PMC election 2022 | हरकती सूचनांसाठी अतिरिक्त कर्मचारी!  | उद्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

हरकती सूचनांसाठी अतिरिक्त कर्मचारी!

: उद्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार

पुणे : पुणे महानगरपालिकेचा (PMC) निवडणूक विभाग आगामी  निवडणुकांसाठी मतदार यादी अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि त्याबाबत सूचना आणि हरकती मागवणार आहे. उद्या म्हणजेच 23 जून ला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यामुळे  मतदार 23 जून ते 1 जुलै या कालावधीत आपल्या संबंधित समस्यांचे निराकरण करू शकतात. यासाठी महापालिका प्रशासनाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी आदेश काढले आहेत.

: काय आहेत आदेश?

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रस्तावित असून राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या आदेशानुसार मतदार यादी तयार करण्याचे कामकाज सुरु करण्यात आलेले आहे. पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयामार्फत प्राप्त झालेल्या कंट्रोल चार्ट नुसार दिनांक २३/०६/२०२२ रोजी प्रारूप मतदार यादी निवडणूक विभाग, पुणे महानगरपलिके मार्फत प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर दिनांक २३/०६/२०२२ ते ०१/०७/२०२२ रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत हरकती व सूचना स्विकारून त्याची विहित मुदतीत पूर्तता करावयाची आहे.
प्रारूप मतदार यादीवर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा हरकतदार व क्षेत्रिय कार्यालयाकडील नोडल अधिकारी (कनिष्ठ अभियंता) यांचेसमवेत पडताळणी करून हरकतींचा निपटारा करणे, हरकती / सूचनांवर संबंधित क्षेत्रिय कार्यालयाकडील महापालिका सहाय्यक आयुक्त यांचे समवेत निर्णय घेणे व अंतिम मतदार यादी तयार करणेकामी अंतिम कंट्रोल चार्ट तयार करणेसाठी खालील प्रमाणे उप अभियंता /शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता यांची नियुक्ती करणेत येत आहे. सदर कामकाज यशवंत माने, उप आयुक्त, निवडणूक विभाग व    संदीप कदम, पदनिर्देशित अधिकारी
(मतदार यादी) तथा उप आयुक्त परिमंडळ क्र.०४ पुणे मनपा यांचे नियंत्रणाखाली विहित मुदतीत व बिनचूकपणे पार पाडावयाचे आहे.