Official Timing | महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यालयीन वेळेबाबत अतिरिक्त आयुक्तांचे महत्वपूर्ण आदेश

Categories
Breaking News PMC पुणे

महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यालयीन वेळेबाबत अतिरिक्त आयुक्तांचे महत्वपूर्ण आदेश

| मनपा भवनात समूहाने फिरण्यास मनाई

पुणे | महापालिकेच्या कार्यालयीन आदेशाप्रमाणे भोजनाची दुपारी २.३० ची वेळ संपल्यानंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये तसेच क्षेत्रिय स्तरावरील कार्यालयांमध्ये काही कर्मचारी हे आपापल्या जागेवर कामासाठी उपलब्ध न होता समुहाने फिरताना / चर्चा करताना तसेच कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कार्यालयातून निघून जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. ही बाब नागरिकांकडून तसेच विविध समाज माध्यमांमधून देखील निदर्शनास आणलेली आहे. ही बाब महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी गंभीरपणे घेतली आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी नियमावली ठरवून दिली आहे.
| असे आहेत अतिरिक्त आयुक्तांचे आदेश
पुणे महानगरपालिका प्रशासकीय कार्यालये व विभाग यांचेसाठी  आदेशान्वये पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व अधिकारी / कर्मचारी यांना कार्यआदेश  कामकाजाची वेळ निश्चित केलेली असून, सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी विहित केलेली कार्यालयीन
कामकाजाची वेळ पाळणे आवश्यक आहे. सदरील आदेशाप्रमाणे दुपारी ०२.०० ते ०२.३० ही आर्धा तास भोजनाची सुट्टी नेमून दिलेली आहे. पुणे महानगरपालिका सेवा विनियमामधील ‘नगरपालिका कर्मचाऱ्यांचे वर्तणूक नियम’ यातील नियम क्र. २८ आणि २९ नुसार प्रत्येक नगरपालिका कर्मचाऱ्याने कार्यालयात वक्तशीरपणे हजर राहाणे, नेमून दिलेले काम कार्यालयीन वेळेमध्ये इमानाने व प्रामाणिकपणे करणे, सहकाऱ्यांबरोबर अनावश्यक बडबड न करणे, गटागटाने चर्चा न करणे असे वर्तन सर्व कर्मचाऱ्यांकडून होणे अभिप्रेत व आवश्यक आहे.
कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. त्यानुसार सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करणे आवश्यक आहे. याबाबत यापूर्वी वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत.  कार्यालयीन आदेशाप्रमाणे भोजनाची दुपारी २.३० ची वेळ संपल्यानंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये तसेच क्षेत्रिय स्तरावरील कार्यालयांमध्ये काही कर्मचारी हे आपापल्या जागेवर कामासाठी उपलब्ध न होता समुहाने फिरताना / चर्चा करताना तसेच कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कार्यालयातून निघून जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. ही बाब नागरिकांकडून तसेच विविध समाज माध्यमांमधून देखील निदर्शनास आणलेली आहे. कर्मचाऱ्यांची अशी वर्तणूक ही प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही. याबाबत खालीलप्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत.
१) सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येणे जाणेकरिता  कार्यालयीन आदेशान्वये नेमून दिलेल्या कार्यालयीन वेळेचे काटेकोरपणे पालन करावे.
२) कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालय इमारतीमध्ये व इतरत्र कोठेही न फिरता आपापल्या जागेवर उपस्थित राहून कामकाज करावे.
३)  कार्यालयीन आदेशामध्ये निश्चित केल्याप्रमाणे भोजनाच्या वेळा पाळाव्यात, त्यानंतर प्रत्येक कर्मचारी त्याच्या नियुक्त केलेल्या जागेवर उपस्थित असणे आवश्यक आहे.
४) कर्मचारी हे आपापल्या जागेवर उपस्थित राहून कामकाज करतील याबाबत संबंधित कार्यालय प्रमुख / खातेप्रमुख यांनी दक्षता घ्यावयाची आहे. शासकीय कामासाठी बाहेर जाताना हलचाल नोंदवहीत नोंद करण्याबाबत सूचना कराव्यात.
५) कामगार कल्याण विभाग आणि प्राप्ती व चाचणीचे अर्थान्विक्षक विभाग यांनी समन्वयाने  क्षेत्रिय कार्यालयांसह मुख्य इमारतीबाहेरील महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये आणि सामान्य प्रशासन विभागाने मुख्य इमारतीमधील कार्यालयांमध्ये सकाळी १०.०० वा. दुपारी २.३० वा. व सायंकाळी ०६.०० वा. अचानकपणे भेट देऊन कर्मचारी कार्यालयात उपस्थित असल्याबाबत हजेरी घ्यावी. कार्यालय परिपत्रकाप्रमाणे संबंधित कार्यालयामधील हालचाल नोंद वही तपासणी करावी. ज्या विभागांमध्ये कर्मचारी जागेवर उपलब्ध नाहीत, त्यांची नोंद घेऊन त्याप्रमाणे अहवाल सामान्य प्रशासन विभागामार्फत या कार्यालयाकडे सादर करावा.
६) कर्मचाऱ्यांचे हजेरीबाबत प्राप्त होणाऱ्या अहवालाप्रमाणे कार्यालयात अनुपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करणे क्रमप्राप्त राहील, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
७) पुणे महानगरपालिका स्तरावर Aadhar Enable Bio-metric Attendance System ची प्रणाली कार्यान्वित करणे, त्याकरिता सर्व कर्मचाऱ्यांना नवीन स्मार्ट ओळखपत्र उपलब्ध करून देऊन त्याद्वारे हजेरी नोंदविणे करिता महापालिका आयुक्त कार्यालय आदेश  अन्वये देण्यात आलेल्या आदेशाप्रमाणे सर्व खातेप्रमुख यांनी तातडीने कार्यवाही पूर्ण करावी.

