Confiscated vehicles | जप्त केलेल्या बेवारस गाड्यांचा होणार ई लिलाव 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

जप्त केलेल्या बेवारस गाड्यांचा होणार ई लिलाव 

पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील बंद पडीक गाड्यांवर कारवाई केली आहे. नोटीस देऊन सात दिवसांनंतर सदरच्या गाड्या जप्त करून उचलण्यात आल्या. त्यानुसार 1 जानेवारी ते 25 मे पर्यंत 1188 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर 2311 नोटीस देण्यात आल्या आहेत. दरम्यान महापालिका आता या गाड्यांचा ई लिलाव करणार आहे. अशी माहिती महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ च्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये रस्ता पदपथावरील ना दुरुस्त,बंद, बेवारस, वाहनांवर  अतिक्रमण /अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग यांचे नियंत्रणाखाली कारवाई  कारवाई करण्यात आली. या कारवाई मध्ये  एकूण 2311 वाहनांना नोटीस देण्यात आली व एकूण 1188 वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामुळे जागा रिकामी होऊन स्वच्छ झाली आहे. असे अतिक्रमण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान या गाडयांमुळे बालेवाडी चे महापालिकेचे गोडाऊन भरले आहे. आता या गाड्यांचा ई लिलाव करण्यात येणार आहे.
महापालिका अतिक्रमण विभागाच्या माहितीनुसार 2018 च्या स्वच्छ सर्वेक्षणातील जप्त वाहनांचा मे महिन्यात लिलाव करण्यात आला. मात्र त्याला अजून वाहतूक पोलिसांनी मंजुरी दिलेली नाही. दरम्यान 2022 च्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत 1188 वाहने जप्त करण्यात आली. त्यातील 864 वाहनाचा लिलाव 23 फेब्रुवारीला करण्यात आला. उर्वरित 324 वाहनांचा लिलाव 1 जुलैला करण्यात येणार आहे. याबाबतचे जाहीर प्रकटन महापालिकेकडून देण्यात आले आहे.