Medical College Of PMC : महापालिकेच्या मेडिकल कॉलेजचा अंतिम टप्पा देखील पार! : लवकरच प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रिया 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे महाराष्ट्र
Spread the love

 

 महापालिकेच्या मेडिकल कॉलेजचा अंतिम टप्पा देखील पार!

: लवकरच प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रिया

पुणे – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal corporation) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला (Medical College) अखेर केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (नॅशनल मेडिकल कमिशन- एनएमसी) मान्यता दिल्यानंतर  राज्य शासनाने (State Government) देखील जीआर (GR) काढून २०२१-२२ म्हणजेच यंदापासूनच एमबीबीएसच्या (MBBS) प्रथम वर्षाचे प्रवेश प्रक्रिया (Admission Process) राबविण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर आता नाशिकच्या MUHS (Medical University Of Helath Science) ने कॉलेजच्या Head count ची तपासणी करत क्लास, प्रयोगशाळा, होस्टेल ची पाहणी केली आहे. त्यांचा रिपोर्ट सरकारला सादर झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्षात विध्यार्थ्यांचे प्रवेश सुरु होतील. अशी माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारती यांनी दिली.

शहरात महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय असावे यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. एनएमसीच्या पथकाने पुण्यात येऊन महाविद्यालयातील वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वसतीगृह यासह इतर सुविधांची पाहणी केली होती. त्यातील त्रूटी दूर केल्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या तयारी आढावा घेतला. त्यानंतर महाविद्यालय सुरू करण्यासाठी मौखिक मान्यता दिली होती. ७ मार्च रोजी लेटर आॅफ इनटेंट देऊन १०० जागांवर प्रवेश करण्यास केंद्र शासनाकडून मान्यता मिळाली. त्यानंतर दोन दिवसांनी लेटर आॅफ परमिशन ९ मार्च रोजी देण्यात आले आहे. हे दोन्ही पत्र महाविद्यालय सुरू करण्यासाठी महत्त्वाचे होते. त्याआधारे राज्य शासनाकडे महापालिकेने प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार  याबाबतचा आदेश काढून २०२१-२२ च्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे सीईटी सेलमार्फत एमबीबीएसच्या फेरीमध्ये या १०० जागा उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान कॉलेज प्रवेशासाठीचा अंतिम टप्पा अजून बाकी होता. तो म्हणजे नाशिकच्या MUHS (Medical University Of Helath Science) ची कॉलेजला भेट. नाशिकच्या ३ लोकांची टीम पाहणी करण्यासाठी आली होती. याबाबत डॉ आशिष भारती यांनी सांगितले कि, या टीमने आज कॉलेजच्या स्टाफचे physical verification केले. त्यांनतर कॉलेज ची पाहणी केली. यामध्ये, क्लासेस, प्रयोगशाळा, होस्टेल, यांची पाहणी केली. ही टीम आता राज्य  सरकारला रिपोर्ट करेल. त्यानंतर प्रवेश देणे सुरु होतील. डॉ भारती यांच्या माहितीनुसार काही विद्यार्थ्यांनी कॉलेजची पाहणी देखील केली आहे. लवकरच महापलिकेच्या मेडिकल कॉलेज मध्ये त्यांचा प्रवेश होईल.
तर महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ अंजली साबणे यांनी सांगितले कि, नाशिकच्या MUHS कडून महापालिकेला Affiliation प्राप्त होईल. ते झाल्यानंतर महापालिकेचे मेडिकल कॉलेज त्यांच्याशी जोडले जाईल. लवकरच नाशिकच्या टीमचा रिपोर्ट येणे अपेक्षित आहे.

Leave a Reply