Difference in pay : PMC: वेतन आयोग फरकाच्या प्रस्तावाला आयुक्तांची मंजूरी : वित्त व लेखा विभागाचे सर्क्युलर जारी

Categories
Breaking News PMC पुणे

वेतन आयोग फरकाच्या प्रस्तावाला आयुक्तांची मंजूरी

: वित्त व लेखा विभागाचे सर्क्युलर जारी

: 10 महिन्याचा मिळणार फरक

पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांना अखेर 10 महिन्याचा वेतन आयोगातील फरक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्यानुसार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना नोव्हेंबर पासून सुधारित वेतन देखील मिळू लागले आहे. मात्र 1 जानेवारी 2021 ते 31 ऑक्टोबर पर्यंतची फरकाची रक्कम अजूनही मिळालेली नव्हती. याबाबत कर्मचारी वर्गातून ओरड सुरु होती. दरम्यान नुकताच वित्त व लेखा विभागाने हा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे पाठवला होता. मात्र निधी कमी पडत असल्याने यावर आयुक्तांनी मार्गदर्शन करावे, असे प्रस्तावात म्हटले होते. मात्र गेल्या आठवड्यापासून प्रस्ताव आयुक्तांच्या टेबलवर होता. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थेने आवाज उठवला होता. त्यानुसार आता महापालिका आयुक्तांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानंतर लगेच वित्त व लेखा विभागाने  सर्क्युलर जारी केले आहे. लवकरच आता कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी/ कर्मचारी यांना  शासन आदेशानुसार ७ वा वेतन आयोग मंजूर करण्यात आला असून सुधारीत वेतनश्रेणी नुसार माहे नोव्हेंबर २०२१ चे वेतन प्रत्यक्ष आदा करण्यात आलेले आहे.  ७ व्या वेतन आयोगानुसार प्रत्यक्ष वेतन दिनांक ०१.०१.२०२१ पासून देणेबाबत नमूद आहे. त्यानुसार मनपा अधिकारी/ कर्मचारी यांना दि.०१.०१.२०२१ ते ३१.१०.२०२१ या कालावधीतील वेतनातील फरकाच्या थकबाकीची रक्कम रोखीने त्वरित आदा होणे आवश्यक आहे. मात्र 10 महिन्याची रक्कम अजूनही मिळालेली नाही. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये रोष होता. दरम्यान वित्त व लेखा विभागाने फरक देण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडे पाठवला होता. मात्र विभागाने फरक देण्याबाबत आयुक्तांकडून मार्गदर्शन मागितले होते. आयुंक्तांकडून याबाबत निर्णय होत नव्हता. अखेर महापालिका आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार लगेच वित्त व लेखा विभागाने  सर्क्युलर जारी केले आहे. लवकरच आता कर्मचाऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होईल.

