Video : 24*7 Water Project : Girish Bapat : समान पाणी पुरवठा योजना : अतिरिक्त आयुक्तांवर जबाबदारी सोपवणार  : गिरीश बापट आणि शिष्टमंडळला मनपा आयुक्तांचे आश्वासन 

Categories
Breaking News PMC Political पुणे
Spread the love

समान पाणी पुरवठा योजना : अतिरिक्त आयुक्तांवर जबाबदारी सोपवणार

: गिरीश बापट आणि शिष्टमंडळला मनपा आयुक्तांचे आश्वासन

पुणे : महापालिका हद्दीत पाणी प्रश्न भेडसावत आहे. याबाबत कालच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. यावेळी खासदार गिरीश बापट यांनी यावरून सभात्याग केला होता. समान पाणी पुरवठा योजनेमुळे शहराच्या वितरण व्यवस्थेत विस्कळीत पण आला आहे. त्यावर आज खासदार बापट आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळ ने महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी आश्वासन दिले कि समान पाणी पुरवठा योजना मार्गी लागण्यासाठी  अतिरिक्त आयुक्तांवर जबाबदारी सोपवली जाणार आहे.

वितरण व्यवस्था आणि तांत्रिक बाबींमुळे शहराच्या विविध भागात निर्माण झालेली पाणीपुरवठ्याची समस्या दोन-चार दिवसांत मार्गी लागेल असा विश्वास खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.

शहरात निर्माण झालेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्येसंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची आज बापट यांनी आयुक्तांच्या निवासस्थानी भेट घेतली. आमदार सिद्धार्थ शिरोळे, माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, माधुरी सहस्रबुद्धे, ज्योत्स्ना एकबोटे, आदित्य माळवे, अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, उज्ज्वल केसकर, स्वरदा बापट, सुनील माने उपस्थित होते.

बापट म्हणाले, आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत महापालिकेच्या पाच विभागांसाठी तंत्रज्ञांचा समावेश असणारी समिती उद्या नियुक्त केली जाईल. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकार्यांवर जबाबदारी टाकण्यात येईल. पाणीपुरवठ्या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात येईल.

बापट पुढे म्हणाले, तांत्रिक बाबींमुळे काही भागात कमी आणि कमी वेळा पाणी येते. याबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. शहरात समान पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी सर्व माजी नगरसेवकांना आपआपल्या भागात पाठपुरावा करण्याचे आवाहन केले आहे. ज्या ठिकाणी योजनेचे काम सुरू झालेले नाही त्या ठिकाणी मी व्यक्तिश: पाठपुरावा करणार आहे. योजनेच्या प्रगतीचा अहवाल मागवला आहे.

Leave a Reply