PMP : E cabs : पीएमपी देणार आता ई-कॅब सेवा :

Categories
Breaking News पुणे
Spread the love

पीएमपी देणार आता ई-कॅब सेवा

: महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रशासनाचा प्रस्ताव

पुणे : पुणे हे विद्यचे माहेर घर असून पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व लगतच्या उपनगरात औद्योगिकरणात वाढ होऊन विविध भागात आय.टी.पार्क, आय.टी.हब नव्यानेस्थापन होणाऱ्या कंपन्यातील महिला कर्मचाऱ्यांना अहोरात्रौ बससेवा देता येत नाही. शहरात मागील काही काळामध्ये नोकरीस जाणाऱ्या महिलावर अत्याचाराचे घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या महिलांच्या मनामध्ये असुरक्षित असल्याची भिती निर्माण झालेली आहे. कोणत्याही खाजगी वाहनांचा विश्वासार्हता नसल्याचे महिलांना दिसुन आले आहे. त्यामुळे महिला सक्षम व निर्भीड होणेकामी शासकीय विश्वासार्हता असलेले वाहन असणे गरजेचे आहे. या बाबी लक्षात घेऊन प्रदुषण विरहित व शहरातील नागरिकांच्या सोयीकरीता ई-कॅबने सुविधा देणेबाबत परिवहन महामंडळ इच्छुक आहे. प्रशासनाने तसा एक प्रस्ताव संचालक मंडळासमोर ठेवला आहे. 100 ई कॅब घेण्याचा मानस प्रशासनाचा असून त्यांचे दर देखील कमी असणार आहेत. यासाठी 13.5 कोटी खर्च अपेक्षित आहे. असे प्रस्तावात म्हटले आहे.

अपेक्षित जागेवर थेट सेवा देता येत नाही

प्रशासनाच्या प्रस्तावानुसार परिवहन महामंडळाने पर्यावरणास अनुकूल असलेल्या प्रदुषण विरहित सीएनजी बसेस व इस वातानुकूलित बसेस संचलनात आणलेल्या असून डिझोल बसेस बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. परिवहन महामंडळाचे सद्या सुरू असलेल्या संचलनाचे सुलभ  सेवा देत असतांना प्रवाशांना इच्छित स्थळीपासुन (घर, ऑफिस, मॉल इ.) अपेक्षित जागेवर कमी वेळेत, थेट सेवा देता येत नसल्याने रस्त्यावर दुचाकी व चारचाकी खाजगी वाहनाचे सतत वाढ होऊन खाजगी वाहनांची गदी होत आहे. रस्त्यावर पार्कीग सुविधेचा अभाव असल्याने इतरत्र खाजगी वाहने पार्कीगमुळे प्रवाशास जादा वेळ खर्ची लागतो. तसेच पुणे हे विद्यचे माहेर घर असून पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व लगतच्या उपनगरात औद्योगिकरणात वाढ होऊन विविध भागात आय.टी.पार्क, आय.टी.हब नव्याने स्थापन होणाऱ्या कंपन्यातील महिला कर्मचाऱ्यांना अहोरात्रौ बससेवा देता येत नाही. शहरात मागील काही काळामध्ये नोकरीस जाणाऱ्या महिलावर अत्याचाराचे घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या महिलांच्या मनामध्ये असुरक्षित असल्याची भिती निर्माण झालेली आहे. कोणत्याही खाजगी वाहनांचा विश्वासहर्ता नसल्याचे महिलांना दिसुन आले आहे. त्यामुळे महिला सक्षम व निर्भड होणेकामी शासकीय विश्वासहर्ता असलेले वाहन असणे गरजेचे आहे. उपरोक्त बाबी लक्षात घेऊन प्रदुषण विरहित व शहरातील नागरिकांच्या सोयीकरीता ई-कॅबने सुविधा देणेबाबत परिवहन महामंडळ इच्छुक व विचारधीन आहे.

 ई-कॅब सुरू केल्यास शहरातील नागरिकांना / प्रवाशांना खालील प्रमाणे उपाय, सुविधा उपलब्ध होतील.

