PMP’s e-bus depot | पीएमपीच्या ई-बस डेपोचे शुक्रवारी उद्‌घाटन | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

Categories
Breaking News social पुणे

पीएमपीच्या ई-बस डेपोचे शुक्रवारी उद्‌घाटन | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

‘पीएमपीएमएल’च्या पुणे स्टेशन ई-बस डेपोचा उद्‌घाटन समारंभ व ९० ई-बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २) पुणे स्टेशन स्थानकावर होणार आहे. या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहतील.

केंद्र शासनाच्या फेम-२ योजनअंतर्गत प्राप्त होणाऱ्या १५० ई-बसेससाठी प्रति बस ५५ लाख रूपये प्रमाणे अनुदान केंद्र सरकारने दिले आहे. बीआरटी लेन मधून धावणाऱ्या या ई-बसचे महत्वपूर्ण वैशिष्ट्ये म्हणजे त्या १२ मीटर लांब असून ३३ आसन क्षमतेच्या आहेत. संपूर्ण वातानुकुलित, दिव्यांगांसाठी खास सुविधा, आयटीएमएस, मोबाईल चार्जिंग या सुविधाही बसमध्ये आहेत. पुणे स्टेशन ई-बस डेपोतून बसेस हिंजवडी माण फेज ३, गोखलेनगर, आळंदी, विश्रांतवाडी, लोहगाव, मांजरी बु., रांजणगाव/कारेगाव, खराडी, विमाननगर, कोंढवा खुर्द, साळुंके विहार, चिंचवड गाव, शेवाळेवाडी या मार्गांवर धावणार आहेत.

PMPML | Discounted annual pass | पीएमपीएमएल कडून विद्यार्थ्यांसाठी सवलतीचा वार्षिक पास आता सर्व पास केंद्रांवर उपलब्ध

Categories
Breaking News Education social पुणे

पीएमपीएमएल कडून विद्यार्थ्यांसाठी सवलतीचा वार्षिक पास आता सर्व पास केंद्रांवर उपलब्ध

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांसाठी सवलतीचे पास दि. ०७/०७/२०२२ पासून महामंडळाकडून नव्याने वार्षिक पास रूपये ५,०००/-, सहामाही पास रूपये ३,०००/- व त्रैमासिक पास रूपये २,०००/- असे पास सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये सहामाही पास रूपये ३,०००/- व त्रैमासिक पास रूपये २,०००/- यांची विक्री महामंडळाच्या पास केंद्रावर सुरू करण्यात आली आहे. फक्त वार्षिक पास रूपये ५,०००/- याची विक्री पुणे महानगर परिवहन महामंडळ, स्वारगेट, पुणे
येथील पास विभागातून करण्यात येत होती. परंतु विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व सदरचे पासेसचा जास्तीत जास्त खप होण्यासाठी दि. २३/०८/२०२२ पासून परिवहन महामंडळाकडून सर्व पास केंद्रांवर रूपये ५,०००/- किंमतीचे वार्षिक पास विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. तरी त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेवून परिवहन महामंडळास सहकार्य करावे. असे आवाहन पीएमपीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी संपर्क क्र.: ०२०-२४५४५४५४

PMPML : Prakash Dhore : पीएमपी प्रशासनाच्या कारभारा विरोधात दस्तरखुद्द पीएमपी संचालक करणार आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे

पीएमपी प्रशासनाच्या कारभारा विरोधात दस्तरखुद्द पीएमपी संचालक करणार आंदोलन

: प्रशासनाबाबत नाराजी

पुणे : पीएमपी प्रशासनाच्या कारभाराबाबत नेहमीच ओरड होत असते. याबाबत विरोधी पक्षाकडून देखील सातत्याने आवाज उठवला जातो. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते. मात्र आता सत्ताधारी पक्षाचे नेते आणि पीएमपी चे संचालक देखील या कामकाजाला कंटाळले आहेत. त्यामुळे संचालक प्रकाश ढोरे यांनी प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक ढोरे उद्या सकाळी 11 वाजल्यापासून आंदोलनाला बसणार आहेत. याबाबत त्यांनी CMD ना पत्र देखील दिले आहे.

