Air Quality Index | इलेक्ट्रिक वाहने आणि BSVI इंजिन असलेल्या वाहनांमुळे पुण्याच्या हवेची गुणवत्ता सुधारली | इलेक्ट्रिक वाहनांत 4.28 पटीने वाढ 

Categories
Breaking News PMC social पुणे लाइफस्टाइल
Spread the love

इलेक्ट्रिक वाहने आणि BSVI इंजिन असलेल्या वाहनांमुळे पुण्याच्या हवेची गुणवत्ता सुधारली

| इलेक्ट्रिक वाहनांत 4.28 पटीने वाढ

| महापालिकेच्या पर्यावरण अहवालातील दावा

पुणे | पुण्याच्या हवेची गुणवत्ता सुधारली असल्याचा दावा महापालिकेने पर्यावरण अहवालाच्या माध्यमातून केला आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि BSVI इंजिन असलेल्या वाहनांमुळे  हवेची गुणवत्ता सुधारली आहे, असे अहवालात म्हटले आहे. नुकताच महापालिकेने 2021 चा पर्यावरण अहवाल प्रसिद्ध केला आहे.

अहवालानुसार पुणे शहरात जून २०२२ पर्यंत एकूण ३३,२४,५८२ नोंदणीकृत वाहने आहेत. सन २०२० च्या तुलनेत सन २०२१ मध्ये नवीन वाहनांच्या नोंदणीमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. सन २०२१ मध्ये एकूण १,७०,११५ नवीन वाहनांची नोंदणी झाली, त्यापैकी ९४% वाहने ही BSVI (१,६०, ९८८) आहेत. BSVI इंजिन असलेल्या वाहनांतून निर्माण धुरामध्ये सल्फर उत्सर्जनाचे प्रमाण BSIV पेक्षा डिझेल वाहनांमध्ये ५ पटीने कमी व पेट्रोल वाहनांमध्ये ३ पटीने कमी
असते.

पुणे शहरात सन २०२० मध्ये १,४५० इलेक्ट्रिक वाहनांची तर सन २०२१ मध्ये ४.२८ पटीने झपाट्याने वाढ होऊन ६,२१९ इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (PMPML) च्या एकूण बसेस – २२५५; त्यापैकी सी.एन.जी. बसेस संख्या १६५८ (एकूण ताफ्याच्या ७४% बसेस सी. एन. जी.)ई- बसेस संख्या – ३१० (एकूण ताफ्याच्या १३.७% बसेस  इलेक्ट्रिक ) भविष्यात बसेसची खरेदी करून शहरातील ई-बसेसची संख्या एकूण ६५० करण्याचे नियोजन आहे. मार्च २०२२ पर्यंत, कार्यरत असलेल्या सर्व इलेक्ट्रिक बसेसचा एकूण प्रवास २.५० कोटी कि.मी. पेक्षा जास्त झाला आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी व सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस एक महत्वाची भूमिका बजावत आहेत. असे ही अहवालात म्हटले आहे.

Air Quality Index

– सूक्ष्म धूलिकण (पी.एम.१०) – सन २०२१ मध्ये पी.एम.१. साठी Poor व Very Poor या श्रेणींमध्ये एकही दिवस नोंदविला गेला नाही. वर्षांतील एकूण ३६५ दिवसांपैकी, १६३ दिवस हे Good, ११४ दिवस Satisfactory तर ८८
दिवस Moderate श्रेणीमध्ये नोंदविले गेले. सन २०१८ व २०१९ च्या तुलनेत, Good श्रेणी मध्ये सन २०२० व २०२१ मध्ये जास्त दिवस नोंदविले गेले. Satisfactory व Moderate श्रेणीमधील दिवसांच्या नोंदणीमध्ये घट होऊन
Good श्रेणीमध्ये वाढ झाली आहे.
• अतिसूक्ष्म धूलिकण (पी.एम.२.५ ) – सन २०२१ मध्ये पी.एम.२.५ साठी Very Poor या श्रेणीमध्ये एकही दिवस नोंदविला गेला नाही. वर्षांतील एकूण ३६५ दिवसांपैकी, १४१ दिवस हे Good, १३२ दिवस Satisfactory, ९० दिवस Moderate तर २ दिवस Poor श्रेणीमध्ये नोंदविले गेले.
पुणे शहरामध्ये अंदाजे एकूण १,८०,००० एल.ई.डी. दिवे बसविण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर विजेची बचत झाली आहे. पर्यावरण अहवालानुसार सौर ऊर्जेचा वाढता वापर पुणे म.न.पा.ने १.२५ मेगा वॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे काम पूर्ण केले आहे. घरगुती, व्यावसायिक किंवा इतर स्वरुपात सौर पॅनेलचा वापर करून ऊर्जेची निर्मिती करणाऱ्या नागरिकांच्या संख्येमध्ये
दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसत आहे. सन २०१९-२० (२,६६९ ग्राहक) पेक्षा सन २०२०-२१ (३,२११ ग्राहक) मध्ये एकूण ग्राहकांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. पुणे शहरामध्ये अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढताना
दिसत आहे, सन २०१९-२० मध्ये १२,१७,९५,६२२ युनिट्सची तर सन २०२०-२१ मध्ये १६,२०,४२, १४० युनिट्सची निर्मिती करण्यात आली असून हे कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने चांगले पाऊल आहे. पुणे शहरात सन
२०२१-२२ मध्ये ५८,२२८ सोलर वॉटर हिटर्सच्या वापराची नोंद झाली आहे.
पुणे म.न.पा.तर्फे स्मशानभूमीमध्ये एअर पोल्युशन कंट्रोल यंत्रणा उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून शहरात एकूण २३ ठिकाणी ही यंत्रणा कार्यरत आहे. तसेच अनेक ठिकाणी हायब्रिड (गॅस व विद्युत) दाहिनी उभारण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र शासनातर्फे “महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१” जाहीर करण्यात आले असून, त्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये २५% विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटी या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘Electric Vehicle Cell’ स्थापन करणारे पुणे हे भारतातील पहिले शहर आहे. असे ही अहवालात म्हटले आहे.