Government of Jharkhand | PMC Revenue Model | झारखंड सरकारला हवंय पुणे महापालिकेचं रेव्हेन्यू मॉडेल!

Categories
Breaking News social देश/विदेश पुणे
Spread the love

Government of Jharkhand | PMC Revenue Model | झारखंड सरकारला हवंय पुणे महापालिकेचं रेव्हेन्यू मॉडेल!

Pune Municipal Corporation Revenue Model – (The Karbhari News Service) – झारखंड सरकार (Government of Jharkhand) पुणे महापालिकेच्या रेव्हेन्यू मॉडेलचा (PMC Pune Revenue Model) अभ्यास करणार आहे. त्यानुसार आपल्या राज्यात असे मॉडेल लागू करण्याचा विचार झारखंड सरकारचा आहे. त्यामुळे झारखंडच्या नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाने (Urban Devlopment and Housing Department Jharkhand) पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) याबाबतची माहिती मागवली आहे. (Pune PMC News)
याबाबत झारखंडच्या नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाचे संचालक अमित कुमार यांनी महापालिकेला पत्र लिहिले आहे. देशातील विविध महापालिकांच्या रेव्हेन्यू मॉडेलचा अभ्यास झारखंड सरकार करणार आहे. त्यात महाराष्ट्रातून पुणे महापालिका देखील निवडली आहे. त्यानुसार या मॉडेलचा अभ्यास करून झारखंड सरकार आपल्या राज्यात एक रेव्हेन्यू मॉडेल लागू करणार आहे.
याबाबत अमित कुमार यांनी पुणे महापालिकेकडे 2018-19 ते 2023-24 पर्यंतच्या अंदाजपत्रकाची माहिती मागवली आहे. यात या वर्षांमध्ये झालेली जमा आणि खर्च, बॅलन्स सीट, पगार अशी सर्व माहिती मागवली आहे. तसेच महापालिका अधिनियम आणि त्यानुसार कुठल्या पद्धतीने कर आकारणी केली जाते. याची माहिती मागवली आहे. त्याचप्रमाणे मिळकतकर, व्यावसायिक कर, घनकचरा, पाणीपुरवठा, मलनिःस्सारण, अशा विभागाचे कशा पद्धतीने संकलन आणि वसुली केली जाते. याची सविस्तर माहिती मागवली आहे.