: PMP CMD ना दिले पत्र

ढोरे यांच्या पत्रानुसार पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.च्या संचालक मंडळाची  सभा क्र.३, दिनांक 30/08/२०२२ रोजी संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये आम्ही संचालकांनी आयत्यावेळचे ठरावदाखल केले होते. त्यावेळेस प्रशासनाने आम्हाला सदर ठरावाबाबत सभेच्या तारेखपासून ७ दिवसाच्या आत प्रशासनाचा अभिप्राय देणेबाबत सांगितले होते. याबाबत आमच्याकडून सभा वृत्तांत अंतिम झाल्यानंतर ही विचारणा करण्यात आली होती. तथापि प्रशासन विभागाने अद्यापपावेतो आम्हाला अभिप्राय कळविलेला नाही. तरी याबाबत परिवहन महामंडळाच्या प्रशासनाचा भोंगळ कारभार चाललेला असून तसेच चालढकल करण्यात आलेली असून संचालकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत आम्ही प्रशासनाच्या कारभाविरूध्द व भोंगळ कारभाराबाबत निषेधार्थ म्हणून दिनांक 09/०२/२०२२ रोजी सकाळी ११.00 वाजल्यापासून आंदोलनास बसत आहे. याबाबतची संपूर्ण जबाबदारी आपणावर राहील. असे ढोरे यांनी पत्रात म्हटले आहे.

PMP : E cabs : पीएमपी देणार आता ई-कॅब सेवा :

Categories
Breaking News पुणे

पीएमपी देणार आता ई-कॅब सेवा

: महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रशासनाचा प्रस्ताव

पुणे : पुणे हे विद्यचे माहेर घर असून पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व लगतच्या उपनगरात औद्योगिकरणात वाढ होऊन विविध भागात आय.टी.पार्क, आय.टी.हब नव्यानेस्थापन होणाऱ्या कंपन्यातील महिला कर्मचाऱ्यांना अहोरात्रौ बससेवा देता येत नाही. शहरात मागील काही काळामध्ये नोकरीस जाणाऱ्या महिलावर अत्याचाराचे घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या महिलांच्या मनामध्ये असुरक्षित असल्याची भिती निर्माण झालेली आहे. कोणत्याही खाजगी वाहनांचा विश्वासार्हता नसल्याचे महिलांना दिसुन आले आहे. त्यामुळे महिला सक्षम व निर्भीड होणेकामी शासकीय विश्वासार्हता असलेले वाहन असणे गरजेचे आहे. या बाबी लक्षात घेऊन प्रदुषण विरहित व शहरातील नागरिकांच्या सोयीकरीता ई-कॅबने सुविधा देणेबाबत परिवहन महामंडळ इच्छुक आहे. प्रशासनाने तसा एक प्रस्ताव संचालक मंडळासमोर ठेवला आहे. 100 ई कॅब घेण्याचा मानस प्रशासनाचा असून त्यांचे दर देखील कमी असणार आहेत. यासाठी 13.5 कोटी खर्च अपेक्षित आहे. असे प्रस्तावात म्हटले आहे.