१) परिवहन महामंडळाच्या बस संचलनाच्या कार्यक्षेत्रात समर्पित अहोरात्रौ (२४ तास) ई-कॅब सेवा देता येईल.
२) शहरातील महिलांकरीता एक विशिष्ट पिंक कलरचे महिला ई-कॅब व त्यावर महिला चालक देण्यात येईल.
३) परिवहन महामंडळाची ई-कॅब सेवा ही शासकीय असल्याने विश्वास व आश्वासन सेवा पुरविता येईल.
४) शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल.
५) सदरच्या ई-कॅब मधील प्रवाशांच्या आसनाजवळ एक ठराविक विशिष्ट प्रकारचे बटन महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने अटोमेटीक इन्फॉरमेशन सिस्टिम (एआयएस-१४०) चे बटन देण्यात येईल.
६) शहरातील ज्येष्ठ नागरिक व अपंग प्रवाशांना त्यांच्या भाडे आकारणीमध्ये सवलत देण्यात
येईल.
७) शहरातील मॉल, मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, व्यापार संकुल या ठिकाणी ई-कॅब सेवा
उपलब्ध होईल.
८) सदरील ई-कॅब सेवा प्रादेशिक सर्व्हिसनुसार पूर्ण दिवस सेवा देण्यात येईल.
९) शहरातील कार्यान्वित होणारे मेट्रो त्यांचे स्थानकांची सलंग्न सेवा देता येईल.
१०) पुणे व पिंपरी-चिंचवड दर्शन सेवेकरीता व्यैयक्तिक ई-कॅबचा वापर करणे शक्य होईल तसेच
राष्ट्रीय सुट्टी व समारंभ कार्यक्रमास ई-कॅब सेवा देणे शक्य होईल.
११) सदरील ई-कॅब सेवा कार्यान्वित झाल्यास प्रवाशांकरीता कॅशलेस सुविधा, क्युआर कोड मोबाईल ॲप, डायरेक्ट प्लॅन बुकींग अॅप स्मार्ट कार्ड, दैनिक पास मोबाईल कायमस्वरूपी डिजीटल वायलेट ई-पेमेंट अद्यायगी करण्याची सुविधा उपलब्ध करता येईल.
१२) याबाबतची सर्वस्वी नियंत्रण, कमांड सेंटर यांचेकडे राहील.
१३) महिला प्रवाशांचा सुरक्षित व खात्रीशीर प्रवास होईल.
१४) सदरील ई-कॅबवर डिजीटल जाहिराती केल्यास महामंडळास उत्पन्न प्राप्त होईल.
१७) सदरील ई-कॅब चार्जिंग करणेकामी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील ९ आगारामध्ये चार्जिंग हब उपलब्ध करता येईल.तसेच सदरच्या चार्जिंग हबचा वापर खाजगी वाहनांना वापरण्यास मुभा देऊन महामंडळास आर्थिक उत्पन्न प्राप्त होईल.
सदरच्या ई-कॅब सेवेमुळे परिवहन महामंडळाची सेवा विस्तारीत स्वरूपाची होऊन नावलौकीकात भर पडेल. रस्त्यावरील खाजगी वाहनांची गर्दी कमी होईल व पर्यायाने वातावरण शुध्द होऊन नागरिकांना स्वच्छ हवा प्राप्त होईल. तसेच पेट्रोल डिझेल या इंधनावर अवलंबुन राहता येणार नाही.

: कमी दर राहणार

सेवेचा तुलनात्मक विचार केला असता जीसीसी मॉडेल इकॉनॉमिक्सपेक्षा परिवहन महामंडळाच्या स्वःमालकीच्या ई-कॅब सेवा सुलभ व माफक दरात पुरविली जाऊन त्यामधुन महामंडळास आर्थिक नफाही प्राप्त होणार आहे. त्यामुळे परिवहन महामंडळामार्फत ई-कॅब सेवा सुरू केल्यास प्रवाशांना विश्वासहर्ता सेवा, महिला सुरक्षितता, इतर खाजगी ई-कॅब सेवेपेक्षा माफक दरात, प्रदुषणविरहित ई-कॅब सेवा, ज्येष्ठ, अपंग नागरिकांना सवलतीत सेवा ही सुलभ आरामदायी व कमी. वेळेत देता येणार आहे. या बाबी विचारात घेता पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत स्वःमालकीच्या एकुण १०० ई-कॅब घेण्यास व सेवा सुरू करण्यास संचालक मंडळाची मान्यता मिळणेविषयी विनंती आहे. असे प्रस्तावात म्हटले आहे.

: मुख्य आर्थिक मापदंड

• मॉडल: ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रक्ट (जीसीसी) मॉडेल/ केपेक्स (मालकीचे) मॉडेल
• वाहनांची संख्या: १०० (शंभर)
• प्रकल्पासाठी एकूण केपेक्स खर्च :रुपये१३.5 कोटी (COM सबसिडी वजा केल्यानंतर)
• प्रति ईव्ही चालवण्याची दैनिक खात्री: १५० कि.मी.
• प्रति किलो मीटर शुल्क आवश्यक आहे: ०.२ युनिट्स
० खर्च प्रति युनिट कि.मी. (२०२१): INR १.८
• प्रत्येक ईव्हीवर चालकांची संख्या: कारमध्ये दोन शिफ्टमध्ये ०२ ड्रायव्हर्स
ड्रायव्हरचे मासिक वेतन रूपये:  १८,०००/-

Leave a Reply