Spread the love

कुणाच्या आरोपावर प्रतिक्रिया द्यायला मला वेळ नाही

: किरीट सोमय्यांच्या आरोपावर अजित पवारांची प्रतिक्रिया

पुणे : काल किरीट सोमय्या (Kirit Somaiya )यांनी जम्बो कोविड सेंटरमध्ये (Jumbo Covid Centar) घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना या सेंटरमध्ये राज्य सरकार, मनपाच्या संयुक्त विद्यमाने काम केलं जात असतं. त्यामध्ये सीओईपी (COEP) आणि आणखी एक अशी कोविड सेंटर (Covid) तयार करण्यात आली. त्यामध्ये कोणत्याही राजकारण्याला न सहभागी करून घेता सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालवण्यात आलं. त्यावेळी सर्व कारभार पारदर्शक ठेवण्याचा कारभार व्हावा अशा सुचना देण्यात आल्या होत्या. आजच्या बैठकीत त्याबद्दलचे सर्व अपडेट्स आज अधिकाऱ्यांनी दिले असून, त्यामध्ये काहीच गैरकारभार झाला नाही असं अजित पवार यांनी सांगितलं. तसंच कोणी काय आरोप केलेत? कोण काय बोललं? यावर प्रतिक्रीया द्यायला आपल्याला वेळ नाही असं अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 15 ते 18 वयोगटातील 90 टक्के मुलांचं लसीकरण झालंय. जिल्ह्यात काही प्रमाणात कोव्हॅक्सीनचा तुटवडा आहे, त्याबद्दल केंद्र सरकारकडून मागणी केली असून, तयारी सूरू आहे. थिएटर मध्ये 50 टक्के उपस्थितीची परवानगी आहे, त्यात शिथिलता आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांशी बोलून करता येईलथेट तसंच नियमांमध्ये शिथीलता आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. वीज खंडीत का झाली होती, त्याची चौकशी केली. त्यामध्ये तांत्रिक वाहिन्यांमध्ये बिघाड झाला, त्यानंतर चाकण, लोणीकंद येथील प्रवाह खंडीत झाला, त्यानंतर जवळपास सर्व ठिकाणी वीज खंडीत झाल्याचं ते म्हणाले.

Leave a Reply