अपेक्षित जागेवर थेट सेवा देता येत नाही

प्रशासनाच्या प्रस्तावानुसार परिवहन महामंडळाने पर्यावरणास अनुकूल असलेल्या प्रदुषण विरहित सीएनजी बसेस व इस वातानुकूलित बसेस संचलनात आणलेल्या असून डिझोल बसेस बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. परिवहन महामंडळाचे सद्या सुरू असलेल्या संचलनाचे सुलभ  सेवा देत असतांना प्रवाशांना इच्छित स्थळीपासुन (घर, ऑफिस, मॉल इ.) अपेक्षित जागेवर कमी वेळेत, थेट सेवा देता येत नसल्याने रस्त्यावर दुचाकी व चारचाकी खाजगी वाहनाचे सतत वाढ होऊन खाजगी वाहनांची गदी होत आहे. रस्त्यावर पार्कीग सुविधेचा अभाव असल्याने इतरत्र खाजगी वाहने पार्कीगमुळे प्रवाशास जादा वेळ खर्ची लागतो. तसेच पुणे हे विद्यचे माहेर घर असून पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व लगतच्या उपनगरात औद्योगिकरणात वाढ होऊन विविध भागात आय.टी.पार्क, आय.टी.हब नव्याने स्थापन होणाऱ्या कंपन्यातील महिला कर्मचाऱ्यांना अहोरात्रौ बससेवा देता येत नाही. शहरात मागील काही काळामध्ये नोकरीस जाणाऱ्या महिलावर अत्याचाराचे घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या महिलांच्या मनामध्ये असुरक्षित असल्याची भिती निर्माण झालेली आहे. कोणत्याही खाजगी वाहनांचा विश्वासहर्ता नसल्याचे महिलांना दिसुन आले आहे. त्यामुळे महिला सक्षम व निर्भड होणेकामी शासकीय विश्वासहर्ता असलेले वाहन असणे गरजेचे आहे. उपरोक्त बाबी लक्षात घेऊन प्रदुषण विरहित व शहरातील नागरिकांच्या सोयीकरीता ई-कॅबने सुविधा देणेबाबत परिवहन महामंडळ इच्छुक व विचारधीन आहे.

 ई-कॅब सुरू केल्यास शहरातील नागरिकांना / प्रवाशांना खालील प्रमाणे उपाय, सुविधा उपलब्ध होतील.

१) परिवहन महामंडळाच्या बस संचलनाच्या कार्यक्षेत्रात समर्पित अहोरात्रौ (२४ तास) ई-कॅब सेवा देता येईल.
२) शहरातील महिलांकरीता एक विशिष्ट पिंक कलरचे महिला ई-कॅब व त्यावर महिला चालक देण्यात येईल.
३) परिवहन महामंडळाची ई-कॅब सेवा ही शासकीय असल्याने विश्वास व आश्वासन सेवा पुरविता येईल.
४) शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल.
५) सदरच्या ई-कॅब मधील प्रवाशांच्या आसनाजवळ एक ठराविक विशिष्ट प्रकारचे बटन महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने अटोमेटीक इन्फॉरमेशन सिस्टिम (एआयएस-१४०) चे बटन देण्यात येईल.
६) शहरातील ज्येष्ठ नागरिक व अपंग प्रवाशांना त्यांच्या भाडे आकारणीमध्ये सवलत देण्यात
येईल.
७) शहरातील मॉल, मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, व्यापार संकुल या ठिकाणी ई-कॅब सेवा
उपलब्ध होईल.
८) सदरील ई-कॅब सेवा प्रादेशिक सर्व्हिसनुसार पूर्ण दिवस सेवा देण्यात येईल.
९) शहरातील कार्यान्वित होणारे मेट्रो त्यांचे स्थानकांची सलंग्न सेवा देता येईल.
१०) पुणे व पिंपरी-चिंचवड दर्शन सेवेकरीता व्यैयक्तिक ई-कॅबचा वापर करणे शक्य होईल तसेच
राष्ट्रीय सुट्टी व समारंभ कार्यक्रमास ई-कॅब सेवा देणे शक्य होईल.
११) सदरील ई-कॅब सेवा कार्यान्वित झाल्यास प्रवाशांकरीता कॅशलेस सुविधा, क्युआर कोड मोबाईल ॲप, डायरेक्ट प्लॅन बुकींग अॅप स्मार्ट कार्ड, दैनिक पास मोबाईल कायमस्वरूपी डिजीटल वायलेट ई-पेमेंट अद्यायगी करण्याची सुविधा उपलब्ध करता येईल.
१२) याबाबतची सर्वस्वी नियंत्रण, कमांड सेंटर यांचेकडे राहील.
१३) महिला प्रवाशांचा सुरक्षित व खात्रीशीर प्रवास होईल.
१४) सदरील ई-कॅबवर डिजीटल जाहिराती केल्यास महामंडळास उत्पन्न प्राप्त होईल.
१७) सदरील ई-कॅब चार्जिंग करणेकामी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील ९ आगारामध्ये चार्जिंग हब उपलब्ध करता येईल.तसेच सदरच्या चार्जिंग हबचा वापर खाजगी वाहनांना वापरण्यास मुभा देऊन महामंडळास आर्थिक उत्पन्न प्राप्त होईल.
सदरच्या ई-कॅब सेवेमुळे परिवहन महामंडळाची सेवा विस्तारीत स्वरूपाची होऊन नावलौकीकात भर पडेल. रस्त्यावरील खाजगी वाहनांची गर्दी कमी होईल व पर्यायाने वातावरण शुध्द होऊन नागरिकांना स्वच्छ हवा प्राप्त होईल. तसेच पेट्रोल डिझेल या इंधनावर अवलंबुन राहता येणार नाही.

