Official Timing | महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यालयीन वेळेबाबत अतिरिक्त आयुक्तांचे महत्वपूर्ण आदेश

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यालयीन वेळेबाबत अतिरिक्त आयुक्तांचे महत्वपूर्ण आदेश

| मनपा भवनात समूहाने फिरण्यास मनाई

पुणे | महापालिकेच्या कार्यालयीन आदेशाप्रमाणे भोजनाची दुपारी २.३० ची वेळ संपल्यानंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये तसेच क्षेत्रिय स्तरावरील कार्यालयांमध्ये काही कर्मचारी हे आपापल्या जागेवर कामासाठी उपलब्ध न होता समुहाने फिरताना / चर्चा करताना तसेच कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कार्यालयातून निघून जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. ही बाब नागरिकांकडून तसेच विविध समाज माध्यमांमधून देखील निदर्शनास आणलेली आहे. ही बाब महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी गंभीरपणे घेतली आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी नियमावली ठरवून दिली आहे.
| असे आहेत अतिरिक्त आयुक्तांचे आदेश
पुणे महानगरपालिका प्रशासकीय कार्यालये व विभाग यांचेसाठी  आदेशान्वये पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व अधिकारी / कर्मचारी यांना कार्यआदेश  कामकाजाची वेळ निश्चित केलेली असून, सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी विहित केलेली कार्यालयीन
कामकाजाची वेळ पाळणे आवश्यक आहे. सदरील आदेशाप्रमाणे दुपारी ०२.०० ते ०२.३० ही आर्धा तास भोजनाची सुट्टी नेमून दिलेली आहे. पुणे महानगरपालिका सेवा विनियमामधील ‘नगरपालिका कर्मचाऱ्यांचे वर्तणूक नियम’ यातील नियम क्र. २८ आणि २९ नुसार प्रत्येक नगरपालिका कर्मचाऱ्याने कार्यालयात वक्तशीरपणे हजर राहाणे, नेमून दिलेले काम कार्यालयीन वेळेमध्ये इमानाने व प्रामाणिकपणे करणे, सहकाऱ्यांबरोबर अनावश्यक बडबड न करणे, गटागटाने चर्चा न करणे असे वर्तन सर्व कर्मचाऱ्यांकडून होणे अभिप्रेत व आवश्यक आहे.
कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. त्यानुसार सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करणे आवश्यक आहे. याबाबत यापूर्वी वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत.  कार्यालयीन आदेशाप्रमाणे भोजनाची दुपारी २.३० ची वेळ संपल्यानंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये तसेच क्षेत्रिय स्तरावरील कार्यालयांमध्ये काही कर्मचारी हे आपापल्या जागेवर कामासाठी उपलब्ध न होता समुहाने फिरताना / चर्चा करताना तसेच कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कार्यालयातून निघून जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. ही बाब नागरिकांकडून तसेच विविध समाज माध्यमांमधून देखील निदर्शनास आणलेली आहे. कर्मचाऱ्यांची अशी वर्तणूक ही प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही. याबाबत खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
१) सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येणे जाणेकरिता  कार्यालयीन आदेशान्वये नेमून दिलेल्या कार्यालयीन वेळेचे काटेकोरपणे पालन करावे.
२) कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालय इमारतीमध्ये व इतरत्र कोठेही न फिरता आपापल्या जागेवर उपस्थित राहून कामकाज करावे.
३)  कार्यालयीन आदेशामध्ये निश्चित केल्याप्रमाणे भोजनाच्या वेळा पाळाव्यात, त्यानंतर प्रत्येक कर्मचारी त्याच्या नियुक्त केलेल्या जागेवर उपस्थित असणे आवश्यक आहे.
४) कर्मचारी हे आपापल्या जागेवर उपस्थित राहून कामकाज करतील याबाबत संबंधित कार्यालय प्रमुख / खातेप्रमुख यांनी दक्षता घ्यावयाची आहे. शासकीय कामासाठी बाहेर जाताना हलचाल नोंदवहीत नोंद करण्याबाबत सूचना कराव्यात.
५) कामगार कल्याण विभाग आणि प्राप्ती व चाचणीचे अर्थान्विक्षक विभाग यांनी समन्वयाने  क्षेत्रिय कार्यालयांसह मुख्य इमारतीबाहेरील महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये आणि सामान्य प्रशासन विभागाने मुख्य इमारतीमधील कार्यालयांमध्ये सकाळी १०.०० वा. दुपारी २.३० वा. व सायंकाळी ०६.०० वा. अचानकपणे भेट देऊन कर्मचारी कार्यालयात उपस्थित असल्याबाबत हजेरी घ्यावी. कार्यालय परिपत्रकाप्रमाणे संबंधित कार्यालयामधील हालचाल नोंद वही तपासणी करावी. ज्या विभागांमध्ये कर्मचारी जागेवर उपलब्ध नाहीत, त्यांची नोंद घेऊन त्याप्रमाणे अहवाल सामान्य प्रशासन विभागामार्फत या कार्यालयाकडे सादर करावा.
६) कर्मचाऱ्यांचे हजेरीबाबत प्राप्त होणाऱ्या अहवालाप्रमाणे कार्यालयात अनुपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करणे क्रमप्राप्त राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
७) पुणे महानगरपालिका स्तरावर Aadhar Enable Bio-metric Attendance System ची प्रणाली कार्यान्वित करणे, त्याकरिता सर्व कर्मचाऱ्यांना नवीन स्मार्ट ओळखपत्र उपलब्ध करून देऊन त्याद्वारे हजेरी नोंदविणे करिता महापालिका आयुक्त कार्यालय आदेश  अन्वये देण्यात आलेल्या आदेशाप्रमाणे सर्व खातेप्रमुख यांनी तातडीने कार्यवाही पूर्ण करावी.