्या शाळेतील 17 मुलींची देखील त्या स्पर्धेकरिता निवड झाली होती सॅम्बो राज्यस्तरीय स्पर्धेत करिता 2 वेळा टीम कोच म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. आंतर विद्यापीठाच्या बास्केटबॉल राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये दोन वेळा कर्णधार पद देखील सांभाळलेले आहे. 200 मीटर रनिंग आणि 100 मीटर हर्डल्स शालेय  राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये त्यांनी सिल्वर व ब्रांच मेडल्स पटकावले आहे 2023 मध्ये जम्मू काश्मीर येथे झालेल्या नॅशनल सॅम्बो स्पर्धेत नॅशनल रेफ्री म्हणून देखील काम पाहिलेले आहे. ते सध्या न्यू पुणे पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज निगडी पुणे या ठिकाणी क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आकुर्डी चिंचवड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश खंदारे सेक्रेटरी प्रदीप खंदारे मुख्याध्यापिका सुहास तोहगावकर मॅडम यांनी मनीषा पाटील यांचा स्कूलमध्ये भव्य अशा स्वरूपात सत्कार करत त्यांना पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. त्यांना आतापर्यंत क्रीडा रत्न क्रीडा महर्षी उत्कृष्ट क्रीडा शिक्षिका असे अनेक नामवंत पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांना हा नावाजलेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील प्रत्येक स्तरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.