: कमी दर राहणार

सेवेचा तुलनात्मक विचार केला असता जीसीसी मॉडेल इकॉनॉमिक्सपेक्षा परिवहन महामंडळाच्या स्वःमालकीच्या ई-कॅब सेवा सुलभ व माफक दरात पुरविली जाऊन त्यामधुन महामंडळास आर्थिक नफाही प्राप्त होणार आहे. त्यामुळे परिवहन महामंडळामार्फत ई-कॅब सेवा सुरू केल्यास प्रवाशांना विश्वासहर्ता सेवा, महिला सुरक्षितता, इतर खाजगी ई-कॅब सेवेपेक्षा माफक दरात, प्रदुषणविरहित ई-कॅब सेवा, ज्येष्ठ, अपंग नागरिकांना सवलतीत सेवा ही सुलभ आरामदायी व कमी. वेळेत देता येणार आहे. या बाबी विचारात घेता पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत स्वःमालकीच्या एकुण १०० ई-कॅब घेण्यास व सेवा सुरू करण्यास संचालक मंडळाची मान्यता मिळणेविषयी विनंती आहे. असे प्रस्तावात म्हटले आहे.

: मुख्य आर्थिक मापदंड

• मॉडल: ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रक्ट (जीसीसी) मॉडेल/ केपेक्स (मालकीचे) मॉडेल
• वाहनांची संख्या: १०० (शंभर)
• प्रकल्पासाठी एकूण केपेक्स खर्च :रुपये१३.5 कोटी (COM सबसिडी वजा केल्यानंतर)
• प्रति ईव्ही चालवण्याची दैनिक खात्री: १५० कि.मी.
• प्रति किलो मीटर शुल्क आवश्यक आहे: ०.२ युनिट्स
० खर्च प्रति युनिट कि.मी. (२०२१): INR १.८
• प्रत्येक ईव्हीवर चालकांची संख्या: कारमध्ये दोन शिफ्टमध्ये ०२ ड्रायव्हर्स
ड्रायव्हरचे मासिक वेतन रूपये:  १८,०००/-

PMP : jyotsna ekbote : निगडी ते लोणावळा बस सेवेचा शुभारंभ

Categories
Uncategorized

निगडी ते लोणावळा बस सेवेचा शुभारंभ

:नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांच्या प्रयत्नांना यश

पुणे : लोणावळा व पुणे शहराला जोडणारी बस सेवा सुरु . त्यामुळे लोणावळा ,मळवली ,कार्ले-भाजे लेणी याठिकाणच्या अनेक चाकरमानी,  व्यापारी, विद्यार्थीवर्ग, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्मचारीवर्ग हा पिंपरी चिंचवड शहर , पुणे शहराशी वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून या दोन्ही शहरांशी जोडला गेलेला आहे. या प्रवाश्यांच्या सोईसाठी पुणे स्टेशन ते लोणावळा तसेच निगडी ते लोणावळा बससेवा सुरु करावी अशी मागणी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली होती.  या मागणीला तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत  निगडी ते कामशेत ही पी.एम.पी.एम.एलची बससेवा मार्ग पुढे लोणावळा शहराशी जोडण्याचा निर्णय घेतला.