: असे आहे वित्त व लेखा विभागाचे सर्क्युलर 

महापालिका आयुक्त ठ.क्र.६/११०६ दिनांक ३०/०३/२०२१
मे महाराट्र शासन नगर विकास विभाग क्र.पीएमसी-२०२१ /प्र.क्र.१८७/ नवि-२ दिनांक १६/९/२०२१ अन्वये ७
व्या वेतन आयोग मंजूर करण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष वेतन दि.०१/०१/२०२१ पासून देणेबाबत नमूद आहे. पुणे
महानगरपालिकेकडील अधिकारी/कर्मचारी यांना ७ व्या वेतन आयोगाचा लाभ माहे नोव्हेंबर २०२१ पेड इन डिसेंबर २०२१
पासून वेतन अदा करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यानुसार मनपा अधिकारी/कर्मचारी यांना दि. ०१/०१/२०२१ ते
दि.३१/१०/२०२१ पर्यंतच्या वेतनातील फरकाची थकबाकी अदा करणे आहे. संदर्भाकित ठराव अन्वये दि. ०१/०१/२०२१
ते दि.३१/१०/२०२१ च्या कालावधीतील वेतनातील फरकाची थकबाकी अदा करण्यास मान्यता मिळाली आहे.
संदर्भाकिंत ठराव नुसार सदरचे कार्यालय परिपत्रक प्रसृत करण्यात येत आहे. त्यानुसार खालील प्रमाणे कार्यवाही
करण्यात यावी.
१. ७ व्या वेतन आयोगानुसार मनपा अधिकारी/कर्मचारी यांना दि.०१/०१/२०२१ ते दि. ३१/१०/२०२१ पर्यंतच्या वेतनातील फरकाच्या थकबाकीची बिले अदा करण्यासाठी संगणक प्रणाली (व्हर्जन) सांख्यिकी व संगणक कार्यालयाकडून त्वरीत प्राप्त करून घ्यावी.
2. ७ व्या वेतन आयोगानुसार मनपा अधिकारी/कर्मचारी यांना दि.०१/०१/२०२१ ते दि. ३१/१०/२०२१ पर्यंतच्या वेतनातील फरकाच्या थकबाकीची बिले दि. ३१/०३/२०२२ अखेर ऑडीट विभागातून तपासून घ्यावीत.
३. ज्या अधिकारी/सेवकांना वेतन आयोगातील फरकाच्या थकबाकीची मिळणारे रक्कम आयकर व पुरसंचय निधी
योजना लागू असलेल्या ज्या सेवकांना पुरसंचय निधीची वर्गणी कपात करावयाची आहे त्यांनी त्याबाबतची पूर्वसुचना संबंधीत बिल लेखनिकांना देणे आवश्यक आहे. वरील प्रमाणे आयकर व पुरसंचय निधी वर्गणी कपात करण्याची सुविधा संगणक प्रणालीमध्ये करण्यात आली आहे.
४. ७ व्या वेतन आयोगानुसार मनपा अधिकारी/कर्मचारी यांना दि.०१/०१/२०२१ ते दि. ३१/१०/२०२१ पर्यंतच्या वेतनातील फरकाच्या थकबाकीची नोंदी सेवापुस्तक ठेवणे आवश्यक आहे.

तरी, पुणे महानगरपालिका अधिकारी/ कर्मचारी यांना ७ वा वेतन आयोगनुसार दि.०१/०१/२०२१ ते ३१/१०/२०२१
पर्यंतच्या फरकाच्या थकबाकीची रक्कम अदा करण्याकरीता वरीलप्रमाणे त्वरीत पुर्तता करणेविषयी सर्व मा.खाते प्रमुख यांनी त्यांचे नियंत्रणाखालील सर्व संबंधीत बिल लेखनिकांना जरूर त्या सुचना देण्याची तजवीज करणे विषयी विनंती आहे.