CM Uddhav Thackeray | आपल्या राजीनाम्याबाबत CM उद्धव ठाकरे म्हणाले…

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र
Spread the love

आपल्या राजीनाम्याबाबत CM उद्धव ठाकरे म्हणाले…

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार दोन्ही आडचणीत सापडले आहे. दरम्यान शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे यांच्या गोटात सामिल झाले आहेत. यादरम्यान शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
 मी कुणाला भेटत नाही हे म्हणणं बरोबर आहे. माझं काम आता अव्याहतपणे सुरु आहे. शिवसेना कदापी हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. शिवसेना प्रमुख सांगायचे की, शिवसेनेपासून हिंदुत्वापासून दूर जाणार नाही. हिंदुत्वाबद्दल बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. 2014 साली जी शिवसेना लढली त्यातून 63 आमदार निवडुन आली ती बाळासाहेबांची शिवसेना होती. शिवसेना कुणाची, बाळासाहेबांची शिवसेना नाही का, हा प्रश्न महत्वाचा नाही.या पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवलं आहे, मला समोर येऊन सांगा त्याक्षणी मी मुख्यमंत्री पद सोडतो, तसेच तर आज संध्याकाळपासून माझा मुक्काम वर्षावरुन ‘मातोश्री’वर घेऊन जातो असे देखील ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. बंडखोर आमदारांनी समोरा समोर यावं, मी या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, अशी भावनिक साद मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी घातली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्याच लोकांना मुख्यमंत्री नकोय तर काय करायचं, गुजरातला जाऊन बोलायची काय गरज होती. मी त्यांना आपलं मानतो ते मानतात का नाही ते मला माहित नाही असेही ते म्हणाले. शिवसेना बाळासाहेबांच्या विचारापासून दूर चालली आहे असे काहीजण म्हणत आहेत, मी काय वेगळं केलं. प्रतिकूल परिस्थितीत ६३ आमदार निवडून आले, ती शिवसेना देखील बाळासाहेबांच्या नंतरची आहे हे लक्षात ठेवा असेही त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री पद स्वीकारले. मी शस्त्रक्रियेमुळे, आजारी असताना सर्वांशी संवाद ठेवणं शक्य नव्हते असे देखील त्यांनी यावेळी मान्य केलं.

| संजय राऊत यांचे ट्विट 

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे, या बंडामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे, यादरम्यान शिवसेना प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी होय संघर्ष करणार!! असे ट्वीट केले आहे.