सेवा उपलब्ध झाल्याचे समाधान : एकबोटे

यातील अनेक नागरिकांना आपल्या उपजीविकेसाठी पुणे शहरापर्यंत रोज दुचाकी अथवा चारचाकी वाहनांद्वारे यावे लागत आहे . या वाहनांद्वारे दैनंदिन प्रवास केल्यामुळे अनेक नागरिक , कर्मचारी वर्गाला आरोग्य समस्येला तोंड द्यावे लागत होते.  आज निगडी ते लोणावळा बस सेवा सुरु झाल्यामुळे या भागातील नागरिक , विद्यार्थी, व्यापारी वर्ग यांना आज दिलासा मिळाला आहे. तसेच जे अनेक नागरिक दैनंदिन कामानिमित्त दोन्ही शहरात वाहनांनी येत असतात त्यांना पी.एम.पी.एम.एलची वाहतूक सेवा उपलब्ध झाल्याचे समाधान नगरसेविका प्रा.सौ.ज्योत्स्ना एकबोटे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
निगडी ते लोणावळा बस सेवेचा शुभारंभ आज पिंपरी चिंचवड च्या महापौर उषा उर्फ माई ढोरे,उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले , नगरसेविका मा प्रा.सौ.ज्योत्स्ना एकबोटे उपाध्यक्ष – नाव समिती पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवडचे स्थानिक नगरसेविका सुमन पवळे ,नगरसेवक सचिन चिखले, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे , निगडी आगाराचे प्रमुख  शांताराम वाघेरे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाला . महापौर उषा ढोरे यांच्या निगडी ते लोणावळा या बससेवेचे वाहन चालक ,वाहक यांचा सत्कार करण्यात आला.

 

PMPML : Bonus : पीएमपीच्या १० हजार कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी २४ कोटी  : स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी  

Categories
PMC पुणे

पीएमपीच्या १० हजार कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी २४ कोटी

: स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.  दिवाळी बोनस देण्यासाठी २४ कोटी रुपये आगाऊ देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, या निर्णयाचा पीएमपीएमएलच्या दहा हजार लाभ होणार आहे. आज या संदर्भातील प्रस्ताव सभासदाकडून स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्याला मान्यता देण्यात आली. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात बससेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र कोरोना काळात अत्यावश्यक सेवा आणि विलगीकरण केंद्रांवर पीएमपीएमएलच्या कर्मचार्यांनी उत्तम सेवा बजावली होती.

एमएनजीएलला अदा करण्यासाठी दहा कोटी रुपयांना मंजुरी

रासने पुढे म्हणाले, पीएमपीएमएलला सीएनजीचा पुरवठा करणार्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीला दहा कोटी रुपये अदा करण्यासाठीही आज स्थायी समितीने मान्यता दिली.’ हा प्रस्ताव देखील नगरसेवकांनी दिला होता.
____

PMPML : कंपनी सेक्रेटरींना PMP चा ‘मोह’ सुटेना! : कालावधी संपून तीन महिने उलटूनही पाय निघेना 

Categories
Breaking News पुणे

कंपनी सेक्रेटरींना PMP चा ‘मोह’ सुटेना!

कालावधी संपून तीन महिने उलटूनही पाय निघेना

पुणे: पीएमपीच्या दैनंदिन कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी कंपनी सेक्रेटरी अँड लॉ ऑफिसर या पदाची निर्मिती करत 2017 साली त्यावर कंपनी सेक्रेटरींची नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातीला तीन वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने हे पद भरण्यात आले. तीन वर्ष झाल्यानंतर मागील वर्षी वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली होती. जुलै अखेर ही मुदतवाढ संपली आहे. कालावधी उलटून गेला तरी कंपनी सेक्रेटरींना मात्र PMP चा मोह सुटताना दिसत नाही. तशी कुठली मुदतवाढ देखील प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. दरम्यान याबाबत काही संचालकांनी याविरुद्ध आवाज उठवत हे पदच बरखास्त करण्याची मागणी केली आहे. मात्र पीएमपी प्रशासनाकडून याबाबत कुठलीही हालचाल होताना दिसून येत नाही.

