Pune Congress : कन्हैया कुमारच्या सभेने पुन्हा एकदा दिसून दिले; पुणे काँग्रेस मध्ये सर्व काही आलबेल नाही! 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

कन्हैया कुमारच्या सभेने पुन्हा एकदा दिसून दिले; पुणे काँग्रेस मध्ये सर्व काही आलबेल नाही!

: युवक काँग्रेस चा बहिष्कार

पुणे : पुणे शहर आणि जिल्हा काँग्रेस मधील दुफळी ही सर्वज्ञात आहेच. मात्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आल्यापासून काँग्रेस मध्ये सकारात्मक वातावरण दिसून आले होते. त्यानुसार काँग्रेसची घडी बसताना दिसत होती. मात्र काल झालेल्या कन्हैया कुमारच्या सभेत पुन्हा ही घडी विस्कटलेली पाहायला मिळाली. कारण या सभेवर युवक काँग्रेसने बहिष्कारच टाकला होता. कारण शहरात काँग्रेस ने केलेल्या बॅनरबाजीत राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा फोटो कुठेच नव्हता. चिडलेल्या युवक कार्यकर्त्यांनी रातोरात फोटो लावण्याचा प्रयत्न केला. मात्र जुन्या नेत्यांचा हा आकस पाहून  युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मात्र या सभेला जाणे टाळलेच. देशातील महत्वाच्या युवक नेत्याच्या सभेला युवक कार्यकर्तेच हजर नव्हते. त्यामुळे काँग्रेस मध्ये आलबेल नाही, हेच दिसून आले.

: युवक काँग्रेस चे पदाधिकारी नाराज

शहर काँग्रेस कडून दरवर्षी सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा त्याग सप्ताह साजरा करण्यात येतो. शहरातील पदाधिकारी एकत्र येत याचे नियोजन करतात. त्यानुसार यावर्षी देखील जोरदार तयारी करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे युवक नेता आणि ज्यांच्या भाषणाची नेहमीच चर्चा होते, अशा कन्हैया कुमार यांची सभा ठेवण्यात आली. त्यानुसार जय्यत तयारी देखील केली गेली. शहरात आणि काँग्रेस भवन मध्ये मोठी बॅनरबाजी करण्यात आली. यावर राज्यातील सगळ्या महत्वाच्या नेत्यांचे फोटो होते; मात्र राज्यमंत्री आणि पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढवलेले विश्वजित कदम यांचाच फोटो त्यात नव्हता. ही गोष्ट युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली. युवकचे सगळेच कार्यकर्ते कदम यांना खूप मानतात. त्यामुळे सभेच्या आदल्या रात्री युवक पदाधिकाऱ्यांनी थोडा गोंधळ घालत कदम यांचा फोटो बॅनर वर लावला. मात्र यामुळे कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही. आपल्या नेत्यांबाबत एवढा आकस असावा, ही बाब कार्यकर्त्यांना पटली नाही. त्यामुळे जेंव्हा सभेला जाण्याची युवक काँग्रेस च्या कार्यकर्त्यांची तयारी चालली होती, त्यावेळी शहरातील एका महत्वाच्या नेत्यानेच सभेला जाऊ नका; असे आदेश दिले. त्यामुळे सगळे युवकचे कार्यकर्ते शांत बसले. त्यामुळे प्रत्यक्ष सभेत युवकचा कुणी पदाधिकारी अथवा कार्यकर्ता दिसून आला नाही. जुन्या नेत्यांची तेवढीच कार्यकर्ते सभेला होते. यामुळे मात्र काँग्रेस मधील वाद पुन्हा बाहेर येताना दिसून आला आहे.

: पुणे शहर आणि विश्वजित कदम

शहरातील काँग्रेसच्या नेत्यांकडून राज्यमंत्री विश्वजित कदम यांना नेहमीच दूर ठेवले जाते. कदम यांनी ज्यावेळी पुणे शहरातून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यावेळी देखील इथल्याच काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना ‘बाहेरचा नेता’ म्हणून शिक्का मारला होता. त्यामुळेच त्यांना हरावे लागले, असे मानण्यात येते. सद्यस्थितीत कदम राज्यमंत्री आहेत शिवाय पुण्यात नेहमीच ते बैठक घेत असतात. असे असतानाही त्यांना डावलले जावे, ही गोष्ट युवकच्या पदाधिकाऱ्यांना फारसी रुचली नाही.

Leave a Reply