PMPML Passes | पुणे मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांकरिता पीएमपीएमएल कडून  अनुदानित पासेसचे वितरण सुरु 

Categories
Breaking News Education PMC social पुणे
Spread the love

पुणे मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांकरिता पीएमपीएमएल कडून  अनुदानित पासेसचे वितरण सुरु

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक व खाजगी शाळेतील इ. ५ वी ते १० वी तसेच पुणे मनपा शाळेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक इ. ५ वी ते १२ वी चे विद्यार्थ्यांकरिता पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सन २०२२–२०२३ करिता अनुदानित पासेसचे वितरण सुरु करण्यात आले आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सन २०२२–२०२३ या शैक्षणिक वर्षाकरिता पुणे मनपा शाळेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक इ. ५ वी ते १२ वी चे विद्यार्थ्यांना व मनपा हद्दीतील मान्यता प्राप्त खाजगी शाळेतील इ. ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना पुणे मनपा अनुदानित बसपास वितरणाची योजना सुरू करण्यात येत असून पासेससाठी दि. १०/०६/२०२२ पासून अर्जाचे वाटप सुरु करण्यात येत आहे. भरून दिलेल्या अर्जाची स्वीकृती महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येईल. तसेच महामंडळाच्या सर्व पास केंद्रांवरून सुद्धा फक्त अर्जाचे वाटप करण्यात येईल.

महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये शैक्षणिक संस्था व त्यांचे प्रतिनिधी यांनी शाळेकडील विद्यार्थ्यांचे एकत्रित अर्ज आणल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते शाळा प्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पासकेंद्रावर येण्याची गरज भासणार नाही.

खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची तपासणी झाल्यावर पासची २५% रक्कम चलनान्वये पुणे मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र चे कोणत्याही शाखेमध्ये भरणा केले नंतर अर्ज, चलन व कागदपत्रे जवळच्या आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल. तसेच सदरच्या पासेसची वितरण व्यवस्था दि. १०/०६/२०२२ पासून महामंडळाच्या सर्व आगारांमधून सुरु झालेली आहे.

प्रस्तुत योजनेसंबधी सविस्तर माहिती महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये उपलब्ध आहे. पुणे मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

​अधिक महितीसाठी संपर्क क्र. ०२०-२४५४५४५४

Leave a Reply