: 2017 ला करण्यात आली होती नियुक्ती

कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार महामंडळाचे कामकाज होण्यासाठी आणि कंपनी कायदा 2013 मधील तरतुदी विचारात घेता परिवहन महामंडळाच्या दैनंदिन कामकाजासाठी कंपनी सेक्रेटरी अँड लॉ ऑफिसर या पदाची आवश्यकता असल्याने पीएमपी प्रशासनाकडून नवीन आस्थापना आराखड्यामध्ये या पदाची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार 2017 साली करार पद्धतीने या पदावर नीता भरमकर यांची 3 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली होती. करारानुसार त्यांना विविध सुविधा देत दरवर्षी वेतनात देखील वाढ करण्यात आली. 2020 ला मुदत संपल्यानंतर तत्कालीन सीएमडी डॉ राजेंद्र जगताप यांनी कंपनी सेक्रेटरींना एक वर्षाची मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ 2021 च्या जुलै अखेर संपुष्टात आली आहे. त्यानंतर प्रशासनाने कुठलीही मुदतवाढ दिली नाही. विशेष म्हणजे पीएमपी प्रशासनाने सेक्रेटरींना गेल्या तीन महिन्याचे वेतन देखील दिलेले नाही. तरीही सेक्रेटरी मात्र तिथेच बसून आहेत. शिवाय धोरणात्मक निर्णय देखील घेत आहेत. याबाबत आलोचना होत असताना देखील पीएमपी प्रशासन मात्र ढिम्मच आहे.

: 5 लाखाचे भाग भांडवल असलेल्या पीएमपीला कंपनी सेक्रेटरी पदाची गरज काय? :  संचालक

दरम्यान संचालक मंडळाच्या बैठकीत याचा विरोध करण्यात आला होता. काही संचालकांनी आक्षेप घेत अशी विचारणा केली होती कि, कंपनी कायद्यानुसार 10 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त भाग भांडवल असल्यास अशा कंपनीस कंपनी सेक्रेटरी या पदाची पूर्ण वेळ नियुक्ती आवश्यक आहे. मात्र पीएमपीचे भाग भांडवल 5 लाख इतके असून कंपनी सेक्रेटरी पदाची गरज काय? संचालकांनी असा मुद्दा उपस्थित केला होता कि आस्थापना आराखडा 2013 प्रमाणे विधी अधिकारी किंवा वित्त व लेखा अधिकारी यांच्याकडे कंपनी सेक्रेटरी पदाचे अतिरिक्त कामकाज देण्यात यावे. त्यानुसार तरतूद करावी. त्यामुळे खात्या अंतर्गत जाहिरात देऊन हे पद भरावे, अशी मागणी संचालकांनी केली होती. मात्र प्रशासनाने या मागणीला केराची टोपली दाखवली. शिवाय महापालिकेच्या काही नगरसेवकांनी देखील पीएमपीकडे उक्त मागणी केली होती. मात्र त्याला ही प्रशासनाकडून कुठलेही उत्तर देण्यात आले नाही.
दरम्यान याबाबत आम्ही पीएमपी चे सीएमडी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा कुठलाही प्रतिसाद मिळू शकला नाही.
—-
कामगार न्यायालयाने 2017 च्या आस्थापना आराखड्यास स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे कंपनी सेक्रेटरी पद संपुष्टात आले आहे. त्यामुळे हे पद रद्द करण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र गेल्या वर्षभरापासून आमच्या पत्राला पीएमपी प्रशासनाकडून कुठलेही उत्तर देण्यात आले नाही. पुण्याचे  माजी महापौर आणि पीएमपीचे माजी संचालक यांना देखील उत्तरे न देणे ही गंभीर बाब आहे. शिवाय सेक्रेटरींनी मुदत संपलेली असताना पदावर राहणे हे देखील गंभीर आहे. त्यामुळे विधी किंवा लेखा व वित्त अधिकारी यांना कंपनी सेक्रेटरी पदाचे कामकाज देऊन महामंडळाची आर्थिक बचत करावी, अशी आमची मागणी आहे.

प्रशांत जगताप, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.