PMPML | Discounted annual pass | पीएमपीएमएल कडून विद्यार्थ्यांसाठी सवलतीचा वार्षिक पास आता सर्व पास केंद्रांवर उपलब्ध

Categories
Breaking News Education social पुणे

पीएमपीएमएल कडून विद्यार्थ्यांसाठी सवलतीचा वार्षिक पास आता सर्व पास केंद्रांवर उपलब्ध

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी सवलतीचे पास दि. ०७/०७/२०२२ पासून महामंडळाकडून नव्याने वार्षिक पास रूपये ५,०००/-, सहामाही पास रूपये ३,०००/- व त्रैमासिक पास रूपये २,०००/- असे पास सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये सहामाही पास रूपये ३,०००/- व त्रैमासिक पास रूपये २,०००/- यांची विक्री महामंडळाच्या पास केंद्रावर सुरू करण्यात आली आहे. फक्त वार्षिक पास रूपये ५,०००/- याची विक्री पुणे महानगर परिवहन महामंडळ, स्वारगेट, पुणे
येथील पास विभागातून करण्यात येत होती. परंतु विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व सदरचे पासेसचा जास्तीत जास्त खप होण्यासाठी दि. २३/०८/२०२२ पासून परिवहन महामंडळाकडून सर्व पास केंद्रांवर रूपये ५,०००/- किंमतीचे वार्षिक पास विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. तरी त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेवून परिवहन महामंडळास सहकार्य करावे. असे आवाहन पीएमपीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी संपर्क क्र.: ०२०-२४५४५४५४

PMPML Bus Passes | पीएमपी कडून विद्यार्थ्यांसाठी वार्षिक, सहामाही व त्रैमासिक पासची सुविधा

Categories
Breaking News social पुणे

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांकरिता वार्षिक, सहामाही व त्रैमासिक पासची सुविधा

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांकरिता सध्या रुपये ७५०/- चा मासिक पास वितरित करण्यात येत आहे. यामध्ये पासेसचा विद्यार्थांनी शैक्षणिक धोरणाकरिता जास्तीत जास्त लाभ घेण्याच्या दृष्टीने ७ जुलै पासून महामंडळाकडून नव्याने वार्षिक पास रुपये ५,०००/-, सहामाही पास रुपये ३,०००/- व त्रैमासिक पास रुपये २,०००/- पासेस वितरित सुरू करण्यात येत आहे.

यापूर्वी रुपये ७५०/- च्या पास वितरणाची जी कार्यपद्धती अवलंबण्यात येत आहे तीच कार्यपद्धती नव्याने सुरू करण्यात येणार्‍या पासेस करता कार्यान्वित राहील. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
नव्याने सुरू करण्यात आलेल्या पासबाबतची संपूर्ण माहिती परिवहन महामंडळाच्या पास केंद्रांवर मिळेल.
वरील प्रमाणे नव्याने सुरू करण्यात आलेले सवलतीचे विद्यार्थी वार्षिक पास रुपये ५०००/- हा परिवहन महामंडळाच्या स्वारगेट बी.आर.टी. बिल्डिंग मुख्यालय क्र.१ च्या शेजारील पास विभाग येथे मिळेल. सहामाही पास रुपये
३,०००/- व त्रैमासिक पास रुपये २,०००/- हे दिनांक ०७/०७/२०२२ पासून परिवहन महामंडळाच्या सर्व पास केंद्रावरून वितरित करण्यात येतील. तरी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

PMPML Passes | पुणे मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांकरिता पीएमपीएमएल कडून  अनुदानित पासेसचे वितरण सुरु 

Categories
Breaking News Education PMC social पुणे

पुणे मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांकरिता पीएमपीएमएल कडून  अनुदानित पासेसचे वितरण सुरु

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक व खाजगी शाळेतील इ. ५ वी ते १० वी तसेच पुणे मनपा शाळेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक इ. ५ वी ते १२ वी चे विद्यार्थ्यांकरिता पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सन २०२२–२०२३ करिता अनुदानित पासेसचे वितरण सुरु करण्यात आले आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सन २०२२–२०२३ या शैक्षणिक वर्षाकरिता पुणे मनपा शाळेतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक इ. ५ वी ते १२ वी चे विद्यार्थ्यांना व मनपा हद्दीतील मान्यता प्राप्त खाजगी शाळेतील इ. ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना पुणे मनपा अनुदानित बसपास वितरणाची योजना सुरू करण्यात येत असून पासेससाठी दि. १०/०६/२०२२ पासून अर्जाचे वाटप सुरु करण्यात येत आहे. भरून दिलेल्या अर्जाची स्वीकृती महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येईल. तसेच महामंडळाच्या सर्व पास केंद्रांवरून सुद्धा फक्त अर्जाचे वाटप करण्यात येईल.

महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये शैक्षणिक संस्था व त्यांचे प्रतिनिधी यांनी शाळेकडील विद्यार्थ्यांचे एकत्रित अर्ज आणल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते शाळा प्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पासकेंद्रावर येण्याची गरज भासणार नाही.

खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची तपासणी झाल्यावर पासची २५% रक्कम चलनान्वये पुणे मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र चे कोणत्याही शाखेमध्ये भरणा केले नंतर अर्ज, चलन व कागदपत्रे जवळच्या आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल. तसेच सदरच्या पासेसची वितरण व्यवस्था दि. १०/०६/२०२२ पासून महामंडळाच्या सर्व आगारांमधून सुरु झालेली आहे.

प्रस्तुत योजनेसंबधी सविस्तर माहिती महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये उपलब्ध आहे. पुणे मनपा हद्दीतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

​अधिक महितीसाठी संपर्क क्र. ०२०-२४५४५४५४